अर्थव्यवस्था महामंदीच्या कडय़ापर्यंत लोटली जात असते, तेव्हा त्याची चाहूल ही वित्तीय अरिष्टातून लागते. आपल्याकडे वित्तीय क्षेत्रात एका मागोमाग अरिष्टांची मालिकाच सुरू आहे. संकटाच्या याच मालिकेने आता, जाहिरातींद्वारे ‘सही है’ भिनवल्या गेलेल्या आणि विश्वासाचे कोंदण लाभलेल्या म्युच्युअल फंडांनाही कवेत घेतले आहे. फ्रँकलिन टेम्पल्टन इंडियाने आपल्या सहा रोखेसंलग्न म्युच्युअल फंड योजना गुंडाळत असल्याचा धक्कादायक निर्णय शुक्रवारी जाहीर केला. धक्कादायक अशासाठी की, २००८ सालच्या जागतिक वित्तीय अरिष्टासमयीही म्युच्युअल फंड अडचणीत होते, पण त्यावेळी कुणावरही स्वत:हून योजना गुंडाळण्याची नामुष्की ओढवली नव्हती. २०१८ सालात सहारा म्युच्युअल फंडाच्या गुंडाळल्या गेलेल्या योजनांचा अपवाद वगळता ही घटना देशासाठी तशी अभूतपूर्वच. तथापि आज उभे राहिलेले प्रश्नचिन्ह हे कोणा भामटय़ाबद्दल नव्हे तर पाव शतकापासून कार्यरत एका प्रतिष्ठित व जगन्मान्य फंड घराण्याबद्दलचे आहे. म्युच्युअल फंड उद्योगाचे नियमन करणाऱ्या ‘सेबी’ने घालून दिलेल्या नियमांनुसार फ्रँकलिन टेम्पल्टनचे पाऊल पडले आहे. नियमबाह्य काही झाले नसले तरी या योजनांमध्ये पैसा (जो २५,००० कोटी रु.पेक्षा अधिक आहे) घालणाऱ्या गुंतवणूकदारांच्या भरवशाला मात्र बट्टा लागला आहे. गंमत म्हणजे, ‘गुंतवणूकदारांच्या हितरक्षणा’चा कावा करीत टाकल्या गेलेल्या पावलाने सबंध गुंतवणूकदार वर्गाचा कणाच मोडला गेला आहे. हतबलपणे जे काही, जेव्हा पदरी पडेल तेव्हा स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय आता गुंतवणूकदारांपुढे राहिलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा