थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवण्यासाठी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो जे गरम असतात. यामुळे शरीरात एक उबदारपणा राहतो. थंडीच्या दिवसांत सतत गरमागरम काहीतरी खावसं वाटतं. नेहमीचेच चटणी, लोणचे, सलाड यापेक्षा वेगळे काहीतरी असेल तर जेवणात रंगत येते. मग जेवताना फरसाण किंवा तत्सम काहीतरी घेण्यापेक्षा मस्त हिवाळा स्पेशल मिक्स भाजी ट्राय करा. आज आपण पाहणार आहोत बहुगुणी चंदन बटव्याची पातळ भाजी रेसिपी, चला तर पाहुयात ही पौष्टीक भाजी कशी बनवायची..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुगुणी चंदन बटव्याची पातळ भाजी साहित्य

  • १ जुडी चंदन बटव्याची निवडलेली पाने धुवून निथळत ठेवलेली
  • १/२ वाटी मुगडाळ त्याचा निम्मी तूर डाळ
  • १० लसणाच्या पाकळ्या, चार लाल मिरच्या
  • ३ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा तेल
  • १/२ चमचा जिरे,चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ,सुपारी एवढा गुळ,दोन कोकम

बहुगुणी चंदन बटव्याची पातळ भाजी कृती

स्टेप १
चंदन बटाट्याची पाने व डाळी व हिरवी मिरची कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घ्याव्या मग कुकर थंड झाला की काढून त्या घोटून घ्याव्या लागेल तसे त्यात पाणी घालावं

स्टेप २
एका कढईमध्ये हे सर्व उकळत ठेवावं त्यामध्ये मीठ गूळ घालावे व मंद गॅसवर उकळत ठेवावे

स्टेप ३
फोडणीच्या कडल्यामध्ये तेल घालून ते गरम झालं की त्यात ठेचलेला लसूण जिरं हिंग लाल मिरची घालून खमंग फोडणी करावी लसूण लालसर झाला की गॅस बंद करावा.

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीनं करा झणझणीत “लहसुणी गवार” ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी

स्टेप ४
ही फोडणी वरील उकळत्या भाजीत घालून एकजीव करावे व दोन मिनिटं उकळत ठेवून गॅस बंद करावा आपली भाजी रेडी आहे ही आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी भाजी आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter special chandan batwachi rassa bhaji recipe in marathi healthy recipes srk