गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधल्या नोटाबदलाच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्था अडखळेल, हे बहुतेक विश्लेषकांना ठाऊक होतं. पण किती याचा अंदाज त्या वेळी वर्तवणं थोडं कठीण होतं. हा निर्णय चाकोरीबाहेरचा होता. त्याबद्दलचा जुना ठाशीव ठोकताळा नव्हता. सरकारने आणि रिझव्र्ह बँकेनेही म्हटलं होतं की याचा परिणाम तात्कालिक असेल. मुद्राधोरण समितीने अशा तात्कालिक परिणामाची दखल घेऊन धोरण आखायची गरज नाही, असं जाहीर करून उलट मुद्राधोरणाचा पूर्वीचा सैल पवित्रा बदलून महागाईच्या जोखमेवर भर देत तटस्थ पवित्रा स्वीकारला. एकंदरीत, नोटाबदलामुळे क्रयशक्तीला बसलेली खीळ जुजबी आणि काही दिवसांपुरतीच आहे, अशीच धोरणकर्त्यांची भूमिका राहिली. २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपल्यावर हाती आलेली आकडेवारी मात्र त्या समजाला सणसणीत धक्का देणारी आहे. नोटाटंचाईच्या काळात क्रयशक्ती मंदावली आणि आर्थिक विकासाच्या दरात मोठी खोट आली, हे या आकडेवारीतून ठामपणे दिसून येतंय. बाजूच्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या निर्देशांकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीत कशी वाढ झाली, त्याची आकडेवारी आहे. या निर्देशांकांचा जवळपास एकमुखी कौल असा आहे की दुसऱ्या सहामाहीत आर्थिक विकासाच्या गतीला करकचून ब्रेक लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा