गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber
न्यू यॉर्क टाइम्स हे जगभरात प्रचंड दबदबा असलेलं वृत्तपत्र. शोधपत्रिकारितेच्या माध्यमातून निष्पक्षपणे घटनांचा मागोवा घेण्याचे काम ते अनेक वर्ष करत आहे. एखाद्या कंपनीविषयी लिहायचे म्हटले तर आपल्या देशातली कंपनी आहे, जरा दुर्लक्ष करा वगैरे असं काही तिकडं घडत नाही. ही एक कौतुकास्पद बाब असते तिकडे..
काही वर्षांपूर्वी एका परदेशी मित्रानं एक पुस्तक सुचवलं. वाचच म्हणाला. पाश्र्वभूमी होती भारतातल्या काही निर्णयांची. काही महत्त्वाच्या आस्थापनांची पुनर्रचना, एका बडय़ा बँकेकडून व्यवस्थापन सल्लागार, सरकारी खात्याकडनं मिळालेलं कंत्राट..वगैरे अशा अनेक घटनांची. मुळाशी एकच नाव होतं. मॅकेंझी.
म्हणजे अमेरिकेतली बलाढय़ व्यवस्थापन गुरू, सल्लागार वगैरे. जगात सर्वाधिक दबदबा असलेली कंपनी. जवळपास ९२ वर्षांच्या या जुन्या कंपनीचा स्पर्श म्हणजे जणू परीसच असं मानलं जातं, अनेक वर्तुळात. तेव्हा त्याबाबत या मित्रानं पुस्तक सुचवलं. ‘द फर्म : द इनसाइड स्टोरी ऑफ मॅकेंझी’. या कंपनीच्या उद्योगांचा संपूर्ण आढावा या पुस्तकात आहे. चांगलाच धक्का बसतो ते वाचून.
मॅकेंझीच्या वास्तवाचा तो पहिला परिचय.
त्यानंतर रजत गुप्ता यांचं प्रकरण घडलं. उद्योगजगतात ते अत्यंत वंदनीय. मॅनेजमेंट गुरू. फारच आदरानं घेतलं जायचं त्यांचं नाव. पण नंतर अमेरिकेतच इनसाइड ट्रेडिंग प्रकरणात ते दोषी सिद्ध झाले आणि तुरुंगवास सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. समस्त जागतिक व्यवसाय- विश्वाला तो धक्का होता. रजत गुप्ता म्हणजे अगदी प्रात:स्मरणीय नाव. ते मॅकेंझीचे प्रमुख होते. त्याच काळातला हा घोटाळा.
मॅकेंझीशी झालेला तो दुसरा परिचय. एव्हाना अंदाज आला होता, ही कंपनी काय काय करू शकते आणि करते, याचा. एन्रॉन, जनरल मोटर्सचा फसलेला प्रकल्प, के.मार्ट अशा अनेक वादग्रस्त ठरलेल्या उद्योगांची सल्लागारही मॅकेंझीच. त्यामुळे ‘मॅकेंझी म्हणजे काय बुवा..’, अशी मानसिकता राहिली नव्हती.
त्यामुळे या कंपनीचा तिसरा परिचय जराही धक्कादायक वाटला नाही. तो समोर आला न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्राच्या शोधपत्रिकारितेतून. ही एक कौतुकास्पद बाब असते तिकडे. मॅकेंझी अमेरिकी. आणि न्यू यॉर्क टाइम्सदेखील अमेरिकीच. तरीही आपल्या देशातली कंपनी आहे, जरा दुर्लक्ष करा वगैरे असं काही घडलं नाही. याच देशातल्या सीएनएन या वाहिनीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची जगात बदनामी केल्याचा आरोप केला. विषय होता, ट्रम्प यांच्या अनेक नको त्या उचापतींना सीएनएनकडून जगात दिली जाणारी प्रसिद्धी. ट्रम्प यांच्या मते अमेरिकेची अब्रू या पत्रकारितेमुळे चव्हाटय़ावर येते. त्यावर सीएनएनच्या संपादकांनी दिलेलं उत्तर ऐतिहासिक आहे : अमेरिकेचं जगात प्रतिनिधित्व करणं हे आमचं काम नाही. तुमचं आहे. आमचं काम आहे वस्तुनिष्ठ बातमी देणं. तेच आम्ही करतोय.
आता याच वर्तमानपत्रानं मॅकेंझीची नव्यानं ओळख करून दिलीये.
निमित्त आहे मॅकेंझीच्या चीनमधल्या मेळाव्याचं. राष्ट्रीय/बहुराष्ट्रीय कंपन्या हे असं करत असतात. असा वार्षिक मेळावा परदेशात घेतात. त्या निमित्तानं कंपनीच्या खर्चानं त्या कंपनीतल्या ज्येष्ठांना मौजमजा करता येते. तसाच हा वार्षिक मेळावा. अगदी अलीकडे भरवला गेलेला. ऐतिहासिक सिल्क रूटच्या मार्गावरच्या कशगर प्रांतात वाळवंटात एक नयनरम्य नगरीच त्यासाठी उभारली गेली. त्याची छायाचित्रंही न्यू यॉर्क टाइम्सनं प्रकाशित केली. त्यावरनं या मेळाव्याच्या आकाराची कल्पना येते. प्रचंड अंतरावर उभारले गेलेले अद्ययावत तंबू, त्यामध्ये प्रवास करण्यासाठी घातलेले लाल गालिचे, दिमतीला सजवलेल्या उंटांचे काफिले वगैरे. तिथं जगातल्या अत्यंत आदरणीय वगैरे सल्लागार कंपनीचे पदाधिकारी पाहुणचार घेण्यात मग्न होते. पण तिथूनच अवघ्या चार मैलांवर चीन सरकारच्या छावण्या आहेत. तिथं उईगर जमातीच्या लाखांहून अधिकांना डांबून ठेवलं गेलंय. हे चीनमधले अल्पसंख्य. धर्माने मुसलमान. चीनला नकोसे झालेले. म्यानमारला कसे रोहिंग्या नकोसे झालेत, तसे चीनचे हे उईगर. त्यांनी मध्यंतरी चीन सरकारविरोधात आंदोलनही छेडलं होतं. तर अशा काही लाख उईगरांना चीन सरकारनं तिथं डांबून ठेवलं होतं. त्याचा इतका बभ्रा झाला की संयुक्त राष्ट्र संघटनेनं चीनची निंदा केली आणि या अमानुष कृतीचा निषेध केला.
पण मॅकेंझीला त्याचं काही नव्हतं. कसं असणार? कारण जवळपास डझनभर प्रादेशिक चिनी सरकारांसाठी ही कंपनी काम करतीये. इतकंच नव्हे तर दक्षिण चिनी समुद्रात जो काही कृत्रिम बेट तयार करण्याचा घाट घातलाय त्या देशानं त्यातदेखील सल्ला देणारी ही मॅकेंझी कंपनीच आहे. आणि गंमत अशी की अमेरिकी सरकार आणि चीन यांच्यातल्या अनेक मतभेदांच्या मुद्दय़ांतला एक आहे तो हा कृत्रिम बेटाचा. कारण त्यावरच्या लष्करी सज्जतेनं चीन थेट जपानला आव्हान देऊ शकतो. म्हणजे अमेरिकी सरकारलाही जे नको आहे ते मॅकेंझी करताना आढळली. मग न्यू यॉर्क टाइम्सनं या कंपनीवर संशोधन सुरू केलं. या कंपनीचे माजी प्रमुख, अन्य देशांतली केंद्रं, त्यांचे अधिकारी अशा अनेकांचा पाठपुरावा टाइम्सनं केला. त्यातून जो काही निष्कर्ष आला तो धक्कादायक आहे.
तो असा की मॅकेंझी नेहमीच सरकारांना हवा तसाच अहवाल देते. न्यू यॉर्क टाइम्स या सगळ्याचा साद्यंत तपशील सादर करतो. यात आहे चीनमधली अनेक उदाहरणं. ज्यात मानवाधिकारांचं उल्लंघन झालंय, नैतिकतेचे सर्व संकेत पायदळी तुडवले गेलेत अशा कंपन्या, प्रांत सरकार वगैरेंना मॅकेंझी सल्ला देते. चीनच्या बडय़ा १०० कंपन्यांतल्या २२ कंपन्यांशी मॅकेंझीचा थेट संबंध आहे. चीनचे सर्वेसर्वा क्षी जिनपिंग हे काही मानवी मूल्यांचे रक्षक नाहीत. पण ते अशी मूल्ये मानतात असं सांगत मॅकेंझी त्यांच्यासाठी वाटेल ती कामं करताना आढळली.
दुसरा असा देश म्हणजे सौदी अरेबिया. सध्या त्या देशात राजपुत्र महंमद बिन सलमान याचा जवळपास एकछत्री अंमल आहे. त्याच्या आदेशावरनं इस्तंबूलमधल्या सौदी दूतावासात विख्यात पत्रकार खाशोगी याची कशी हत्या करण्यात आली, याच्या कहाण्या ताज्याच आहेत. सौदीतही या सलमाननं आपले काका, चुलतभाऊ वगैरेंना तुरुंगात डांबल्याचं प्रसिद्ध झालंय. त्याच्या राजवटीचा खुंटा अधिकाधिक हलवून अधिकाधिक बळकट करण्याचं काम करणाऱ्यांत एक आहे मॅकेंझी.
व्लादिमीर पुतिन आणि अमेरिका हे संबंध काही तितकेसे चांगले नाहीत. त्यांची आणि ट्रम्प यांची जवळीक हा वेगळा मुद्दा. पण अमेरिका आणि रशिया यांचं काही बरं म्हणावं असं नाही. आणि पुतिन हे देखील काही लोकशाहीवादी नाहीत. मॅकेंझी ही मॉस्कोत पुतिन यांच्या अनेक खासगी उद्योगांत त्यांना मदत करते, असं हा टाइम्सचा वृत्तान्त दाखवून देतो. यातल्या बऱ्याच कंपन्यांवर अमेरिकेनं निर्बंध घातलेत आणि या सगळ्या कंपन्यांचा संबंध थेट क्रेमलिनशी..म्हणजे साक्षात पुतिन यांच्याशी..आहे.
मॅकेंझीचा आणखी एक मोठा ग्राहक म्हणजे तुर्कस्तानचे हुकूमशहा एर्दोगान. त्यांच्या भल्यासाठी मॅकेंझीनं बरंच काही केलंय. युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांची प्रतिमा घासूनपुसून लख्ख करण्यासाठीही मॅकेंझीनंच मदत केल्याचं हा वृत्तान्त दाखवून देतो. कहर म्हणजे या यानुकोविचनं मदत घेतली पॉल मानफोर्ट यांची. त्या बदल्यात मानफोर्ट यांना लाखो डॉलर मिळाले. आणि मानफोर्ट हे ट्रम्प यांचे निवडणूक एजंट. या व्यवहारासाठी ते आता तुरुंगात आहेत. आणि मॅकेंझी या निमित्तानं म्हणते, आम्ही व्यवसायासाठी कोणत्याच मूल्यांशी तडजोड करत नाही.
योगायोगच म्हणायचा. पण अलीकडे आपल्याकडच्या रोजगारनिर्मितीतील घोडदौडीचा अहवाल देणाऱ्या सल्लागार संस्थेचं नाव आहे मॅकेंझी.
केवळ योगायोग..!