पी. चिदम्बरम

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे

बंदीवासात असणे.. कुठलाही आरोप नाही, गुन्हा काय हे कुणी सांगतही नाही, तरीही बंदीवासात असणे.. हा अनुभव करोनाने जगाला देण्यापूर्वीदेखील जगभरच्या अनेक देशांमध्ये, अनेक विखारी राजवटींनी अनेकांना दिलेला आहे.. चला तर, आपणही घरबसल्या त्या देशांची स्थिती पाहू..

जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडे जी माहिती दिली आहे, त्यानुसार २०५ देशांत कोविड १९ म्हणजे करोना विषाणू पसरला आहे. अतिशय सूक्ष्म असलेला हा विषाणू सजीवांच्या शरीरात गेल्यानंतरच सक्रिय होतो. विषाणू हे सर्वानाच बाधित करू शकतात, अगदी जीवाणूंनाही विषाणूचा संसर्ग होतो. विषाणू हा मानव किंवा कुठल्याही सजीवाच्या शरीराबाहेर असताना जिवंत नसतो, शरीरात प्रवेश केल्यानंतर तो सक्रिय होतो, त्याची पुनरुत्पत्ती होते. विषाणूबाबत एवढी प्राथमिक माहिती या स्तंभातील विवेचनापूर्वी गरजेची आहे.

सुरुवातीला या विषाणूच्या नामकरणावरून मतभेद होते, वेगवेगळ्या नावाने त्याचा उल्लेख केला जात होता, पण जागतिक आरोग्य संघटनेने अखेर त्याला ‘कोविड १९’ (करोना) असे नाव दिले. या विषाणूचा धोका पहिल्यांदा ओळखला तो चीनचे डॉक्टर ली वेनलियांग यांनी. तेव्हा चालू होता २०१९ मधला अखेरचा महिना डिसेंबर. त्यांनी हा नवीन विषाणू असून त्यापासून सावध राहावे, असे मत समाजमाध्यमांवर व्यक्त करताच चिनी पोलिसांनी त्यांना बोलावून घेऊन कानउघाडणी केली, ‘अशा अफवा पसरवत जाऊ नका,’ अशी तंबी दिली. अफवा पसरवल्याचा कबुलीजबाब त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला. नेत्ररोगतज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरचा ७ फेब्रुवारी २०२० रोजी दुर्दैवी अंत झाला. त्यांचे वय होते अवघे ३३. नंतर करोनाने आपले रंग दाखवले व चीनच्या अधिकाऱ्यांना या डॉक्टरची माफी मागण्याची वेळ आली. वेनलियांग यांनी म्हटल्याप्रमाणे तो नवीन विषाणूच असल्याचे सिद्ध झाले होते. त्यांनी त्याचा धोका वर्तवल्यानंतर १०० दिवसांत या विषाणूने जगभरात थैमान घातले.  हा विषाणू नंतर चीनच्या सीमांपुरता मर्यादित न राहता जगभरात वणव्यासारखा पसरला. त्याने देशांच्या सीमा ओलांडल्या. त्याने धर्म, जात, वंश, लिंग, जन्मठिकाण असा कुठलाही भेदाभेद न पाळता सगळ्यांनाच स्पर्श केला. भारतीय राज्यघटनेतील कलम १४ व १५ या समानतेच्या तत्त्वांचे त्याने पालन केले असेच म्हणावे लागेल.

हतबल नेते

महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजे या पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली माणूस; पण त्यांच्यावरही करोनाचे हे थैमान हतबल होऊन पाहण्याची वेळ आली. अमेरिकेत  ६ एप्रिलपर्यंत ३,३७,३०९ लोकांना संसर्ग झाला तर ९६२० बळी गेले; म्हणजेच जगातील सर्वाधिक करोना रुग्ण अमेरिकेत असल्याचे दिसून आले. अमेरिकेत या करोना साथीत किमान १ लाख ते २ लाख ४० हजार जण मरण पावतील असा अंदाज देण्यात आला आहे. अमेरिकेचे लष्कर जगात सर्वात शक्तिशाली आहे, पण ते काही करू शकले नाही. अमेरिकेकडे जगातील बरीच संपत्ती एकवटलेली आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. डॉलर एरवी दिमाखात असतो. पण तरीही तो युरो व युआन या युरोप व चीनच्या चलनांप्रमाणेच कमकुवत ठरला.

करोनाचे थैमान सुरू असताना काही देशांच्या नेत्यांनी- मग ते लोकशाही किंवा हुकूमशाही असलेल्या देशातील असोत-  नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले नाही. ‘बॅडलँड्स’या १९७८ सालच्या गाण्यात ब्रुस स्प्रिंगस्टीन म्हणतो की, सर्वावर निरंकु श अधिराज्य गाजवूनही राजा असमाधानीच राहिला.  हेच वाक्य आताच्या परिस्थितीस लागू पडते. आजच्या नेत्यांची कृती व त्यांनी वापरलेली साधने किती कमकुवत आहेत याचे दर्शन स्पष्टपणे होते आहे. यात काही हुकूमशहा आहेत, काही ठिकाणी संसद ही केवळ रबरी शिक्क्यासारखी आहे, काही ठिकाणी न्यायालये, इतर संस्था, गुप्तहेर यंत्रणा यांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना महिने, काही वर्षे कुठलाही आरोप नसताना तुरुंगात टाकण्यात आले.. पण ही साधने आता करोनापुढे कुचकामी आहेत.

दडपणारा व दडपला गेलेला..

आज परिस्थिती बघितली तर सगळे जगच बंदिशाळा बनले आहे. एरवी दडपशाही करणारे व दडपशाही सहन करणारे दोघेही आता एकाच तुरुंगात आहेत.

आता तुम्ही घरातच कुलूपबंद आहात, तर एक खेळ मी तुम्हाला खेळायला सांगणार आहे..

.. त्यासाठी जगाचा नकाशा लॅपटॉप वा स्मार्टफोनवर डाऊनलोड करा. तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला एकेक देश ओळखायला सांगा. नंतर त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारा की, तुम्ही ज्या देशाचे नाव सांगितले त्या देशाने आरोपाविनाच लोकांना तुरुंगात टाकले का, याच्या उत्तरासाठी आपण दक्षिण अमेरिकेपासून सुरुवात करू. व्हेनेझुएला या देशात तीस विरोधी पक्ष नेत्यांचे संसदीय संरक्षण अध्यक्ष निकोलस मादुरो यांची बटीक असलेल्या न्यायव्यवस्थेने काढून घेतले. ते आता विजनवासात आहेत किंवा तुरुंगात आहेत. आफ्रिकेकडे वळालो तर आणखी भीषण चित्र दिसते. इथिओपियात २०१८ मध्ये अबिय अहमद हे पंतप्रधान झाले. त्यांनी एरिट्रियाबरोबर जुळवून घेतले व शांततेचे नोबेल पारितोषिक पटकावले. पण तेथे २०१९ या संपूर्ण वर्षांत इंटरनेट सेवा बंद होती. तेथे ६४ जणांचे न्यायबाह्य खून पाडले गेले, १४०० लोकांना विनाकारण तुरुंगात टाकण्यात आले. टांझानियात अध्यक्ष ज्ॉन मागुफुली यांनी विरोधी खासदार, पत्रकार यांना अटक केली. माध्यमे बंद केली. मतभेदाचे सूर दाबून टाकले. युरोपमध्ये मिश्र चित्र आहे. तेथे काही काही मोठे लोकशाही देश आपल्या परंपरेचा अभिमान सांगतात, पण तरीही दडपशाही आहेच. हंगेरीचे उदाहरण घ्या. तेथे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांनी कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ यांना दडपून आपण म्हणतील तेच मान्य करायला लावले. ओर्बान यांच्या सरकारने केंद्रीय युरोपीय विद्यापीठे बंद करून ‘इंटरनेट कर’ लागू केला. ३० मार्चला ओरबान यांनी आणीबाणीचा कायदा मंजूर केला. आता त्यांना हवे तसे राज्य करण्याचा परवानाच मिळाला आहे. ते कितीही काळ राज्य करू शकतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मनाला वाटेल त्या घटनात्मक सुधारणा मंजूर करून घेतल्या. मॉस्कोत हजारो निदर्शक रस्त्यावर आले, पण त्यांना लाठय़ाकाठय़ा मारून हाकलण्यात आले. दोन हजार जणांना तुरुंगात टाकले गेले. अनेकांवर गुन्हेगारी खटले दाखल केले गेले. राजकीय विरोधकांना गजाआड करणे तर रशियात नवीन नाही, तेथे पोलीस अधिकारीच लोकांवर अत्याचार करतात, मुलांना तुरुंगात टाकले जाते. या मुलांच्या आई-वडिलांना धमकावले जाते. त्या देशात आजही दोनशे राजकीय कैदी आहेत. आशियातील देशांचा विचार करता परिस्थिती वेगवेगळी आहे. तेथील काही देशात लोकशाही आहे असे म्हणणे अवघड आहे. थायलंडचे उदाहरण घ्या- तेथे नवीन सरकारचे नेतृत्व पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्याकडे आहे. तेथे राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले. मानवी हक्क रक्षकांना अचानक गायब केले गेले. गुन्हेगारी दंडसंहिता वापरून अभिव्यक्तिस्वातंत्र्य संपवण्यात आले आहे. कंबोडियात २०१८ मध्ये निवडणुका झाल्या. अतिशय टोकाच्या दडपशाहीतच निवडणुका झाल्याने लोकांपुढे मतदानाचे कुठले स्वातंत्र्य नव्हते. प्रमुख विरोधी पक्षावर बंदी घालण्यात आली होती. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले किंवा त्यांची विजनवासात रवानगी केली. माध्यमे व नागरी समुदाय यांचे पंख छाटण्यात आले.. परिणाम म्हणून सत्ताधारी पक्षाने सर्वच जागा जिंकल्या!

विजय मानवतेचाच होईल

हे सगळे चित्र पाहून कुणाच्याही मनात मळभ दाटून येईल. कुठलाही खंबीर, मजबूत, शक्तिशाली नेता करोना विषाणूला रोखू शकला नाही व रोखू शकणार नाही; पण करोनाच्या साथीवर मानवता विजय मिळवणार आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. तामिळनाडूतील आजच्या कवींपैकी अव्वल दर्जाचे कवी वैरामुथू यांनाही तसेच वाटते. त्यांनी करोना विषाणूवर एक सुंदर कविता केली आहे. त्याचे स्वैर रूपांतर येथे देत आहे :

अणुपेक्षा इवलासा तू

अणुबॉम्बपेक्षा मारक तू

चाहूलही लागू न देता येणारा तू

युद्ध न करताही विनाश करणारा तू

.. .. ..

पण करोना.. तुझेही करू निर्मूलन

मानवच शेवटी बांधेल विजयपताका

.. करोना विषाणूच्या साथीविरोधातील हे युद्ध मानवच जिंकणार आहे, हे तर खरेच. पण जगात लोकांच्या स्वातंत्र्याला पायदळी तुडवणारे उन्मत्त हुकूमशहा, अनियंत्रित सत्ताधीश तसेच आपल्या मनगटाच्या जोरावर सामान्य गोरगरीब जनतेला चिरडण्याचे मनसुबे बाळगून असलेल्यांच्याही विरोधात मानवताच जिंकणार आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN