२०११ सालच्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये बरेचसे निदर्शक एकत्र जमले होते. ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ या नावाने ओळखल्या गेलेल्या त्या आंदोलनाचा रोख होता तो वित्तीय क्षेत्राच्या धुरीणांवर आणि अमाप संपत्तीभोवती वेटोळा घालून बसलेल्या धनिकांवर. ‘आम्ही ९९ टक्के’ असे या आंदोलकांचे घोषवाक्य तेव्हा खूप गाजले होते. दोन महिने चाललेले ते निदर्शन म्हणजे वाढत्या विषमतेविरुद्धचा जागर होता. जगभर त्याचे पडसाद उमटले होते. अमेरिकेत तेव्हा अशी आकडेवारी चर्चेत होती की, अमेरिकेतल्या एक टक्के सर्वात धनाढय़ मंडळींचा वार्षिक उत्पन्नातला वाटा १९८० सालातल्या दहा टक्क्यांवरून वाढून तोपर्यंत २३.५ टक्क्यांवर जाऊन पोचला होता. आंदोलनाच्या त्या गाजलेल्या घोषवाक्याची पाश्र्वभूमी या आकडेवारीत होती. त्या आंदोलनाची आठवण काढण्याचे कारण म्हणजे सध्या भारतात चर्चेत असलेला एक ताजा शोधनिबंध. या संशोधनानुसार भारतातल्या एक टक्के धनिकांचे वार्षिक उत्पन्नातले प्रमाण २२ टक्क्यांवर जाऊन पोचले आहे. गेल्या आठ दशकांमधले हे सर्वाधिक प्रमाण आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा