आजमितीला जवळपास १३ लाख इतके त्याचे वर्गणीदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या उत्पन्नातला मोठा वाटा हा वर्गणीदारांकडून येतो, जाहिरातदारांकडून नाही. रुपयांच्या भाषेत आज त्याची किंमत होईल ५३१ रुपये. तरी वाचक घेतात. आणि तिकडे दहा रुपयांत सहा महिने वगरे अशी, स्वत:चीच किंमत कमी करून अंक विकण्याची दरिद्री पद्धत नसते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
असं कधी होतं का? म्हणजे हलवाईच म्हणतो की हल्ली लोकांना मिठाई खायला आवडत नाही, म्हणून मी मिठाई खूपच कमी बनवतो. किंवा एखादा वैद्यक म्हणतो का की हल्ली आजारी पडल्यावरही लोकांना औषध घ्यायला आवडत नाही, म्हणून मी ते देतच नाही. किंवा एखादा चित्रकार म्हणतो की लोकांना हल्ली भव्य चित्र आवडतच नाहीत, म्हणून मी चिटोऱ्यांवरच चित्र काढतो हल्ली..
या प्रश्नांची उत्तरं काय असतील हे सांगायला विद्वान असण्याची गरज नाही. परंतु एका व्यावसायिकाच्या मते मात्र त्याची उत्तरं होकारार्थी असतील.
तो व्यावसायिक म्हणजे मराठी संपादक. हल्ली काही बडय़ा दैनिकांचे संपादकच म्हणू लागलेत, लोकांना वाचायला आवडत नाही.. म्हणून आम्ही ते देतच नाही. आता लोकांनी आवडीनं वाचावं असं त्यांना लिहिता येत नाही, हे सत्य असलं तरी ते कुठं लोकांना माहितीये. त्यामुळे लोकांना वाचायला आवडत नाही, ही यांची भूमिका खपून जाते.
या पाश्र्वभूमीवर ठसठशीतपणे समोर येत राहतं ते ‘द न्यूयॉर्कर’ साप्ताहिक. वाचकांना भरभरून दिलं पाहिजे, असं मानणारं आणि त्याप्रमाणे प्रत्येक अंक काढणारं. डेव्हिड रेम्निक संपादक झाल्यापासनं तर ते माझं अत्यंत आवडतं अत्यावश्यक वाचन बनून गेलेलं आहे. माल्कम ग्लॅडवेल, सेमुर हर्ष, अॅमी डेव्हिडसन, स्टिव्ह कोल, अतुल गावंदे वगरे आणि ती एकापेक्षा एक अत्यंत बुद्धिमान व्यंगचित्रं. ‘न्यूयॉर्कर’ म्हणजे वाचनानंदाची परिसीमा असते.
डेव्हिडच्या आधी टीना ब्राउन या संपादक होत्या. त्यांच्या काळात नियतकालिक चांगलंच वाढलं. चटपटीत झालं. पण वर्गणीदारांची संख्या मात्र घसरायला लागली. जगात सर्वत्र इंग्रजी साप्ताहिकांना घरघर लागायचा तो काळ. त्यामुळे ‘न्यूयॉर्कर’देखील त्याच मार्गानं जाणार असं बाजारपेठीय वाऱ्यांवर आपलं मत बनवणाऱ्यांना वाटून गेलं. त्याची इतकी घसरगुंडी झाली की त्या काळात त्यांना ते सोडावं लागलं. मग डेव्हिड संपादक झाला. १९९८ सालची ही घटना. त्याआधी तो ‘वॉिशग्टन पोस्ट’चा मॉस्को इथला प्रतिनिधी होता. तो अशा काळात रशियात होता की त्या काळात इतिहास घडत होता. गोर्बाचोव यांचं ग्लासनोस्त, पेरिस्त्रोयका वगरे आणि ते रशियाचं दुभंगणं. त्यावर आधारित असं ‘लेनिन्स टुंब’ हे पुस्तक वाचनात आलेलं आणि त्याच्या पुरेशा प्रेमातही पडून घेता आलं. त्यानंतर बातमी आली डेव्हिड आता ‘न्यूयॉर्कर’चा संपादक होतोय. तो झाला. आणि त्यानं पत्रकारितेचा घाटच बदलला. अगदी दहा दहा हजार शब्दांचे, भले मोठे लेख यायला लागले. विषयांचं वैविध्य येऊ लागलं. लिहिण्याची शैली बदलली. डेव्हिडही बऱ्याचदा लिहू लागला.
माध्यमांनी नोंद घ्यावी अशी घटना या टप्प्यावर घडू लागली. ‘न्यूयॉर्कर’चा खप झरझर वाढत गेला. आजमितीला जवळपास १३ लाख इतके त्याचे वर्गणीदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे डेव्हिड आता हक्कानं सांगतो, आमच्या उत्पन्नातला मोठा वाटा हा वर्गणीदारांकडून येतो, जाहिरातदारांकडून नाही. १९९८ मध्ये डेव्हिडनं संपादकपद हाती घेतलं तेव्हा एका अंकाची किंमत होती फक्त ३ डॉलर. अमेरिकेतला चलनवाढीचा दर लक्षात घेता ती आजच्या काळात साधारण साडेचार डॉलरच्या आसपास असायला हवी. पण डेव्हिडनं आग्रह धरून ती थेट ८ डॉलर इतकी करून घेतली. धर्मातर करून सांगायचं तर रुपयांच्या भाषेत होईल ५३१ रुपये. इतकी किंमत मोजूनही वाचक घेतात. आणि तिकडे दहा रुपयांत सहा महिने वगरे अशी, स्वत:चीच किंमत कमी करून अंक विकण्याची दरिद्री पद्धत नसते. तेव्हा यावरनं लक्षात यावं वर्गणीतनंच त्याचा महसूल कसा वाढला ते.
हे संपादकपद हाती घेतल्यावर काही दिवसांनी लंडनच्या द गाíडयन या दैनिकाला डेव्हिडनं प्रदीर्घ अशी मुलाखत दिली. त्यात त्यांनी लोकांना वाचायला आवडत नाही असं तत्त्वज्ञान मांडणाऱ्यांना पार उघडं पाडलं. लोक वाचतात, गंभीरही वाचतात.. त्यांना उत्तमोत्तम वाचायला देणं हे आपलं कर्तव्यच आहे असं डेव्हिड या मुलाखतीत म्हणतो.
तर आता या ‘न्यूयॉर्कर’नं नुकतंच रेडिओ केंद्र सुरू केलंय. छापील शब्दांत इतकी र्वष स्वत:ला गुंतवून घेणाऱ्या ‘न्यूयॉर्कर’नं हे असं काय केलं, असा प्रश्न अनेकांप्रमाणे मलाही पडला होता. पुन्हा लंडनच्या गाíडयननीच त्याचं उत्तर दिलं. या दैनिकानं पुन्हा डेव्हिडला बोलतं केलं. आता गाíडयनदेखील द ‘न्यूयॉर्कर’प्रमाणेच पत्रकारिता, लेखन ही मूल्यं मानणारा आहे, हे सांगायला नकोच. त्यामुळे गाíडयनलाही ‘न्यूयॉर्कर’च्या रेडिओ उद्योगाचा प्रश्न पडला असणार. तेव्हा गाíडयननं त्याला विचारलं.. हे तू का करतोयस? त्यावर खास न्यूयॉर्करीय विनोदबुद्धीचं दर्शन घडवत डेव्हिड यानं विली सटन या बँक दरोडेखोराचा दाखला दिला. विलीला एकदा एकानं विचारलं, तू बँकांवर दरोडे का घालतोस? त्यावर तो म्हणाला, दॅट्स व्हेअर द मनी इज. तसा मी रेडिओच्या प्रांतात शिरलो कारण दॅट्स व्हेअर द रिडर्स आर. ते ऑनलाइन असतील तर मी तिकडे जाईन. िपट्रमध्ये ते माझ्याबरोबर आहेतच. दुसरीकडे ते जिकडे असतील तिकडे जाणं आणि त्यांना माझ्याकडे आणणं हे माझं कर्तव्यच आहे.
हा डेव्हिड ‘न्यूयॉर्कर’चा फक्त पाचवा संपादक. पहिले दोन हॅरॉल्ड रॉस आणि विल्यम शॉन या दोघांनी मिळून तब्बल ६२ र्वष संपादकपद भूषवलं. यातले रॉस हे संस्थापक संपादक. नंतरचे दोन रॉबर्ट गॉटलिब आणि टीना ब्राउन यांनी ११ वर्ष न्यूयॉर्कर सांभाळला. आणि ९८ पासून डेव्हिड रेम्निक. म्हणजे आता त्याचंही १८ वं वर्ष आहे संपादकपदावरचं. या काळात, एक टीना ब्राउन यांचा काळ सोडला तर, द ‘न्यूयॉर्कर’ उत्तरोत्तर यशस्वीच होत गेला. ‘न्यूयॉर्कर’च्या आसपास त्या वेळी दोन साप्ताहिकं सुरू झाली होती. अमेरिकन मक्र्युरी आणि टाइम. दोघांनाही आता चांगलीच घरघर लागलीये. मक्र्युरी तर काळाच्या पडद्याआड गेलंदेखील. पण ‘न्यूयॉर्कर’ अजूनही ताजतवानं आहे. आपली कालसुसंगतता राखून आहे. काय कारण असेल त्यामागचं?
डेव्हिड स्वत:, झालंच तर त्याआधी रॉस यांनी याचं कारण नमूद करून ठेवलंय. ते आहे न बदलणं. लोकांना वाचायला आवडतंच आवडतं हे द न्यूयॉर्करचं तत्त्व आहे आणि त्यावर या सगळ्यांचा विश्वास आहे. जन्माला येतानाच न्यूयॉर्कर सुसंस्कृत, अभिजनांसाठीच आपण आहोत अशी द्वाही फिरवत आला. मराठीत ज्याला शिष्ट म्हणतात तसा न्यूयॉर्कर होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आजही आहे. या काळात मुखपृष्ठावरचा तो उच्चभ्रू, िभगातनं फुलपाखराचं निरीक्षण करणारा अमेरिकन आजही तसाच आहे.
आता आजच हे सगळं न्यूयॉर्कराख्यान लावायचं कारण?
कारण ‘न्यूयॉर्कर’ आता लवकरच ९१ व्या वर्षांत पदार्पण करेल. वाचनसंस्कृतीचा आदर करणाऱ्यांनी साजरी करायलाच हवी, अशी ही घटना आहे. तुला इतकं मोठं लिहायचा कंटाळा येत नाही का, तू का लिहितोस.. असा प्रश्न या निमित्तानं डेव्हिडला विचारला गेला. त्यावर खास त्याच त्या न्यूयॉर्करी विनोदाचा आधार घेत, तो म्हणाला : I write because this is the only thing you can have the most fun with pants on…
तर अशा ‘न्यूयॉर्कर’चा वसंतोत्सव हरखून न्याहाळत असताना डोळ्यांपुढे तरळून जातायत कलेवरं.. माणूस, सत्यकथा, मौज.. अशा आपल्या नियतकालिकांची.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber