भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पडद्याआडच्या वाटाघाटींचा इतके दिवस कुजबुजीतील तपशील एका पुस्तकात सविस्तर येतो.. यात धक्का आहे तो अधिकृततेच्या दाव्याचा!
मूळचे एकसंध; पण राजकीय-धार्मिक दुभंगातून एकाचे दोन झालेल्या आणि अपरिहार्य भौगोलिक वास्तवामुळे एकाच वेळी एकमेकांचे शेजारी आणि शत्रूही असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील वास्तवाची ही नव्याने उजेडात येत असलेली कहाणी. फाळणी नावाच्या विलगीकरणानंतर हे दोन्ही देश आपापले राष्ट्रीय दिन साजरे करीत असताना प्रकट होत असलेली ही कहाणी एकमेकांतील कटू वास्तवाची जाणीव करून देते. ती समोर येते या आठवडय़ात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातून. अॅड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क यांनी ही कथा अधिकृत दाखले देत, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांस अधिकृतपणे उद्धृत करीत लिहिली आहे. म्हणजे ती सांगोवांगी नाही. म्हणून ती दखलपात्र. तिची चर्चा करण्यापूर्वी या लेखकद्वयीविषयी. यातील अॅड्रियन लेव्ही हे पत्रकार-माहितीपटकार असून ते लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या ‘द गार्डियन’ या कडव्या उदारमतवादी दैनिकासाठी बातमीदारी करतात. २००८ साली नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यांवरील त्यांचे ‘द सीज’ हे पुस्तक जागतिक राजकारणावर नजर ठेवून असणाऱ्यांनी वाचलेले असेल वा निदान ते ठाऊक तरी असेल. कॅथी यादेखील क्रियाशील बातमीदार असून त्या लंडनच्याच ‘द टाइम्स’ या तुलनेने नेमस्त दैनिकासाठी लेखन करतात. या दोघांचे सहलेखन अभ्यासकांत चर्चेचा विषय असले तरी त्यांचे हे आगामी पुस्तक त्यांच्या आतापर्यंतच्या लेखनाच्या तुलनेत अधिक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कारण या द्वयीने निवडलेला विषय आणि त्यातील त्यांचा निष्कर्ष. ‘‘२०१९ साली बालाकोट घडायचे होते तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत पडद्यामागे सतत संवाद सुरू असून उभय देशांचे सर्वोच्च गुप्तचर अधिकारी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत’’, अशा खळबळजनक तपशिलासह अन्य अनेक मुद्दय़ांवरील महत्त्वाचे दुवे या पुस्तकातून समोर येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा