गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber
आजमितीला जगात अशा कंपन्यांची संख्या ३०० हून अधिक आहे. या कंपन्यांचं मिळून मूल्य आहे १०,५००० कोटी डॉलर इतकं प्रचंड. आपल्या देशातही अशा २० कंपन्या असल्याने खरं म्हणजे मग आपल्याला काय अनेकांनाच आनंद वाटायला हवा. पण इथंच तर खरी मेख आहे..
डॉट कॉम कंपन्यांच्या तेजीचे दिवस अजूनही आठवतात. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात त्या वेगाने त्या वेळी या कंपन्या उगवत होत्या. कोणी काही बँकिंग सुविधा देणारी, दुसरी एखादी घरबसल्या समभाग खरेदीविक्री करू देणारी, तिसरी बातम्या देणारी, चौथी आणखी कसली.. अशा अनेक. माध्यमांना कुठे ठेवू आणि कुठे नको.. असं झालं होतं या कंपन्यांबाबत. दिवसागणिक या कंपन्या नुसत्या फोफावत होत्या.
आणि अर्थविषयक नियतकालिकं, बाजारपेठ या अशा बातम्यांना चांगलंच खतपाणी घालत होती. या कंपन्यांचं मूल्य असं काही सांगितलं जात होतं, की बाकीच्या पारंपरिक कंपन्या पार लाजून चूर व्हाव्यात. आता भविष्य या कंपन्यांतच असणार आहे, पारंपरिक कंपन्यांनाही बदलावं लागणार आहे वगैरे वगैरे कारणं दिली जायची त्यासाठी. आठवतंय की, सत्यमसारख्या कंपनीचं बाजारमूल्य त्या वेळी टाटा स्टीलसारख्या कंपनीपेक्षाही अधिक दाखवलं गेलं होतं. खरं तर टाटा स्टील ही मूलभूत क्षेत्रात काम करणारी. त्या मानानं सत्यम अगदीच वरवरच्या क्षेत्रात होती त्या वेळी. पण सत्यमचा रामलिंगम राजू हा कोणी नव्या युगाचा जमशेटजी टाटाच जणू असं चित्र त्या वेळी रंगवलं गेलं. ब्रिक अँड मॉर्टर.. म्हणजे आपल्या दगडविटांच्या.. असं हिणवणीच्या सुरात म्हटलं जायचं पारंपरिक कंपन्यांना. एखाद्या कुटुंबातल्या स्वयंपाक आदी मूलभूत कामं करणाऱ्या महिलेपेक्षा पुढे पुढे करणारीलाच जास्त भाव मिळावा तसं झालं होतं त्या वेळी या माहिती कंपन्यांचं.
पण नंतर त्यांचं काय झालं हे काही वेगळं सांगायला नको. कुठल्या कुठे वाहून गेल्या त्या. रामलिंगम राजूसारखे तर तुरुंगातही गेले फसवणुकीच्या आरोपाखाली. अन्य अशा अनेक कंपन्या बुडाल्या. तशा त्या बुडणारच होत्या. त्यांच्या बुडण्याचं दु:ख नाही. तर चिंता आहे.. आणि होती.. त्या कंपन्यांतल्या गुंतवणूकदारांची. त्या लाटेत हात धुऊन घेण्याच्या उद्देशानं अनेकांनी प्रयत्न केले. फारच थोडय़ांना यश आलं. बहुसंख्यांच्या वाटय़ाला आलं ते अपयशच.
आता त्या अपयशाची आठवण काढायचं जेट हे काही एकमेव कारण नाही. त्या कंपनीनं नुकतीच आचके न देत मान टाकली. हजारो कोटींची र्कज आणि त्याहूनही हजारो कर्मचाऱ्यांची देणी, लाखो प्रवाशांकडनं घेतलेल्या तिकीटरकमा असं बरंच काही ती कंपनी देणं लागते. तिचंही नोंदणीकृत बाजारात आगमन झालं तेव्हा बाजारमूल्य असंच गडगंज होतं. त्यावर आधारित अनेकांनी तीत गुंतवणूक केली, समभाग घेतले. आता ते सगळेच गटांगळ्या खातायत. पण अडचण ही की, या कंपनीची स्थावर जंगम मालमत्ता विकून पैसे उभे करायचे म्हटलं तरी तेही करता येणं शक्य नाही. कारण तितकी काही मालमत्ताच नाही कंपनीकडे; पण हे काही एकमेव कारण आणि उदाहरण नाही.
तेव्हा डॉट कॉम कंपन्या होत्या. आता त्यातल्या बराचशा निजधामाला गेल्यात. पण त्यांची जागा आता अॅप्स या नव्या प्रकारांनी घेतलीय. हॉटेलातनं खाणं मागवायचं तर अॅप, कसलं बिल भरायचंय तर अॅप, सिनेमा पाहायचा तर अॅप, नाटकाची तिकिटं काढायची आहेत तरी अॅप आणि काहीच करायचंय नाही तरी अॅप. अशी ही अॅपच अॅप. स्मार्ट फोन नावाचा आधुनिक अल्लाउद्दीन आपल्या हाती लागला आणि या अॅपचा सुकाळ सुरू झाला.
त्या वेळी डॉट कॉम कंपन्यांच्या बाजारमूल्याची चर्चा व्हायची. आता ती या अॅपच्या मूल्यांची होतीये आणि काही अॅप्सनी तर विक्रमी मूल्य मिळवलंय. काही अब्ज कोटी रुपये वगैरे इतकं भव्य. या कंपन्यांची स्वत:ची अशी एक ओळख तयार झालीये. वेगळं त्यांचं असं मानाचं पान मांडलं जातं. या पंगतीत स्थान हवं असेल तर निकष आहे १०० कोटी डॉलर इतक्या मूल्याचा. म्हणजे ही किमान पातळी. एखाद्या कंपनीचं बाजारपेठीय मूल्य १०० कोटी डॉलरच्या पातळीला पोचलं, की या अशा खाशा स्वाऱ्यांत तिची गणना व्हायला लागते.
आजमितीला जगात अशा कंपन्यांची संख्या ३०० हून अधिक आहे. या तीनशे कंपन्यांचं मिळून मूल्य आहे १०,५००० कोटी डॉलर इतकं प्रचंड. अर्थात जगात म्हटलं तरी अशा कंपन्या काही मोजक्याच देशांत एकवटल्यात. उदाहरणार्थ चीन. त्या देशात यातल्या १३० आहेत. मग आहे अमेरिका. त्या देशात आहेत ८५. भारताचा क्रमांक त्यानंतर लागतो. आपल्या देशात अशा २० कंपन्या आहेत आणि इंग्लंडमध्ये सात.
खरं म्हणजे मग आपल्याला काय अनेकांनाच आनंद वाटायला हवा. इतक्या भव्य कंपन्या आहेत म्हणून. पण इथंच तर खरी मेख आहे. मार्टिन केनी आणि जॉन झेसमन या अर्थतज्ज्ञांनी अलीकडेच एका प्रबंधात या अशा कंपन्या, त्यांचं प्रचंड मूल्य आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा धोका दाखवून दिलाय.
यातलं आपल्याला काय काय कळतंय? किंवा काय कळून घ्यायची आपली सामाजिक क्षमता आहे?
उदाहरणार्थ हे दोघे दाखवून देतात की, असं अॅप वगैरे काही करणं आता किती सोपं आहे ते. कसं? तर डॉट कॉम कंपन्यांमुळेच. या डॉट कॉम कंपन्या ज्या वेळी उदयाला येत होत्या आणि पुढे २००० साली त्यांचा फुगा फुटला तोपर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड पायाभूत गुंतवणूक झाली होती. संगणक अधिकाधिक जलद होत गेले आणि त्यातनं जलद संदेशवहन करता यावं यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचं जगभरात जाळं विणलं गेलं. पण नंतर या कंपन्यांचा फुगा फुटला.
पण मागे या पायाभूत सुविधा तशाच राहिल्या. त्यातूनच मग चौथ्या पिढीचे मोबाइल फोन आले, वायफाय वगैरे तंत्र विकसित झालं आणि संगणक लहान होत होत स्मार्ट फोनमध्ये जाऊन बसले. म्हणजे पूर्वी जी कामं करायला संगणक वा लॅपटॉप वगैरे लागायचा, ती कामं आता हातातल्या फोन्समधून व्हायला लागली.
आणि मग यातून जन्म झाला विविध अॅप्सचा.
मग यात धोका काय?
तो आहे या अॅप काढणाऱ्या कंपन्यांच्या बाजारमूल्यांचा. ते मूल्य अवाच्या सवा आहे. हे डॉट कॉम कंपन्यांसारखंच; पण या दोन्हींच्या अवस्थेत आता फरक आहे.
तो असा की, यातल्या एकाही अॅप चालवणाऱ्या कंपनीला एका पैचाही नफा इतक्या साऱ्या वर्षांत झालेला नाही. अगदी यातली मोठय़ात मोठी कंपनी घेतली तरी तीसुद्धा तोटय़ातच आहे. पण तरीही या कंपन्यांचं बाजारमूल्य इतकं अवाढव्य आहे, की थक्क व्हायला होतं. हे त्यांचं बाजारमूल्य किती काळ राहील?
हा यातला खरा मुद्दा. हे दोघं दाखवून देतात की, यातल्या बऱ्याच कंपन्या आता भांडवली बाजारात उतरणार आहेत. काहींची त्याबाबतची घोषणादेखील झालेली आहे. या कंपन्यांचं बाजारमूल्य इतकं प्रचंड आहे की, ज्या वेळी या कंपन्या भांडवली बाजारात उतरतील तेव्हा त्यांच्या समभागांनाही प्रचंड मागणी असेल. त्यांची किंमतही प्रचंड असेल.
मग काय होईल?
मग या अॅप कंपन्यांतले गुंतवणूकदार आपल्याकडे असलेल्या या कंपन्यांचे समभाग विकून टाकतील आणि मूळच्या गुंतवणुकीवर कित्येक पटींनी गडगंज नफा कमावतील.
आणि मग या अॅप कंपन्या डॉट कॉम कंपन्यांच्या मार्गानेच जातील.
अनेक डॉट कॉम कंपन्यांतल्या सामान्य गुंतवणूकदारांच्या हाती धुपाटणं आलं. आताही तेच होईल. तेव्हा अॅप की आँखों में दिसत असलेले हे महके हुए राज आपण समजून घ्यायला हवेत.
कशाच्या मागे किती वाहवत जायचं.. मग ते अॅप असो वा व्यक्ती.. हे कधी तरी कळायला हवंच ना..