आयसिसचा दहशतवाद हा फक्त एका विशिष्ट धर्मविचारास विरोध करीत नाही. विविधता आणि आधुनिकता यांनाच या दहशतवाद्यांचा विरोध आहे..

कोणत्याही इस्लामी व्यक्तीने पापी बिगरइस्लामी आणि पाप्यांना मदत करणाऱ्या इस्लामी व्यक्तीसदेखील बेलाशक ठार मारावेअसे जाहीर आवाहन केले गेल्यानंतर या संघर्षांचे स्वरूप केवळ धर्मापुरते राहत नाही. पाश्चात्त्य देशांना घर मानून राहणारे इस्लामधर्मीय हेदेखील यापुढे आयसिसचे लक्ष्य असतील, तेव्हा या संघटनेचा भस्मासुर हाताळण्यासाठी अधिक शहाणपणाची गरज आहे..

grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

अमेरिकेतील ओर्लँडो येथे झालेल्या ताज्या दहशतवादी हल्ल्यात आयसिस या दहशतवादी संघटनेचा हात प्रत्यक्षात आहे किंवा काय, हा प्रश्न गौण आहे. तो निर्माण झाला कारण या हल्ल्यातील आरोपी ओमार मातीन याने हल्ला करण्यापूर्वी स्थानिक आणीबाणी मदत यंत्रणेला फोन केला आणि आपल्या निष्ठा आयसिस या संघटनेला वाहिलेल्या असल्याचे जाहीर केले. यावेळी त्याने २००१ साली झालेल्या ९/११ दहशतवादी हल्ल्याचाही संदर्भ दिला. त्यानंतर त्याने निर्घृणपणे आसपास जमलेल्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात ५० जणांचे प्राण गेले आणि त्याहूनही अधिक जखमी झाले. ९/११ च्या हल्ल्यास १५ वर्षे झाली. त्यानंतर इतके बळी घेणारा हा अमेरिकेतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. ९/११ झाले त्या वेळी आयसिस जन्मास यावयाची होती. त्या वेळी अल कईदा आणि तालिबान हीच इस्लामी दहशतवादाची दुहेरी ओळख होती. परंतु कालच्या हल्ल्यातील मारेकरी मातीन याचा अल कईदा, तालिबान वा आयसिस या संघटनांशी प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. त्याचमुळे या हल्ल्याचा निषेध करताना अध्यक्ष बराक ओबामा यांनी कोणतीही संघटना वा धर्म यांचे नाव घेतले नाही. तरीही या हल्ल्यामागे आयसिसचा हात असल्याचा संशय व्यक्त होतो आणि या ओमार मातीन याचा या संघटनेशी संबंध आला कोठून याची चर्चा होते. तशी ती होणे नैसर्गिक असले तरी ओमार याचे आयसिसशी संबंध अया हल्ल्यामागे आयसिसचा हात असल्याचा संशय व्यक्त होतो सणे वा नसणे हे अत्यंत फजूल आहे. का, ते जाणून घेण्यासाठी आयसिसच्या कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा लागेल.

जगाच्या पाठीवरील कोणत्याही इस्लामी व्यक्तीने पापी बिगरइस्लामी आणि पाप्यांना मदत करणाऱ्या इस्लामी व्यक्तीसदेखील बेलाशक ठार मारावे आणि तसे ते मारण्यापूर्वी आपल्या निष्ठा आयसिसच्या चरणी वाहाव्यात. तसे केल्यास हल्लेखोर व्यक्तीचे पाप धुऊन जाते आणि ही हल्लेखोर व्यक्ती स्वर्गलोकी जाते, अशा प्रकारचे आवाहन रमझानचा पवित्र महिना सुरू होण्यापूर्वी आयसिसच्या वतीने केले गेले. या संघटनेचा प्रवक्ता अबू महंमद अल अदनानी याने केलेल्या या आवाहनात जगभर इस्लाम विरोधकांविरोधात मोहीम हाती घेण्याची भाषा केली. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्या विरोधात अशी मोहीम काढावयाची त्यात अदनानी याने इस्लामींचाही समावेश केला असून मुक्त विचारसरणीस, निधर्मीवादास, आधुनिक जगण्यास पाठिंबा देणाऱ्या इस्लामी व्यक्तींची गणना या संघटनेने औलिया- उस- शैतान अशी केली. म्हणजे सैतानाचे मित्र. ख्रिस्ती, हिंदू, बौद्ध, यहुदी आदी धर्मीय हे शैतान आणि त्यांच्या आश्रयाने जगणारे, त्यांची जीवनशैली अनुसरणारे, आधुनिक जीवनमान असणारे मुसलमान हे शैतानांचे साथीदार. सबब तेदेखील ठार मारण्याच्या लायकीचे ठरतात, असे आयसिस मानते. त्याचमुळे जेथे शक्य आहे तेथे स्वत: आणि जेथे शक्य नाही तेथे आपल्या अप्रत्यक्ष समर्थकांच्या वा सहानुभूतीदारांकरवी अशा शैतानांवर हल्ले घडवून आणण्यास आयसिसने सुरुवात केली. तेव्हा ऑर्लेडो येथे जे काही घडले तो पहिला प्रकार नाही. याआधी कॅलिफोर्निया येथील सॅन बर्नार्दिनो येथील हल्लेखोरानेही फेसबुकवर आपल्या आयसिस निष्ठा जाहीर केल्या होत्या. तसेच गतसाली टेक्सास येथील हल्लेखोरानेही आपण आयसिसचे समर्थक असल्याचे ट्वीट केले होते. ही बाब उल्लेखनीय. कारण यामुळे आयसिसच्या कार्यपद्धतीची नवीनच बाजू समोर आली असून तीमुळे या संघटनेवर प्रत्यक्ष कारवाई करणे अधिकच अवघड होऊ लागले आहे. अमेरिकेत जे काही झाले त्यात प्रत्यक्ष आयसिसचा हात नव्हता. त्यामुळे या संघटनेस या कृत्यांसाठी थेट जबाबदार धरता येत नाही. ही झाली या हल्ल्यामागील तांत्रिक बाब.

पण अधिक महत्त्वाचा आणि भयावह आहे तो आयसिसचा इस्लामी विरोधातील नवा पवित्रा. इतके दिवस बिगरइस्लामींना आपले प्रमुख शत्रू मानणाऱ्या आयसिसने यापुढे आधुनिकतावादी इस्लामींनाही लक्ष्य करण्याचे ठरवले असून त्यामुळे या संघटनेविरोधातील संघर्षांचा नवीनच अध्याय सुरू होईल असे दिसते. आयसिसच्या मते मलेशिया, इंडोनेशिया, सीरिया, येमेन, इराण आणि इतकेच काय, सौदी अरेबियादेखील यापुढे आयसिसचा शत्रू ठरतो. तेव्हा ऑर्लेडो येथे जे काही झाले त्यासाठी सरसकटपणे इस्लामी दहशतवादास बोल लावता येणार नाही. कारण हा दहशतवाद इस्लामच्या विरोधातदेखील आहे आणि अन्य धर्मीयांप्रमाणे इस्लाम धर्मीयसुद्धा त्यात होरपळले जाणार आहेत. तेव्हा काहीही भाष्य करण्याआधी हे समजून घ्यायला हवे की हा आयसिसी दहशतवाद हा फक्त एका विशिष्ट धर्मविचारास विरोध करीत नाही. विविधता आणि आधुनिकता यांनाच या दहशतवाद्यांचा विरोध आहे. या मंडळींना इस्लामच्या कट्टर वहाबी पंथांच्या मागास तत्त्वज्ञानावर आधारित खिलाफत स्थापन करावयाची असल्याने कोणताही आधुनिक विचार, सहिष्णुता ही या संघटनेची पहिली शत्रू आहे. त्याचमुळे ९/११ नंतरच्या मोठय़ा हल्ल्यासाठी ही विचारधारा मानणाऱ्यांनी लक्ष्य निवडले ते समलिंगीयांच्या क्लबचे. आयसिस यास पाप मानते आणि ते करणाऱ्यांकडून धर्म भ्रष्ट होतो असा तिचा दावा आहे. त्याचमुळे याआधीही आयसिसने ठार केलेल्या असंख्यांतील अनेक जण केवळ समलिंगी असल्याच्या संशयावरून मारले गेले आहेत. याआधी तर केवळ समलिंगी असल्याच्या बहाण्यावरून संबंधितांना या संघटनेने उंच इमारतींवरून ढकलून ठार मारल्याचा दाखला आहे. तेव्हा अमेरिकेतील हल्ल्यासाठी अशांच्या क्लबची निवड झाली यात आश्चर्य नाही. यावरून आयसिसचा उपद्रव यापुढे अधिकाधिक वाढत जाणार अशी अटकळ बांधता येते. पाश्चात्त्य देशांना घर मानून राहणारे इस्लामधर्मीय हेदेखील यापुढे आयसिसचे लक्ष्य असतील. अशा वेळी या संघटनेचा भस्मासुर हाताळण्यासाठी अधिक शहाणपणा आणि संयमाची गरज आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात या दोन्ही बाबी मुबलक असल्याचे सिद्ध झाले असले तरी ओबामांचे अध्यक्षपद आता अवघ्या काही महिन्यांचे सोबती आहे. अमेरिकेत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून ओबामा यांच्या विरोधी पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प ही या वातावरणात मोठी डोकेदुखी ठरू शकते. हे ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे. एकेकाळी इस्लामींचे नको इतके लांगूलचालन करणाऱ्या या पक्षाचा लंबक आता एकदम दुसऱ्या टोकाला गेला आहे. ट्रम्प तो अधिकच दूर नेऊ इच्छितात. त्यांची इस्लामविरोधातील जहाल मते सर्वश्रुत असून त्यामुळे सामान्य अमेरिकी नागरिकाच्या मनात या धर्माविषयी अधिकच घृणा तयार होण्याचा धोका आहे. अमेरिकेतील सर्वच निर्वासितांना, आणि त्यातही इस्लामी निर्वासितांना, सरकारने बखोट धरून बाहेर काढावे, असे ट्रम्प मानतात. तसे केल्यामुळे अमेरिकी जीवनात शांतता निर्माण होईल असा त्यांचा दावा आहे. जगभरात आयसिसचा भस्मासुर अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत असताना हे म्हणणे आगीत तेल ओतण्यासाखरेच. परंतु ट्रम्प यांना याची फिकीर नाही. इस्लामी आणि बिगरइस्लामी यांच्यात अधिकाधिक दरी निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणे इतकाच त्यांचा क्षुद्र उद्देश. तो सफल होऊ नये अशीच शहाण्यासुरत्या जनांची इच्छा असेल. कारण आयसिसचा पाडाव करावयाचा तर इस्लामींची मदतदेखील घ्यावी लागणार आहे. कारण आयसिस हे केवळ धर्मसंकट नाही, तर ते आधुनिकतेलाच आव्हान देणारे संकट आहे.

Story img Loader