अमेरिका आणि पाठोपाठ बाकीचे जग वित्तीय संकटाच्या आवर्तनात सापडले त्याला आता जवळपास एक दशक उलटत आले आहे. १९२९च्या जागतिक महामंदीनंतरचे सर्वाधिक प्रलयकारी संकट जागतिक अर्थव्यवस्थेने २००७-२००८ मध्ये अनुभवले. त्या प्रलयात काही बँका बुडाल्या आणि बहुतेक देशांमध्ये मंदी ओढवली. त्या वेळेस अमेरिकी केंद्रीय बँकेची – म्हणजेच फेडरल रिझव्र्हची किंवा फेडची – धुरा अर्थतज्ज्ञ बेन बर्नान्के यांच्या खांद्यावर होती. आपल्या आधीच्या संशोधकाच्या अवतारात त्यांनी महामंदीचा अभ्यास केला होता आणि फेडने त्या वेळेस मुद्रापुरवठा कमी होऊ दिला नसता तर महामंदीचा अंत लवकर झाला असता, अशा निष्कर्षांवर ते पोचले होते. योगायोगाने, आपले महामंदीच्या अभ्यासातले निष्कर्ष वापरण्याची वेळ त्यांच्यावर २००८ मध्ये आली. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी फेडने धोरणात्मक व्याजदर शून्याच्या जवळपास आणून ठेवले होते. तरीही प्रलयाचे पाणी ओसरण्याचे सोडा, आणखी वरवर चढत होते. फेडची परंपरागत हत्यारे निष्प्रभ झाल्यासारखी भासत होती. अशा वेळी मग बर्नान्के यांनी आपल्या भात्यातून नवेकोरे, अमेरिकेने तोवर कधीही न जोखलेले अस्त्र बाहेर काढले, ते होते क्वांटिटेटिव्ह इझिंगचे किंवा मुद्राविस्ताराचे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा