हे वर्ष सुरू झालं त्या वेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर सावळं धुकं होतं. २०१६ मध्ये ब्रिटनच्या जनतेने दिलेला ब्रेग्झिटचा कौल, युरोपात सुरू असलेलं एकीकरणविरोधी जनमताचं ध्रुवीकरण, अमेरिकेत ट्रम्प यांच्यासारख्या विवाद्य गृहस्थाची येऊ घातलेली अध्यक्षीय कारकीर्द, चीनच्या परकीय गंगाजळीला झपाटय़ाने लागलेली ओहोटी, ही सगळी पाश्र्वभूमी जागोजाग पेरलेल्या सुरुंगांप्रमाणे भासत होती. विकसित अर्थव्यवस्था अडखळत होत्या. गेली सहाएक वर्ष असा संकेतच बनून राहिला होता की वर्षांचे काही महिने उलटले की बहुतेक विश्लेषक त्या वर्षीच्या जागतिक आर्थिक विकास-दराच्या आपल्या अंदाजांना कात्री लावायचे. अशा बहुतांशी लेच्यापेच्या नकाशावर भारत मात्र जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी मुख्य अर्थव्यवस्था म्हणून उठून दिसत होता. नोटाबदलाचे परिणाम तोपर्यंत पुरते उलगडले नव्हते; आणि हा अल्पकालीन धक्का पचवून भारत आपली आघाडी कायम राखील, असाच अनेकांना विश्वास होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा