हिवाळा म्हणजे थंडीचे दिवस आपल्यासोबत अनेक पौष्टिक फळं-भाज्या घेऊन येत असतात. हवामानाप्रमाणे आपल्याला आपला आहार बदलणे गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण सर्व हलके आणि शक्यतो शरीराला थंडावा देतील असे पदार्थ खाणे पसंत करतो. पावसाळ्यात गरमागरम आणि वाफाळते पदार्थ खात असतो. तर हिवाळ्यात शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी आणि आतून उब देणारे पदार्थ खाल्ले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात मेथी या पालेभाजीचा समावेश केल्याने आरोग्याला प्रचंड फायदा होतो. यामध्ये शरीराला आवश्यक असणारे खनिजे, जीवनसत्त्वे इत्यादी घटक मिळत असतात. हाडांना बळकटी देण्यापासून ते मधुमेह आणि हृदयासाठीदेखील ही भाजी चांगली असते असे म्हणतात. त्यामुळे या पौष्टिक भाजीचा समावेश आपल्या आहारात अवश्य करावा. मात्र काहींना ही भाजी किंवा मेथीची चव आवडत नाही; त्यांनी ती थोडी कडसर लागते. पण इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @pawar_omkar या अकाउंटने शेअर केलेल्या या बनवायला अतिशय सोप्या अशा मेथी बटाट्याच्या भाजीची रेसिपी एकदा नक्की बनवून पाहा.

हेही वाचा : Recipe : सोयाबीनची झणझणीत चटणी कशी बनवायची पाहा; रेसिपी आणि प्रमाण लिहून घ्या…

मेथी बटाट्याची भाजी रेसिपी

साहित्य

तेल
मेथी
बटाटे
लसूण
मिरची
मीठ
हिंग
हळद
जिरे पावडर
धणे पावडर

कृती

सर्वप्रथम मेथीची पाने निवडून, चिरून घ्या.
बटाटे उकडून, सोलून त्यांना चौकोनी चिरून घ्यावे.
आता एका पातेल्यात किंवा कढईमध्ये तेल घालून तापू द्या.
तेल तापल्यानांतर, त्यामध्ये बारीक चिरलेले लसूण, मिरची, हळद घालून परतून घ्या.
लसूण हलके सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये हिंग, चिरलेला बटाटा आणि मेथी घालून हलक्या हाताने ढवळून घ्या.
आता शेवटी यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा व्यवस्थित परतून घ्या.
भाजीवर झाकण ठेऊन, एक वाफ येऊ द्या. तयार आहे आपली पौष्टिक मेथी बटाटा भाजी.
ही भाजी तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.

@pawar_omkar या अकाउंटने शेअर केलेल्या अतिशय सोप्या आणि पौष्टिक भाजीच्या रेसिपीला आत्तापर्यन्त २४२K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter special make healthy methi potato bhaji recipe check out the simple steps dha
Show comments