डॅन ब्राऊन आजघडीला जगातील सर्वात ‘बेस्टसेलर’ लेखक आहे. त्याची ‘द दा विंची कोड’(२००३) ही थरार कादंबरी आजही अमेरिका-ब्रिटनच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकांच्या यादीत आहे. ख्यातनाम इटालियन चित्रकार, लेखक, शिल्पकार लिओनार्दो दा विंची यांच्या चित्रांतील खाणाखुणा, चिन्हांत दडलेली सांकेतिक भाषा उलगडत शतकानुशतकांचे ‘गूढ’ उकलणाऱ्या हॉर्वर्ड विद्यापीठाचा चिन्हतज्ज्ञ प्राध्यापक रॉबर्ट लँगडनची ही कादंबरी वाचकांनी इतकी डोक्यावर घेतली की तिच्या जोरावर ब्राऊनच्या आधीच्या न खपलेल्या तीन कादंबऱ्याही ‘बेस्टसेलर’ यादीत जमा झाल्या. प्राचीन काळातील ख्यातनाम कलाकारांच्या जगप्रसिद्ध कलाकृतींमधील ‘गुप्त’ कोडय़ांची साखळी उलगडत कथासूत्राचा शेवट गाठणाऱ्या लँगडन मालिकेतील ‘एंजल्स अॅण्ड डेमन्स’ आणि ‘द लॉस्ट सिम्बॉल’ या त्याच्या आधीच्या थरार कादंबऱ्यांनीही सर्वाधिक वाचकपसंती मिळवली. अलीकडेच याच मालिकेत ‘इन्फनरे’ची भर पडली आहे. अमेरिका-ब्रिटनमधील सर्वाधिक वाचकपसंती असलेल्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक जमा झालं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा