पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा समित्यांना ममता बॅनर्जी सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर स्थगिती आणण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने तूर्त नकार दिला आहे. हा आदेश कार्यकारी स्वरूपाचा असल्याचा बचाव सरकारतर्फे न्यायालयात करण्यात आला होता. तो ग्राह्य़ मानण्यात आला. एवढय़ा भांडवलावर ममता आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत असले, तरी धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने ही खेदजनक घडामोड ठरते. पश्चिम बंगालमधील २८ हजार पूजा समित्या किंवा मंडळांना प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण २८ कोटी रुपये अनुदानापोटी वाटले जाणार आहेत. गेल्या वर्षी ममतांनी हिंदुत्ववादी संघटनांमार्फत विजयादशमीच्या दिवशी जाहीर शस्त्रपूजनावर आणि शस्त्र मिरवणुकांवर बंदी घातली, न्यायालयाने ‘बंदिस्त जागी शस्त्रपूजेवर बंदी नाही’ असा आदेश दिला आणि तोही झुगारून विश्व हिंदू परिषदेसारख्या काही संघटनांनी जाहीर शस्त्रपूजनाची हौस भागवून घेतली. यंदा मात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच सरकारी मदतीची उधळपट्टी दुर्गापूजा उत्सवावर करून त्यांनी आधीच्या शहाणपणावर पाणी ओतले आहे. शहरांमधील सुमारे ३००० आणि सुमारे २५ हजार ग्रामीण मंडळांना ही बिदागी मिळेल. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेची लोकप्रियता आणि त्यानिमित्ताने होणारी उलाढाल पाहता, १० हजार रुपये कोणत्याही मंडळासाठी क्षुल्लकच. त्यामुळे या निधीची चिंता सरकारने वाहण्याचे कारणच काय? उलटपक्षी, ज्या पश्चिम बंगालवर आधीच
धर्मनिरपेक्षतेची ऐशीतैशी
शहरांमधील सुमारे ३००० आणि सुमारे २५ हजार ग्रामीण मंडळांना ही बिदागी मिळेल.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-10-2018 at 01:54 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calcutta hc rejects petition challenging grant for durga puja