भारत
सात वर्षांचा तुरुंगवास
भारतीय कायद्यानुसार बलात्कार म्हणजे स्त्रीच्या मर्जीशिवाय तिच्याशी केला जाणारा संभोग. यात धाकाखाली किंवा सोबत असलेला आपला पतीच आहे, या गैरसमजुतीतूनही जर संभोग झाला तर त्याला बलात्कार धरले जाते. या गुन्ह्य़ासाठी सात ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
सामूहिक बलात्कार किंवा १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी दहा वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या हाताखालील महिलेवर बलात्कार केल्यास त्यालाही तितक्याच शिक्षेची तरतूद आहे. परिस्थितीनुसार शिक्षेत कपात करण्याची वा कमी शिक्षा देण्याची मुभा न्यायालयांना आहे.
अत्याचारांची संख्या : ७२,७५६ (२०१०)

दक्षिण आफ्रिका
परिपूर्ण प्रयत्न
लैंगिक अत्याचाराच्या सर्वच प्रकारांना तसेच एचआयव्ही फैलावालाही गुन्ह्य़ाच्या कक्षेत आणणारा आणि महिलांचे हित काटेकोरपणे जोपासणारा असा दक्षिण आफ्रिकेचा कायदा म्हणजे हे गुन्हे रोखण्यासाठीचा एक परिपूर्ण प्रयत्न आहे. फौजदारी कायदा (लैंगिक अत्याचार आणि संबंधित बाबी) हा २००७ चा कायदा बळजबरीने चुंबन तसेच गुप्तांगांना स्पर्श करण्यापासून ते बलात्कारापर्यंत प्रत्येक गुन्ह्य़ाला सजेची तरतूद करतो.
दहशतवाद, बंडखोर चळवळी आणि त्यातून आलेले बालसैनिकांचे गट यातील लैंगिक अत्याचारांचा विचारही या कायद्यात आहे. शस्त्राच्या धाकाने दुसऱ्याला बलात्कार करायला लावणे वा शरीराची विटंबना करणे, हा गुन्हा म्हणून नमूद आहे. बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केलेले तसेच मानसिक अपंग व्यक्तीवर बलात्कार केलेल्या नराधमांची यादीच जाहीर केली जात असून त्यांना लहान मुलांशी वा अपंगांशी संबंधित नोकऱ्यांमध्ये भरती करता येत नाही. बलात्कारासाठी मृत्युदंडाची मात्र सजा नाही.
ब्रिटन
जन्मठेपेची तरतूद
स्त्रीहक्क कायद्यांनुसार सर्व तऱ्हेच्या लैंगिक अत्याचारांसाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद असून जन्मठेपेचीही तरतूद आहे. एखाद्याला लैंगिक भावनेतून त्याच्या मनाविरुद्ध स्पर्श करणेही गुन्हा असून त्यासाठी सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. एखाद्याला लैंगिक व्यवहारात बळजबरीने सहभागी व्हायला लावणे हादेखील गुन्हा असून त्यासाठी सहा महिन्यांपासून ते जन्मठेपेपर्यंतची सजा आहे.
अत्याचारांची संख्या : ४५,३२६

Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

ऑस्ट्रेलिया
व्यापक आणि विविधांगी
या देशातील प्रांतागणिक बलात्काराविषयक कायदे आणि शिक्षेचे स्वरूप वेगवेगळे आहे. बलात्काराची व्याख्या मात्र सर्वच राज्यांत बहुतांश एकसमान आहे. एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याशी होणारा कोणत्याही प्रकारचा संभोग हा बलात्कार आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये सामूहिक बलात्कारासाठी तसेच अपहरण व बलात्कारासाठी जन्मठेपेची सजा आहे. मर्जीविरुद्धच्या शरीरसंबंधासाठी १४ तर हिंसक बलात्कारासाठी २० वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. व्हिक्टोरिया राज्यात बलात्कारासाठी २५ वर्षांची
सजा आहे. विनयभंगासाठी १० वर्षांच्या तुरुंगवासाची सजा आहे.
अत्याचारांची संख्या : ३,३७८ (२०१०)

चीन
मृत्युदंडाचीही तरतूद
अमानुष बलात्कारासाठी मृत्युदंड ठोठावणाऱ्या मोजक्या देशांत चीनचा समावेश आहे. बळजबरीने, धाकाने, जुलमाने किंवा फसवून होणारा बलात्कार शिक्षेस पात्र असून त्यासाठी तीन ते दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास ठोठावला जातो. पीडित मुलीचे वय १४ पेक्षा कमी असेल तर शिक्षा अधिक कठोर होते. अनेक महिलांवर एकाच वेळी बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार तसेच बलात्कारित महिलेला अमानुष वा जीवघेणी मारहाण यासाठी मृत्युदंड ठोठावला जातो.

पाकिस्तान
फाशी
बलात्कारासाठी कमाल शिक्षा म्हणून पाकिस्तानातही फाशीची तरतूद आहे. सर्वसाधारणपणे महिलेच्या मनाविरुद्ध बळजबरीने होणारा संभोग हा बलात्कार असून त्यासाठी १० ते २५ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. सामूहिक बलात्कारासाठी जन्मठेप ते फाशीची तरतूद आहे.
अनैसर्गिक संभोगासाठीही दोन वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे.

अमेरिका
९९ वर्षांचा तुरुंगवास !
अमेरिकेतही राज्या-राज्यांत बलात्कारविषयक कायदे वेगवेगळे आहेत. वॉशिंग्टनमध्ये बलात्कारासाठी पाच वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. मानसिकदृष्टय़ा अपंग तसेच व्यसनाधीन व्यक्तींना संभोगाला रुकार वा नकार देण्याचीही मानसिक क्षमता नसते हे लक्षात घेऊन अशा बलात्कारासाठीही तुरुंगवास आहे, मात्र त्यात जन्मठेपेची तरतूद नाही. टेक्सासमध्ये कोणत्याही प्रकारचा बलात्कार ज्यात हिंसेचाही उद्रेक आहे तसेच ज्यामुळे स्त्री जायबंदी होते वा दगावते अशा गुन्ह्य़ासाठी पाच वर्षांपासून ९९ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. सामूहिक बलात्कार, १४ वर्षांखालील मुलीवर बलात्कार आणि अमली पदार्थ देऊन केला जाणारा बलात्कारही गंभीर गुन्हा असून त्यासाठीही मोठय़ा शिक्षेची तरतूद आहे. िहसक अत्याचार नसलेल्या बलात्काराच्या गुन्ह्य़ांसाठी दोन ते २० वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जातो. व्हर्जिनिया आणि कनेक्टिकट येथे शारीरिक व लैंगिक अत्याचाराला समान शिक्षा आहे.
अत्याचारांची संख्या : ९०,७५० (२०१०)
(यात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचारांचा समावेश नाही.)

कॅनडा
स्पर्शही गुन्हा
लैंगिक अत्याचार आणि लैंगिक भावनेने स्पर्श या दोन्हींसाठी कॅनडात शिक्षा आहे. यात १६ वर्षांखालील व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही
भागास लैंगिक हेतूने स्पर्श करणेही शिक्षापात्र
गुन्हा आहे. बलात्कारासह शारीरिक मारझोड
वा अत्याचारासाठी जन्मठेपेपर्यंत सजा
असून प्रथमच गुन्हा करणाऱ्यास पाच
वर्षांची सजा आहे.
अत्याचारांची संख्या : २६,६६६ (२०१०)
रशिया
कमाल सजा १५ वर्षे
िहसाचार अथवा हिंसेची भीती घालून अथवा स्त्रीच्या असहाय़ स्थितीचा फायदा उठवून केलेल्या संभोगास रशियन कायद्याने बलात्कार मानले आहे. त्यासाठी तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारास वा सामूहिक बलात्कारास ४ ते १० वर्षे, तर १४ वर्षांखालील व्यक्तीवरील बलात्कारास ८ ते १५ वर्षे सजा आहे.
बलात्काराचे पर्यवसान मृत्यूत झाले तरी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची सजा आहे. हिंसेचा धाक दाखवून समलिंगी संभोग करणाऱ्यासही तीन ते सहा वर्षांच्या तुरुंगवासाची सजा आहे.
अत्याचारांची संख्या : १५,७७० (२०१०)

स्वीडन
१० वर्षे सजा
स्वीडनच्या कायद्यानुसार बळाने होणाऱ्या संभोगाच्या सर्व तऱ्हांना बलात्कार मानले आहे. बलात्कारासाठी २ ते ६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. सामूहिक बलात्कार, हिंसाचार व अत्याचार यासह बलात्कार यासाठी ४ ते १० वर्षे तुरुंगवास ठोठावण्याची तरतूद आहे.
अत्याचारांची संख्या : १७,१६७ (२०१०)