ज्वारीच्या बिस्किटांचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतं. कारण ज्वारीच्या दाण्यामध्ये लायसीन नावाचे अमिनो आम्ल खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे ज्वारीच्या प्रथिनांची प्रत कमी दर्जाची असते. पण ज्वारीच्या पिठात पौष्टीक तत्व असल्याने त्याचं सेवन केल्यास शरीराला आवश्यक एनर्जी मिळते. मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केलेली बिस्किट खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
कारण अशा बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेट फॅट मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, ज्वारीपासून बनवलेली बिस्किटे खाणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. ज्वारीचे बिस्किट खाल्ल्यानंतर वजनही वाढत नाही. त्यामुळे ज्वारीच्या बिस्किटांनी सोपी आणि साधी रेसिपी तुम्ही नीट समजून घ्या.
साहित्य – ज्वारीचे पीठ दीड वाटी (१५० ग्रॅम), दळलेली साखर दीड वाटी (१५० ग्रॅम), तूप दीड वाटी, बेकिंग पावडर १ चमचा, व्हॅनिला इसेन्स २ थेंब
कृती – ज्वारीचे पीठ, बेकिंग पावडर एकत्र करुन चाळून घ्या. तूप चांगले घोटून मऊ करा व त्यात दळलेली साखर मिसळून घ्या. नंतर व्हॅनिला इसेन्समध्ये २ थेंब टाका व त्यात पीठ एकत्र करुन एक गोळा करुन घ्या. नंतर त्याची पराठ्याच्या जाडीची पोळी लाटा. कटरच्या साहाय्याने वेगवेगळ्या आकाराची बिस्किटे कापून घ्या आणि प्रीहीटेड ओव्हनमध्ये १८० सेल्सिअस तापमानास सोनेरी रंग येईपर्यंत भाजा (साधारण १५ ते २० मिनिटे)