Without Onion Poha Recipe : कांदे पोहे हा अनेक मराठी माणसांचा नाश्त्याचा आवडता खाद्यपदार्थ. त्यामुळे अनेकांच्या घरी रविवारी सकाळचा नाश्ता कांदे पोह्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कित्येक वर्षांपासून हा पदार्थ घरोघरी बनतोय; पण तो खाण्याची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. हल्ली बाहेर कांदे पोह्याचे अनेक प्रकार खायला मिळतात; पण घरी आईने बनविलेल्या कांदे पोह्याची सर मात्र बाहेरील कांदे पोह्यांना येत नाही. ते लक्षात घेऊनच आज आम्ही तुम्हाला याच कांदे पोह्याचा असाच एक स्वस्त आणि मस्त प्रकार सांगणार आहोत. कांद्याच्या वाढत्या किमती पाहता, आम्ही तुमच्यासाठी कांदा न घालता, घरच्या घरी चमचमीत चवदार बटाटा पोहे कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. ती तुम्ही आता रविवारच्या नाश्त्यात नक्की ट्राय करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

१) पाव किलो पोहे
२) २ हिरव्या मिरच्या
३) कढीपत्ता
४) मोहरी (राई)
५) हळद
६) उडीद डाळ
७) चवीनुसार मीठ
८) तेल
८) बटाटा
९) शेंगदाणे

कृती

सर्वप्रथम एका चाळणीमध्ये पोहे भिजवून, झाकण टाकून ठेवा. त्यानंतर एका कढईत तीन चमचे तेल चांगले गरम करा. तेल चांगले गरम होताच, त्यात एक छोटा चमचा उडीद डाळ टाका. उडीद डाळ लालसर होताच, त्यात एक छोटा चमचा मोहरी टाका आणि तीही चांगली तडतडू द्या. आता कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या, शेंगदाणे टाका. त्यानंतर बटाट्याचे बारीक केलेले काप त्यात टाका. अशा प्रकारे सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुमची फोडणी चांगली परतून घ्या. आता कढईवर झाकण ठेवून, बटाटे चांगले शिजू द्या.

यावेळी तुमची फोडणी करपणार नाही याची काळजी घ्या. दोन-तीन मिनिटांनी कढईवरील झाकण काढा आणि त्यात एक चमचा हळद टाकून, पुन्हा फोडणी परतवा. आता लगेच त्यात भिजवलेले पोहे चांगले मिसळा. अशा प्रकारे सर्व झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. आता कढईवर झाकण ठेवा; जेणेकरून पोहे चांगले वाफवले जातील. चार-पाच मिनिटांनी कढईवरील झाकण काढा आणि पोह्यांवर तुम्हाला आवडत असल्यास ओले खोबरे आणि चिरलेली कोथिंबीर टाका आणि पुन्हा एकदा पोहे चांगले परता. त्यानंतर दोन मिनिटांनी गॅस बंद करा. अशा प्रकारे कांद्याचा वापर न करता, तुम्ही घरच्या घरी अगदी चविष्ट असे बटाटा पोहे बनवू शकता.