world egg day 2023: अंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. यात नॅचरल मल्टिव्हिटॅमिन्स असतात. सूपरफुडमध्ये सगळ्यात वरच्या यादीत येतात ती अंडी. अंड्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, हेल्दी फॅटसह अनेक आवश्यक तत्व असतात. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदयासाठी फायद्याचे असते. चला तर याच अंड्याच्या काही खास रेसिपी आज पाहुयात. तुमच्या वेट लॉसची सुरुवात करा अंड्याच्या या ३ हेल्दी रेसिपीने. आजच घरी या टेस्टी रेसिपीज नक्की ट्राय करा..
अंड्याची भजी
- अंड्याची भजी साहित्य
- ४ उकडलेली अंडी, सोलून त्याचे दोन भाग करा
- तळण्यासाठी २ ते ३ चमचे तेल
- २ चमचे तांदूळ पीठ लेप साठी
- १ टीस्पून चिली फ्लेक्स
- २ चमचे काळी मिरी पावडर
- आले-लसूण पेस्ट १ टेस्पून
- हळद १/४ टीस्पून
- कढीपत्ता
- चवीनुसार मीठ
- पाणी
अंड्याची भजी कृती
- कोट करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र मिसळा. या कोटिंगमध्ये उकडलेले अंडी घाला. आता अंडी तेलात तळून घ्या. नंतर गरमागरम सर्व्ह करा.
दुसरी रेसिपी अंडा तवा फ्राय
ही एक मसालेदार तिखट चवीची डिश आहे जी भात आणि रोटीबरोबर साइड डिश म्हणून खाल्ली जाते.
अंडा तवा फ्राय साहित्य
- ३ अंडी
- २ चमचे तेल
- अर्धा चमचा मोहरी
- २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
- २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
- १ टीस्पून हळद पावडर
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- कढीपत्ता
- चवीनुसार मीठ
अंडा तवा फ्राय कृती –
- नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरीची फोडणी, चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेलात टाका.
- आता चिरलेला कांदा आणि सर्व कोरडे मसाले घाला.
- मसाल्यामध्ये अर्धी चिरलेली अंडी घाला आणि चांगले मिसळा, वर काळी मिरी पावडर घाला.
- मंद आचेवर शिजू द्या आणि मध्येच ढवळून घ्या. ५ मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करून गरमागरम सर्व्ह करा.
हेही वाचा >> नवरात्रीच्या उपवासाला बनवा झटपट आणि पौष्टिक ‘भगर पुलाव’, पटकन नोट करा रेसिपी
तिसरी रेसिपी तंदूरी अंडा
तंदूरी अंड्यासाठी लागणारे साहित्य
- चार उकडलेली अंडी, चवीनुसार मीठ
- अर्धा चमचा लाल तिखट
- एक चमचा लिंबाचा रस
- अर्धा चमचा चाट मसाला
- चार चमचे दही
- एक चमचा तंदुरी मसाला, दोन चमचे बेसन
- मोहरीचे तेल, कोथिंबीर.
तंदूरी अंडी कशी बनवायची?
- तंदूरी अंडी बनवण्यासाठी मॅरीनेड तयार करा. मॅरीनेशनसाठी एका भांड्यात बेसन आणि दही एकत्र करा. लिंबाचा रस, लाल तिखट, तंदुरी मसाला आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या. तंदूरी मॅरीनेशन तयार आहे.
- अंडी पाण्यात टाका आणि उकडून घ्या. उकडल्यानंतर त्याची साल काढा. त्याचे लहान तुकडे करा आणि त्यांना चांगले मॅरीनेट करा. संपूर्ण मसाले अंड्यांवर चांगलेलागल्यानंतर साधारण अर्धा तास ठेवा.
- नंतर गॅसवर तवा गरम करा. त्यात मोहरीचे तेल घालून चांगले तापू द्या. त्यात मॅरीनेट केलेली अंडी घाला.
- अंडी चांगले शिजू द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही तंदूरी अंडी ग्रिलरवरही शिजवू शकता. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत अंडी पॅनवर शिजवा.
- गॅस बंद करून पॅनमध्ये गरम गरम सर्व्ह करा. जर तुम्हाला ओव्हनमध्ये तंदूरी अंडी शिजवायची असतील, तर अंडी एका ट्रेमध्ये सर्व मसाल्यांनी गुंडाळून ठेवा आणि १८० डिग्री सेल्सिअस तापमानावर दहा मिनिटे शिजवा. तंदूरी अंडी काही वेळात तयार होईल.