हिवाळ्यात विविध प्रकारचे पराठे, हलवा आणि इतर अनेक मिठाई जवळपास प्रत्येकाच्या घरात बनतात. पण, यासोबतच, बहुतेक भारतीय कुटुंबांमध्ये एक ना एक कौटुंबिक रेसिपी असते, जी हिवाळ्यात एकदा तरी बनवायची असते कारण त्यांच्याशिवाय हिवाळा अपूर्ण वाटतो.आज आम्ही तुमच्यासाठी मेथी पुलावची सोपी आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात याची कृती..

मेथी पुलाव साहित्य

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

१ पाव मेथी
आवडीनुसार भाज्या
१ टमाटर
१ कांदाबारीक
१ वाटी हिरव्या पाती चे कांदाबारीक
कोथिंबिर बारीक चिरून
१/२ टीस्पून हळद,
२ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, धनेपुड,
तेज पान, कलमी, मोठी इलाइची
तेल
१ ग्लास तांदूळ
१ टीस्पून तूप

मेथी पुलाव कृती

स्टेप १
सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक चिरून स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि तांदूळ पण पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊ.

स्टेप २
आता कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून त्यात खडे मसाले घालून घेऊ. त्यानंतर जीरा मीरे घालून बारीक चिरलेले कांदे घालून घ्या. त्यानंतर बारीक केलेले भाज्या घालून घेऊ.

स्टेप ३
आता सगळे मसाले घालून परतून घ्यावं. भाज्यांमध्ये मसाले छान परतून झाल्यावर धुतलेले तांदूळ घालून पुन्हा छान परतून घेऊ.

स्टेप ४
आता एक चमचा तूप घालून छान परतून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेले मेथी घालून छान मिक्स करून घ्यावेत. आणि पाणी घालून दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करून घ्यावे.

हेही वाचा >> हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी

स्टेप ५
गरमागरम मेथी पुलाव तयार आहे.

हिवाळा आरोग्यदायी ऋतू असल्यामुळे ‘तब्येतीत’ राहण्यासाठी आणि आणखी तब्येत कमविण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचं आहे.

थंडीचे दिवससुरु झाले आहेत. हा असा ऋतू आहे ज्या काळात आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. थंडीत भूक सुद्धा खूप लागते आणि शारीरिक उर्जा सुद्धा मोठ्या प्रमाणावर हवी असते. खास करून लहान मुलांची या काळात जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत त्यांना जास्त पोषणाची आवश्यकता असल्याने तुम्ही तसे पदार्थ त्यांना खाऊ घालून त्यांची पोषणाची गरज भरून काढायला हवी.

Story img Loader