Winters BreakFast Kitchen Tips : हिवाळ्यात सकाळी लवकर उठवण्यास खूप आळस येतो. थंडीमुळे अंथरुणातून बाहेर पडणं अवघड होतं, अशा परिस्थितीत सकाळी लवकर उठून, सर्व आवरून किचनमध्ये नाश्ता तयार करणे कंटाळवाणे काम वाटू लागते. पण नाश्त्याशिवाय उपाशी ऑफिसला जायचं कसं, असाही एक प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्ट किचन ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत झटपट नाश्ता तयार करू शकता. या ट्रिक्स नेमक्या काय ते जाणून घेऊ…
नाश्ता झटपट बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ ट्रिक्स
१) रात्री थोडी तयारी करून ठेवा – थंडीच्या दिवसांत सकाळी लवकर उठण्यास कंटाळा येत असेल, तर आदल्या दिवशी रात्री थोडी तयारी करून ठेवा. त्यामुळे सकाळचे काम सोपे होईल. उदाहरणार्थ, पोहे किंवा ओट्स भिजवून ठेवा, डोसा इडली बनवणार असाल, तर चटणी आधीच बनवून ठेवा. चपातीसाठी पीठ मळून ठेवा. अशा प्रकारे तयारी करून ठेवल्यास तुम्ही सकाळी झटपट नाश्ता बनवू शकता.
२) प्री-कुक्ड किंवा फ्रोजन ऑप्शन्सचा वापर करा – तुम्ही प्री-कुक्ड पराठे, उकडलेले बटाटे किंवा फ्रोजन मिक्स व्हेजिटेबल्स फ्रीजमध्ये ठेवू शकता. हलक्या तेलात तळून तुम्ही झटपट नाश्ता तयार करू शकता. स्टफ पराठे असोत किंवा भाज्यांचे पदार्थ असोत, काही मिनिटांतच स्वादिष्ट नाश्ता तयार करता येतो.
३) वन-पॉट रेसिपी – पोहे, उपमा, खिचडी, ऑम्लेट अशा प्रकारचे पदार्थ निवडा; ज्यासाठी फक्त एक पॅन आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही हे पदार्थ कमी वेळात तयार करू शकता. इतकेच नाही, तर आदल्या दिवशी भरपूर भाज्या तयारीत ठेवा आणि त्या मिक्स करून तुम्ही पोषणाची काळजीदेखील घेऊ शकता.
४) ड्राय फ्रुट्स आणि मिल्क शेक – हिवाळ्यात वेळ कमी असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि दुधापासून झटपट मिल्क शेक बनवू शकता. हे केवळ पटकन तयार होत नाही, तर हिवाळ्यात शरीराला उबदार आणि ऊर्जादेखील देते.
५) टोस्टचा वापर – तुम्ही सकाळी अंड्यांबरोबर टोस्ट आणि ब्रेडबरोबर पीनट बटर, जॅम, मध इत्यादी वापरू शकता. ब्रेड टोस्ट करा आणि ते केळी किंवा सफरचंदाचे कापांसारख्या काही फळांसह सर्व्ह करा. अशा प्रकारे हा फायबर आणि ऊर्जासमृद्ध नाश्ता असेल.
अशा प्रकारे रात्रीचे थोडे नियोजन करून सर्व काही तयार ठेवले, तर तुमचे काम सोपे होईल आणि सकाळी स्वयंपाक करण्याची वेळही कमी लागेल. या उपायांचा अवलंब केल्याने तुमचा सकाळचा वेळ तर वाचेलच. त्याशिवाय घाई-गडबडीतही निरोगी आणि चविष्ट नाश्त्याचा आस्वाद घेता येईल.