अनेकदा आयुष्यात जे हवं असतं त्याच्या मागे आपण इतके पळत जातो की आवडती गोष्ट नाही मिळाली तर जगूच शकणार नाही, असा ग्रह होऊन बसतो. त्यामुळे ती गोष्ट हातून निसटून जाऊ नये याचा आटोकात प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. पण आपल्याला आवडणारी गोष्ट इतर पर्यायांनीही मिळवता येऊ शकते हे मानायला आपलं मन आणि बुद्धी तयार नसते अशावेळी काय करावं, याची उकल ‘टीटीएमएम’ म्हणजे ‘तुझं तू माझं मी’ हा सिनेमा बघताना होते.

सध्या लग्न करायचं नाही आणि एकदा का लग्न केलं तर बंधनात अडकू या विचाराने जय म्हणजेच ललित प्रभाकर ऐन लग्नातून पळून जातो तर दुसरीकडे राजश्री म्हणजे नेहा महाजनही लग्न ठरलंय म्हणून घरातून पळून जाते. योगायोगाने जय आणि राजश्री सह-प्रवासी बनतात. प्रवासादरम्यान त्यांच्यात भांडणं होतात, नंतर मैत्री होते आणि नंतर पुन्हा भांडण होतात. पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास गोव्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि परत पुण्यात येऊनच थांबतो. या मधल्या प्रवासात त्यांना लग्नाचं नाटक करावं लागतं. यात दोघांच्याही मनाविरुद्ध त्यांचं खरंखुरं लग्नही होतं. पण गोव्यातलं लग्न गोव्यातच राहील हा विचार करुन ते दोघंही गोव्यात आयुष्य एन्जॉय करत असतात. पण या दरम्यान दोघांचेही घरातले त्यांना शोधत गोव्यापर्यंत पोहोचतात. त्यांचं लग्न झालेलं पाहून त्यांनाही मोठा धक्का बसतो. पण त्यांना लग्न का करावं लागतं. नंतर त्या लग्नाचं काय होतं आणि नंतर ते खरंच एकत्र राहतात का हे जाणून घेण्यासाठी टीटीएमएम हा सिनेमा एकदा तरी पाहावा असा आहे.

Chiki Chiki Bubum bum marathi movie
चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; बॅकबेंचर्स मित्रमंडळींच्या रियुनियनची धमाल मस्ती
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
chhaava movie santosh juvekar talks about last scene of movie
“आपले महाराज एकटे…”, ‘छावा’मधला ‘तो’ शेवटचा सीन आठवून संतोष जुवेकरचे डोळे पाणावले; साकारतोय ‘ही’ भूमिका
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…

सिनेमा पाहताना आपण फार काही नवीन किंवा वेगळं पाहतोय असं वाटत नाही. पण एक हलका फुलका सिनेमा म्हणून टीटीएमएमकडे नक्कीच पाहिले जाऊ शकते. फार फाफड पसारा न लावता हा सिनेमा लवकर संपतो. पुर्वार्ध जेवढा रंगत जातो तेवढाच उत्तरार्ध संथ वाटतो. त्यामुळे सिनेमा संपताना अनेक गोष्टी अर्धवट सुटल्या असे वाटत राहते. याशिवाय दिग्दर्शक कुलदीप जाधव याला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण त्या नीट मांडता आल्या नाहीत असे वाटत राहते.

या सिनेमात सह-कलाकारांची फौजही भारी आहे. विद्याधर जोशी, सविता मालपेकर, सतीश पुळेकर, सीमा देशमुख, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या प्रत्येकाच्याच व्यक्तिरेखा लक्षात राहणाऱ्या आहेत. पण त्यातही सिनेमात जी काही विरंगुळेची जागा हे त्यात एकतर सागर कारंडे दिसतो किंवा बालकलाकार पुष्कर लोणकर. पुष्करचा अभिनय आधीच्याही सिनेमांमधून दिसण्यात आला आहे. पण या सिनेमात त्याचा योग्य तो वापर करण्यात नाही आला असंच म्हणावं लागेल. जय- राजश्री म्हणजे ललित आणि नेहा यांची चांगली केमिस्ट्री सिनेमात दिसते. ललित जितका सहज वावरताना दिसतो तेवढी नेहा दिसत नसली तरी दोघांची मेहनत सिनेमा बघताना नक्कीच दिसून येते.

सिनेमाचा काही भाग गोव्यात चित्रीत करण्यात आल्यामुळे सिनेमा पाहताना गोव्याचं ओझरतं दर्शन घडतं. पण सिनेमॅटोग्राफी अजूनही चांगली होऊ शकली असती हे मात्र नक्की. सिनेमातील काही गाणी चांगली आहेत. सिनेमात कोणत्याच ठिकाणी अतिशयोक्ती दिसत नाही, हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. एका लयीत सिनेमा पुढे सरकत जातो आणि तसा तो संपतो.

सिनेमा- टीटीएमएम- तुझं तू माझं मी

दिग्दर्शक- कुलभूषण जाधव

कलाकार- ललित प्रभाकर, नेहा महाजन, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, सतीश पुळेकर, सीमा देशमुख, भारत गणेशपुरे, पुष्कर लोणकर, सागर कारंडे

– मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com

Story img Loader