भारत आणि चीन यांच्यातले राजकीय संबंध सध्या कमालीचे ताणले गेलेले आहेत. तीनेक वर्षांपूर्वी साबरमतीच्या काठावर घेतलेल्या आणाभाकांनंतर साबरमतीमधून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आताच्या सीमेवरच्या कुरापतींच्या पाश्र्वभूमीवर चिनी मालावर भारतीयांनी बहिष्कार घालावा, असं आवाहन करणारे संदेश सध्या सामाजिक माध्यमांमधून फिरायला लागले आहेत. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आणि चीनबरोबरच्या व्यापाराची आकडेवारी पाहिली तर मात्र असं दिसून येतं की चीनमध्ये बनवलेल्या खेळण्यांची, मूर्तीची आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंची आयात हा तुलनेने मामुली मुद्दा आहे. ग्राहकांनी चिनी मालावर बहिष्कार घालणं हे फार तर वैयक्तिक देशप्रेमाचं प्रतीकात्मक प्रदर्शन बनू शकतं, पण त्यातून चीनच्या आर्थिक हितसंबंधांना खरवडण्याचाही परिणाम साधणार नाही. हल्ली काही काही कार्यालयांमध्ये म्हणे कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॉसचा राग आला की तो ठोसे मारून जिरवण्याकरिता ठोसेखाऊ पुतळे ठेवलेले असतात. ग्राहकांनी चिनी खेळण्यांवर बहिष्कार घालणं, हे काहीसं त्या पुतळ्यांवर ठोसे लगावण्यासारखं आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा