नक्षलींशी संबंध असल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक करताना पोलिसांनी दाखविलेली घिसाडघाई राज्य सरकारचा मुखभंग करणारी ठरली आहे. शहरी नक्षलवाद वास्तव आहे की मिथक यावरून देशभरात वाद सुरू असताना सरकारी यंत्रणेचे हसे झाल्याने तेलतुंबडे यांची बाजू घेणाऱ्या विचारांना आपसूकच बळ मिळाले आहे. भीमा कोरेगावच्या हिंसाचारानंतर नक्षलींशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अनेक बुद्धिवाद्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयीन लढाईत अडकले आहे. तेलतुंबडेंविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देतानाच त्यांना चार आठवडय़ांचे संरक्षण दिले होते. आजवर ही न्यायालयीन लढाई संयमाने लढणाऱ्या सरकारने ही अटक करण्याची घाई दाखवण्यात काहीच कारण नव्हते. आता हीच घाई सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरली आहे. आम्ही केवळ सरकारविरोधी बोलतो, नवा विचार मांडतो म्हणून ही कारवाई केली जात आहे, हा या बुद्धिवंतांचा दावा सरकारच्या या कृतीमुळे बळकट झाला आहे. सरकारची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित व विद्वेषावर आधारित आहे, असा प्रचार सातत्याने या बुद्धिवाद्यांच्या वतीने केला जात होता. त्याला बळ देण्याचे काम या अटकेच्या कृतीने केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा