अँड्रॉइड हे नाव अगदी पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावरही सहज येते. या अँड्रॉइडचा जन्मदाता कोण, याचे उत्तर मात्र तंत्रज्ञान कोळून प्यायलेल्या तरुणांनाही सांगता येत नाही. अॅण्डी रुबिन हा अमेरिकन या ऑपरेटिंग सिस्टीमचा जनक आहे. मार्च २०१३ मध्ये गुगलच्या अँड्रॉइड विभागाचा प्रमुख म्हणून भारतीय सुंदर पिचाई यांची नेमणूक झाली त्या वेळेस हे नाव पहिल्यांदा प्रकाशात आले. लिनक्स या ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीमच्या साह्य़ाने विकसित करण्यात आलेल्या या ऑपरेटिंग सिस्टीमचे जनक आता गुगल सोडून जात आहेत.
गुगलमध्ये रुजू होण्यापूर्वी रुबिन यांनी २००३ मध्ये अँड्रॉइडचा शोध घेऊन त्या नावाची कंपनी स्थापन केली होती. दोन वष्रे स्वतंत्र कंपनीद्वारे संशोधनाचे काम सुरू असतानाच २००५ मध्ये त्यांनी आपल्या अँड्रॉइडसह गुगलमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून २०१३ पर्यंत ते अँड्रॉइड विभागचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. सतत नावीन्याची कास धरणाऱ्या रुबिन यांचा जन्म १९६२ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण न्यूयॉर्क येथे झाले. यानंतर त्यांनी युटिका महाविद्यालयातून संगणक विज्ञानाची पदवी मिळवली. यानंतर ते कार्ल झिस या कंपनीत रोबोटिक अभियंता म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी १९८९ ते १९९२ या कालावधीत अॅपल या कंपनीत उत्पादन विभागात काम केले. यानंतर विविध तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करीत असताना त्यांनी १९९९ मध्ये आपल्या दोन मित्रांसोबत डेंजर नावाच्या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी मोबाइल कॉम्प्युटिंग उपकरणांसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम करीत होती. या कंपनीने विकसित केलेला ‘हीपटॉप’ खूप गाजला. यानंतर २००८ मध्ये ही कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली. ‘फोन वापरणाऱ्याचे ठिकाण आणि त्याची गरज ओळखणारे उपकरण म्हणजे स्मार्ट उपकरण’ असे रुबिन यांचे म्हणणे होते. यातूनच २००३ मध्ये इतर उद्योजकांना एकत्र घेऊन त्यांनी अँड्रॉइड या कंपनीची स्थापना करून एका ऑपरेटिंग सिस्टीमला जन्म दिला. यामध्ये वापरकर्त्यांच्या सोयीनुसार हवे ते बदल करण्याची मुभा देण्यात आली होती. त्या वेळी नोकियाच्या सिंबियन आणि िवडोज या दोन ऑपरेटिंग सिस्टीमचे राज्य तंत्रज्ञान क्षेत्रावर होते. त्यांना धक्का देणारी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणारी कंपनी २००५ मध्ये गुगलने विकत घेतली आणि त्याची धुरा रुबिन यांच्यावरच सोपविली. त्यानंतर अँड्रॉइडने घराघरांत प्रवेश करून खऱ्या अर्थाने जीवन स्मार्ट करण्यास सुरुवात केली. अँड्रॉइडचे नवे व्हर्जन लॉलीपॉप दाखल होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी गुगलचा राजीनामा दिला. आता भविष्यात ते मोबाइल तंत्रज्ञानात आपल्यासाठी काय घेऊन येतील याबाबत सर्व तंत्रप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
अॅण्डी रुबिन
अँड्रॉइड हे नाव अगदी पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावरही सहज येते. या अँड्रॉइडचा जन्मदाता कोण, याचे उत्तर मात्र तंत्रज्ञान कोळून प्यायलेल्या तरुणांनाही सांगता येत नाही. अॅण्डी रुबिन हा अमेरिकन या ऑपरेटिंग सिस्टीमचा जनक आहे. मार्च २०१३ मध्ये गुगलच्या अँड्रॉइड विभागाचा प्रमुख …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-11-2014 at 04:28 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andy rubin leaves google