भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यावर अमेरिकन प्रशासनाने केलेली कठोर कारवाई रास्त होती की नव्हती, यावर दोन्ही देशांच्या शासकीय अधिकाऱ्यांत दुमत असू शकते. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या घटना आणि दूतावासातील अधिकाऱ्याकडून अमेरिकेत अमलात असलेल्या कायद्याचा भंग झाला की नाही, यावर आपल्याकडील अधिकारी एक शब्द बोलत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. आरोप खरे की खोटे, याबद्दलही सगळे गप्पच.
परदेशातील दूतावासातील भारतीय अधिकाऱ्याचा अपमान म्हणजे भारत देशाचा अपमान, असे सांगत या प्रकरणाला वेगळे वळण देत ते अवास्तव वाढवून चिघळत ठेवले जात आहे. अशीच सहानुभूती उच्चपदस्थ आणि सामान्य नागरिकांना मिळते असेही नाही. परदेशी खासगी आणि सार्वजनिक संस्थेत अनेक भारतीय नोकरी व्यवसायात आहेत. त्यातील अनेकांवर वाईट, अगदी प्राणघातक प्रसंग ओढवतात.
काही वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये हत्या झालेल्या रवींद्र म्हात्रे यांचे प्रकरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अतिशय कुशलतेने आणि तडकाफडकी हाताळले खरे, परंतु ते वगळले तर अशा अनेक घटना आहेत की, आपल्या सरकारने त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही.
बरोबर वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उच्चशिक्षित युवकाची ब्रिटनमध्ये अशीच हत्या केली गेली होती. केरळमध्ये वर्षांपूर्वी दोन इटालियन शस्त्रधारी अधिकाऱ्यांनी तेथील समुद्रात दोघांना (बहुदा कोळी) विनाकारण ठार मारले. ते दोघे गुन्हेगार असूनही मोठय़ा अधिकाऱ्याप्रमाणे ते गुर्मीत न्यायालयात बसत. आत्ता ते घरी जाण्याची परवानगी घेऊन इटलीत गेले ! केरळमध्ये बळी गेलेले सामान्य कोळी होते म्हणून याप्रकरणी आपण इटलीतील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची तयारी दाखवत नाही असे तर नाही?
-डॉ. श्रीकांत परळकर, दादर
प्रसंगाचा बळी कोणीही असू शकतो !
भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यावर अमेरिकन प्रशासनाने केलेली कठोर कारवाई रास्त होती की नव्हती, यावर दोन्ही देशांच्या शासकीय अधिकाऱ्यांत दुमत असू शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2013 at 01:17 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anyone can be a victim of incidences