उघडय़ा डोळ्यांनी हताशपणे सारे पाहात जावे असाच सध्याचा संकटकाळ आहे. सध्याच्या करोना विषाणूजन्य साथीचे थैमानच असे आहे. या संकटकाळात मुंबईस्थित सीकेपी सहकारी बँकेच्या काही हजार ठेवीदारांवर धक्कादायक असा हताशेचा आणखी एक प्रसंग ओढवला आहे. रिझव्र्ह बँकेने या बँकेचा व्यवसाय परवानाच रद्द केला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला, ३० एप्रिल रोजी या मराठी मध्यमवर्गीयांच्या बँकेवर अखेरचा पडदा टाकणारा हा निर्णय कळविण्यात आला. सरलेल्या महिन्यात परवाना रद्द झालेली ही सहकार क्षेत्रातील दुसरी बँक आहे. १७ एप्रिलला शेजारच्या गोव्यातील म्हापसा अर्बन सहकारी बँकेचा परवानाही रद्दबातल झाला आहे. टाळेबंदी सुरू आहे, वातावरण भयभीत आहे, त्यात एखाद-दुसऱ्या बँकेच्या मरणाचे दु:ख ते काय? तसेही, रिझव्र्ह बँक अप्रत्यक्षपणे अनुसरत असलेल्या वर्णाश्रम व्यवस्थेत, सहकारी बँकांचे स्थान तसे दखलशून्यच. आजार जडलेल्या तिसऱ्या-चौथ्या श्रेणीतले! त्यामुळे अशा रोगग्रस्त क्षेत्राचे निवारण हे महत्कार्यच ठरते आणि रिझव्र्ह बँकेसारखा नियामक ते तत्परतेने पार पाडत आहे, असे म्हणून त्याचे स्वागतच व्हायला हवे. बँकेला मोडीत काढून तिचे दिवाळे काढले गेल्यास, अनेक वर्षे तिष्ठत बसलेल्या ठेवीदारांच्या हाती नव्या वाढीव मर्यादेप्रमाणे ठेव विम्याची पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम पडणे हे अनेकांगाने चांगलेच! मात्र हे सर्व केवळ पोकळ युक्तिवाद. सहकारी बँक आणि तिच्या ठेवीदारांसाठीच ते फसव्या रूपात वापरात येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा