गिरीश कुबेर

व्हिएतनाम युद्ध काय,

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

बँकेची आर्थिक स्थिती काय

किंवा जपानचं धोरण काय.. त्यामागची आकडेमोड योग्यही असेल, पण काही तरी चुकलं; ते मॉर्गन ह्युसेलना गवसलं..

अलीकडे हे व्यवस्थापनशास्त्र शिकलेल्यांशी, म्हणजे एमबीए वगैरे झालेल्यांशी, बोलणं म्हणजे तसं संकटच असतं एक प्रकारचं. एक तर या शास्त्रातल्या पंडितांना सर्व काही कळतं असं त्यांना वाटत असतं. आणि दुसरं म्हणजे संख्यांवर, आकडय़ांवरचा त्यांचा भर. भारतीय माणूस तसा शब्दबंबाळ. हवे तितके शब्द तो प्रसवू शकतो. पण आकडय़ांचा प्रश्न आला की सर्वसाधारण भारतीय एकदम कानकोंडा होतो. आणि हे मॅनेजमेंटवाले तर अगदी दशांश, अपूर्णाक वगैरेला हात घालतात. कसलं भारी वाटतं ऐकायला!

म्हणजे त्यांच्यासमोर महागाई हा शब्द जरी कुणी काढला तर हे लगेच महागाई निर्देशांक किती अंशांनी वाढला, तो चार दिवसांपूर्वी किती होता, याच गतीने तो वाढत राहिला तर चार दिवसांनी तो किती असेल, त्यामुळे आपल्या महिन्याच्या खर्चात कितीनं वाढ होईल वगैरे वगैरे आकडे थाड थाड फेकणार आपल्यासमोर. आपण गार. समजा करोनाच्या साथीचं कोणी काही बोललं तर यांची समीकरणं आणि आकडेवारी तयार. आज दिवसाला इतके वाढतायत, काल इतके वाढले, उद्या इतके वाढतील म्हणजे लोकसंख्येचा किती भाग किती दिवसात बाधित होईल वगैरे नुसता मारा आपल्यावर.

हे इतकंच नाही. याच्या आधारे प्रत्येक समस्येवर या आकडय़ांच्या साहाय्याने त्यांच्याकडे उत्तर तयार. प्रश्न आजाराच्या साथीचा असो, बेरोजगारीचा असो किंवा आणखी कोणता जागतिक वगैरेही असो. यांच्याकडे प्रत्येकावर तोडगा तयार. अर्थात म्हणूनच त्यांना ‘व्यवस्थापन गुरू’ म्हणत असावेत. पण प्रत्येक मुद्दय़ाकडे  हे असं संख्याधारे पाहणं बरोबर असतंच असं नाही, हे आधीही कळत होतं. पण या मुद्दय़ावर अशा गुरूंशी दोन हात करण्याएवढी मुद्दय़ांची संख्या जमत नव्हती.

या आठवडय़ात हा प्रश्न मिटला. मॉर्गन ह्युसेल यांचा एक अप्रतिम निबंध वाचायला मिळाला. मॉर्गन ह्युसेल म्हणजे ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’ या गमतीशीर वाचनीय पुस्तकाचे लेखक. त्यावर नंतर कधी तरी. सध्या या निबंधाविषयी. ‘डज नॉट कम्प्यूट’ हे या निबंधाचं शीर्षक. मॉर्गन या निबंधात अत्यंत सुरेलपणे मोजण्यामापण्याच्या मर्यादा दाखवून देतात. त्यांनी दिलेले दाखले हे सर्वव्यापी आहेत. आकडय़ांचा आधार घेणारे हे व्यवस्थापनशास्त्री नेहमी तर्काचा आधार आपल्या निर्णय वा निष्कर्षांसाठी घेत असतात. पण सर्वच समस्यांचं उत्तर शोधण्यासाठी तर्क उपयोगी पडतोच असं नाही. तर्क भले एखाद्या घटनेच्या कार्यकारणभावाचा शोध घ्यायला उपयोगी पडत असेल. पण तर्कावरही मात करणाऱ्या काही गोष्टी असतात. त्या लक्षात घेतल्या नाहीत तर समस्यांचं आकलनच होत नाही.

उदाहरणार्थ: अमेरिकेचं व्हिएतनाम युद्ध. एवढासा मुठीएवढा देश. आपण पाहता पाहता पादाक्रांत करू असा विश्वास होता अमेरिकी सुरक्षा तज्ज्ञांचा. हे तज्ज्ञ तर्क, आकडेमोड, संख्या अशा सगळय़ा आधारे शास्त्रशुद्ध विचार करणारे. त्यांच्या आधारे संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅक्नामारा यांनी तर फक्त व्हिएतनाम विजयाचा मुहूर्त काढायचं शिल्लक ठेवलं होतं. व्हिएतनाममध्ये अमेरिकी सैनिकांचं नेतृत्व करत होते विल्यम वेस्टमोरलँड. त्यांची दर्पोक्ती अशी की अमेरिकी सैनिक व्हिएतनामींच्या प्रेतांचा इतका खच पाडतील की या मृत्यूच्या भयानक दर्शनानेच व्हिएतनामी सरकारचा निर्धार कोसळून पडेल.

वेस्टमोरलँड यांनी तसा व्हिएतनामी मृतदेहांचा डोंगर रचायला सुरुवात केली. एका अमेरिकी सैनिकाच्या बदल्यात किमान दहा व्हिएतनामी नागरिक असा हा हत्येचा वेग होता. पण तरी व्हिएतनामी सरकार काही बधत नव्हतं. तशी लक्षणंही दिसत नव्हती. पारंपरिक अस्त्रं झाली, जंगलं बेचिराख करणारी रासायनिक अस्त्रं झाली. सर्व उपाय झाले. पण व्हिएतनामींचा धीर काही सुटत नव्हता. हे पाहून सीआयएचे प्रमुख एडवर्ड लॅन्सडेल संरक्षणमंत्री मॅक्नामारा यांना म्हणाले : तुमचं सर्व काही बरोबर आहे. सैनिक, अमेरिकी लष्कराची ताकद, त्याविरोधात व्हिएतनामचा जीव सर्व अचूक आहे. तुमचे ठोकताळे, आकडेवारी अगदी बरोबर. फक्त एक चूक आहे त्यात. तो घटक काही तुम्ही मोजला नाहीत. मॅक्नामारा यांनी विचारलं : तो कोणता?

लॅन्सडेल म्हणाले : सामान्य व्हिएतनामींची भावना. ती काही तुम्हाला मोजता आली नाही. अमेरिकेला धडा शिकवायला हवा ही त्यांच्या मनातली गोष्ट तुमच्या कानावर आली नाही.

व्हिएतनाम युद्ध गेल्या शतकाच्या सातव्या दशकातलं. त्यानंतर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातही असाच एक प्रकार घडला.

बराक ओबामा निवडून आले त्या वर्षी, म्हणजे २००८ सालच्या १० सप्टेंबपर्यंत लीहमन ब्रदर्स ही जगातल्या अत्यंत बलाढय़ बँकांतली एक म्हणून गणली जात होती. उत्तम, सुदृढ बँकेसाठी जी काही परिमाणं असतात, म्हणजे उत्तम पहिल्या दर्जाचं भांडवल, अत्यंत कमी असं बुडीत कर्जाचं प्रमाण, कर्ज आणि ठेवी यांचं निरोगी गुणोत्तर असं सर्व सर्व काही ‘लीहमन ब्रदर्स’ बँकेच्या पारडय़ात होतं. त्याच्या आधी काही काळ लीहमन ब्रदर्सही गोल्डमन सॅक वा अन्य अमेरिकी बँकांपेक्षाही तगडी मानली जात होती.

पण त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ती कोलमडली. आणि बंदच झाली. हा धक्का होता. समस्त विश्लेषक, अर्थतज्ज्ञ, धोरणकर्ते, मानांकन देणारे वगैरे सर्वच चक्रावून गेले. कोणालाच कळलं नाही ही बँक आत्ता होती, गेली कुठे? नंतर मग सारं जगच आर्थिक अनिश्चिततेत सापडलं. हे का झालं असावं?

मॉर्गन ह्युसेल यांचा यावर खुलासा असा की, बँकेचं आरोग्य मोजताना सर्वानी फक्त आकडय़ांवर विश्वास ठेवला. हे सशक्त दिसणारे, टाळेबंदात ठसठशीतपणे समोर उठून दिसणारे आकडे हाच सर्वाच्या विश्लेषणाचा आणि मूल्यमापनाचा आधार. पण तो घेताना या सर्वानी एका मुद्दय़ाकडे दुर्लक्ष केलं, असं मॉर्गन दाखवून देतात.

तो म्हणजे ‘बँकेचं काही खरं नाही,’ हे सुप्त कथानक. आकडे भले तुम्हाला पािठबा देत असतील, पण आकडय़ांना अर्थ देणाऱ्या शब्दांतली गोष्ट जर काही वेगळं सांगत असेल तर संख्येपेक्षा शब्द समर्थ ठरतात. पृष्ठभागाखालनं वाहणाऱ्या या गोष्टी, कथा या पृष्ठभागावरच्या आकडय़ांवर, त्यांच्या ताळेबंदांवर मात करतात. यासाठी मॉर्गन आणखी एक दाखला देतात.

जपान सरकारचा. आपल्या देशातले उद्योग अधिकाधिक आकर्षक वाटावेत, त्यातल्या सहभागात जास्तीत जास्त कामगारांना रस निर्माण व्हावा म्हणून जपान सरकारनं गेल्या वर्षी, २०२१ साली, उद्योगांसाठी मोठी करसवलत जाहीर केली. तिचा मथितार्थ असा की या देशातल्या उद्योगांनी आपापल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ केली तर या कंपन्यांना ४० टक्के इतकी करसवलत दिली जाईल, अशी जपान सरकारची धोरण घोषणा. आता इतकी करसवलत मिळत असेल तर कंपन्यांत ती घेण्यासाठी झुंबड उडेल असंच कोणालाही वाटेल.

पण उद्योगांच्या चेहऱ्यावरची माशीही हलली नाही. इतका थंडा प्रतिसाद या योजनेला मिळाला की खुद्द सरकारलाही आश्चर्य वाटलं. हे असं का झालं असावं?

मॉर्गन यांचं म्हणणं असं की ही योजना जाहीर करणाऱ्यांनी फक्त संख्येचा विचार केला. पण संख्येमागच्या कथेकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. हे कथानक होतं या प्रयत्नांच्या फोलपणाचं. ‘‘या घोषणेत काही अर्थ नाही. जपानमध्ये अशी काही वेतनवाढ केली जात नाही,’’ ही कथा पसरली आणि तिनं सरकारी घोषणेवर मात केली. परिणामी जपानमध्ये सरकारला अपेक्षित अशी उद्योग गुंतवणूक वाढ झालीच नाही.

म्हणून मॉर्गन म्हणतात त्याप्रमाणे संख्या कितीही मोठी, मजबूत वाटली तरी तिचा आकार पूर्णपणे विसंबून राहावा असा नसतो. अक्षरं, त्यातून तयार होणारे शब्द आणि या सर्वातनं आकाराला आलेली कथा भल्यादांडग्या संख्येला नामोहरम करू शकते. संख्या कितीही बलवान असो. पण कथा ही बघता बघता संख्येवर मात करते.

या कथेची कथाच वेगळी.

म्हणून आकडय़ांच्या सौष्ठवाला इतकं महत्त्व द्यायची गरज नाही..

वातावरणातल्या कथांकडे लक्ष द्यायला हवं.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber