गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पत्रकार जमाल खशोगी यांची अलीकडेच अत्यंत अमानुष पद्धतीनं हत्या झाली. इस्तंबूलमधल्या सौदीच्या दूतावासात ते गेले असता त्यांना मारले आणि नंतर अत्यंत ज्वलजहाल रसायनांत त्यांचा देह विरघळेल अशी व्यवस्था केली गेली. हाडंसुद्धा सापडली नाहीत त्यांची. यामुळे त्यांच्या देहाचा लवलेशदेखील मिळाला नाही..

सर्वे गुण:कांचनम आश्रयंते.. असं एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे बरेवाईट जे काही गुण असतील ते अखेर कांचनाच्या.. म्हणजे सोन्याच्या आश्रयालाच जातात. हा याचा सरळ अर्थ. पण आडवाटेचा अर्थ असा की श्रीमंती तुम्हाला वाटेल ते मिळवून देऊ शकते. म्हणजे पैसा/सत्ता हाती असली की तुम्ही काहीही करू शकता. अगदी वाटेल तो गुन्हा करूनही स्वत: नामानिराळे राहू शकता.

या सुभाषिताचा प्रत्यय देणारं ताजं उदाहरण म्हणजे पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या. इस्तंबूलमधल्या सौदी दूतावासात अत्यंत अमानुष पद्धतीनं जमाल यांची हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. जमाल खशोगी हे सौदी राजपुत्र सलमान याचे कडवे टीकाकार होते. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकातनं ते सौदीचा आणि मुख्य म्हणजे राजपुत्र सलमान यांचा खरा चेहरा सातत्यानं उघडकीस आणत होते. त्यामुळे सौदीनं त्यांचा काटा काढला. अत्यंत अमानुष पद्धतीनं मारलं त्यांना. इस्तंबूलमधल्या सौदीच्या दूतावासात ते गेले असता त्यांची हत्या केली गेली आणि नंतर अत्यंत ज्वलजहाल रसायनांत त्यांचा देह विरघळेल अशी व्यवस्था केली गेली. हाडंसुद्धा सापडली नाहीत त्यांची. यामुळे त्यांच्या देहाचा लवलेशदेखील मिळाला नाही. हे जमाल खशोगी शस्त्रास्त्रांचा कुख्यात सौदी दलाल अदनान खशोगी याचे पुतणे. आपल्याला हे खशोगी माहीत. नरसिंह राव यांच्या काळात चंद्रास्वामी-खशोगी हे प्रकरण चांगलंच गाजलेलं. त्यांचे वडील महंमद खशोगी हे सौदी अरेबियाचे संस्थापक महंमद बिन इब्न सौद यांचे खासगी वैद्यक होते. परत या जमाल यांची दुसरी ओळख म्हणजे दोदी अल फायद हा त्यांचा चुलतभाऊ. दोदी फायद म्हणजे प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांचा प्रियकर. पॅरिसला ९७ सालच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या मोटार अपघातात हे दोघेही एकत्रच मारले गेले. असो.

तर या जमाल खशोगी यांच्या अमानुष हत्येनंतर अमेरिकेने थयथयाट केला. कारण खशोगी तांत्रिकदृष्टय़ा अमेरिकेचे नागरिक होते. मूळचे सौदीतले. पण नागरिकत्व अमेरिकेचं अशी ही व्यवस्था. त्यामुळे आपल्या नागरिकाची अशी हत्या होतेय म्हटल्यावर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आकांडतांडव केलं. आपण आता सौदी अरेबियावर कशी कारवाई करणार आहोत, याच्या गर्जनाही केल्या त्यांनी.

प्रत्यक्षात काय झालं?

तसं काहीच नाही.

सौदी राजपुत्र सलमान याच्यावर जी काही कारवाई वगैरे अपेक्षित होती, तशी काही झालीच नाही. अन्य कोणता राज्यकर्ता असता तर अमेरिका त्याच्या मागे हात धुऊन लागली असती. पण राजपुत्र सलमान याचं काहीच वाकडं झालं नाही. आणि ट्रम्प यांचा जावई जेराड कुशनेर हा राजपुत्र सलमान यांचा मित्र आहे, हे काही एकमेव कारण यामागे नाही. अमेरिकेनं सौदी राजपुत्रावर कारवाई करू नये याची बरीच कारणं असली तरी त्यात एक समान धागा आढळतो.

सौदी अरेबियानं अमेरिकेत केलेली गुंतवणूक हा तो समान धागा.

कशाकशात या सौदी राजपुत्रानं पैसे अडकवलेत किंवा कोणकोणत्या उद्योगांना भांडवल पुरवठा केलाय, या प्रश्नाचं उत्तर कोणत्या उद्योगांना नाही.. असं द्यावं लागेल.

उदाहरणार्थ.

उबर या कंपनीत सौदी राजघराण्यानं तब्बल ३५० कोटी डॉलर गुंतवलेत. सौदी राजघराण्यानं तेलातनं आलेल्या पैशातून एक वेगळा निधी तयार केलाय. नाव त्याचं पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड.. सार्वजनिक गुंतवणूक निधी. नावावरनं तो जनहितार्थ वगैरे गुंतवणूक होत असल्याचं दाखवतो. पण प्रत्यक्षात ते तसं नाही. हा निधी पूर्णपणे खासगी आहे आणि सौदी राजघराण्याच्या हितासाठी तो वापरला जातो. त्यातून ही उबरमधली गुंतवणूक केली गेली. इतकंच नाही तर या निधी हाताळणाऱ्या यंत्रणेचा जो व्यवस्थापकीय संचालक आहे यासिर अल रुमय्या नावाचा तो उबरच्या संचालक मंडळाचा सदस्य आहे. ही झाली थेट गुंतवणूक. त्याखेरीज सॉफ्ट बँकेचा व्हिजन फंड नावाचा आणखी एक निधी आहे. त्यामार्फतही सौदी घराण्यानं उबरमध्ये घसघशीत गुंतवणूक केलीये. याचा थोडक्यात अर्थ असा की उबर या कंपनीच्या मालकीत सौदी राजघराण्याचा घसघशीत वाटा आहे.

टेस्ला विद्युत मोटारींचं खूळ सध्या चांगलंच लोकप्रिय आहे. जणू काही या विजेऱ्यांवर चालणाऱ्या मोटारी आपल्या पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या मोटारींना हद्दपारच करणार. तर या टेस्लात सौदी राजघराण्यानं अलीकडेच १०० कोटी डॉलर गुंतवलेत. याच्या जोडीला जनरल मोटर्स या कंपनीतर्फे स्वयंचलित मोटारी तयार करण्याचा प्रकल्प सुरू आहे. चालकरहित मोटारी असं त्याचं स्वरूप असेल. या मोटारी विकसित करण्यासाठी सौदी राजघराण्यानं जनरल मोटर्स या कंपनीत २२० कोटी डॉलरची गुंतवणूक केलीये.

या राजपुत्र सलमान याचा एक भाऊ आहे. राजपुत्र अल वलिद बिन तलाल नावाचा. तो सलमानइतका प्रसिद्धीत नसतो. काही महिन्यांपूर्वी सलमाननं राजघराण्यावर केलेल्या कारवाईत काही काळ तुरुंगात होता तो. पण नंतर ते प्रकरण मिटलं. जगातल्या काही मोजक्या धनाढय़ांत गणला जाणारा तलाल हा वॉल स्ट्रीटवरचा बडा खेळिया मानला जातो.

ट्विटर ही त्याची तुम्हाआम्हाला माहीत असलेली गुंतवणूक.

म्हणजे ज्या ट्विटरच्या व्यासपीठावर अलीकडे नीतीची, धर्मरक्षणाची वगैरे प्रवचनं दिली जातात त्या समाजमाध्यमी चव्हाटय़ाच्या मालकीत या राजपुत्र तलाल याचा वाटा मोठा आहे. किती? ती रक्कम मात्र उघड करायला ट्विटर आणि तलाल या दोघांनी नकार दिलाय, इतकी ती मोठी मानली जाते. येस आय ओन ट्विटर.. असं एकदा उत्तर या राजपुत्र तलाल यानं दिलं होतं यावरनं त्याच्या गुंतवणुकीचा अंदाज येईल. स्नॅपचॅट हे एक अलीकडचं दुसरं नवं समाजमाध्यमी खूळ. त्याची अडीच टक्के मालकी सौदी राजघराण्याकडे आहे. या कंपनीत या घराण्यानं अलीकडेच २५ कोटी डॉलर इतकी भरभक्कम रक्कम गुंतवलीये. इस्लाम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मक्कामदिना ज्या भूमीत आहे त्या कथित धर्माध सौदी अरेबियाचा राग राग करणाऱ्यांसमोर खरं तर या माहितीमुळे शब्दश: धर्मसंकटच ओढवेल. असो.

पण इतकंच नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची आवडती वृत्तवाहिनी आहे फॉन्स न्यूज नावाची. ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स या कंपनीतर्फे ती चालवली जाते. ही कंपनी एके काळी माध्यमसम्राट रूपर्ट मर्डॉक यांच्या मालकीची होती. नंतर तिने स्वतंत्र चूल थाटली. या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे ती सौदी राजघराण्याची. ट्रम्प यांना या वाहिनीचं व्यसन आहे. एक तर सीएनएन, एनबीसी वगैरेंवर त्यांचा राग. त्यामुळे फॉक्स त्यांची आवडती. या कंपनीत सौदी राजघराण्याची गुंतवणूक.. अध्यक्षपदी ट्रम्प.. त्यांची तळी उचलणारी वृत्तवाहिनी.. ट्रम्प यांचा जावई हा सौदी राजपुत्राचा मित्र.. हे असे ठिपके जोडले की संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहील.

आणि मग लक्षात येईल अमेरिका पत्रकार जमाल खशोगी याच्या हत्येसाठी सौदी अरेबियाला शिक्षा का नाही करू शकत ते. यातलं आणखी कटू सत्य इतकं की हे काही आताच होतंय असं नाही. ट्रम्प यांचे पूर्वसुरी होते रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज डब्ल्यू बुश. त्यांचे वडीलही अध्यक्ष होते जॉर्ज बुश. तर त्यांची पत्नी बार्बरा बुश.. म्हणजे जॉर्ज डब्ल्यू बुश यांची आई.. या काही विदुषी वगैरे म्हणून प्रसिद्ध होत्या असं नाही. पण तरीही त्यांनी जेव्हा खासगी ग्रंथसंग्रह तयार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यासाठी प्रचंड मोठी देणगी दिली ती सौदी राजघराण्यानं.

सर्वे गुण:कांचनम आश्रयंते हे सुभाषित खरं ठरतं ते असं. नाही तरी खनिज तेलाला काळं सोनं म्हणतातच.

Story img Loader