जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या मोठेखानी कादंबरीसोबत ‘द स्ट्रेन्ज लायब्ररी’ नामक एक छोटेखानी पुस्तकही २०१५ अखेरीस दाखल झाले होते. शंभर पानांच्या आसपास जाणारे सचित्र आणि नावाला जागत विचित्र. लघुकादंबरी, बालपुस्तक अशा कुठल्याही वर्गात टाकता न येणाऱ्या या कथात्म पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे दीड एक तासाच्या वेळेत ते वाचनमंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन पोहोचविते. सुरुवातीला ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’च्या धर्तीवर सुरू होणारा हा प्रवास यक्षगुंफेच्या अवघड पर्यटनाची अनुभूती वाचकाला देतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यातला निनावी नायक त्याच्या वाचनालयामध्ये पुस्तक बदलण्याचा साप्ताहिक शिरस्ता पाळत असताना पुस्तकाला सुरुवात होते. आपण कसे वेळेत पुस्तके बदलतो आणि कसा उशिराचा दंड भरावा लागत नाही, याबाबतचे वर्णन करीत असताना, तो नव्या पुस्तकांसाठी सांगितल्या गेलेल्या वाचनालयाच्या विशिष्ट दालनात दाखल होतो. मोठय़ा जंगलाला वणवा लागून गेल्यानंतर उरलेल्या अवशेषासारखे डोक्यावरचे केस असलेला एक बुटका वृद्ध त्याला तेथे सापडतो. जगातील कोणत्याही विषयावरील पुस्तक वाचनगृहात असल्याचा हा वृद्ध दावा करतो.
आता नायक सांगायचेच काही तरी म्हणून मनात आलेल्या अचाट, विक्षिप्त कल्पनांना बाहेर काढून ‘ऑटोमन साम्राज्यात कर कसा गोळा केला जाई’ यावर पुस्तक आहे का, अशी रेवडीयुक्त विचारणा करतो. यावर पुस्तक नसणारच याची खात्री असलेल्या नायकासमोर वृद्ध माणूस एक नाही, तर ‘ऑटोमन साम्राज्यातील करभरणा यंत्रणा’, ‘एका (तत्कालीन) कर-कारकुनाची रोजनिशी’ आणि ‘करामुळे झालेली बंडाळी व तिचे दमन’ असे तीन मोठाले ग्रंथ उपलब्ध करून देतो. हे पुस्तक वाचण्यासाठी त्याला जबरदस्तीने वाचनमंदिराच्या आतमध्ये तळघरसदृश ठिकाणी आणून सोडतो. अध्र्या तासात ही पुस्तके चाळून घरी परतू, अशा विचारात असलेला नायक विश्वासाने तेथे जातो. पण पुढे त्या तळघरातील कारागृहामध्ये कायमसाठी बंदिस्त केला जातो. मग नायकाच्या वाचनामुळे तयार होणाऱ्या ज्ञानवर्धित मेंदूचाच आस्वाद या वृद्धाला घ्यायचा असतो, ही नवी माहिती त्याच्यासमोर येऊन ठाकते. या कारागृहात त्याला पहिले मेंढय़ाचे कातडे परिधान केलेला माणूस भेटतो, जो उत्तम बल्लवाचार्यही असतो. अन् आवाज नसलेली अन् आपल्या शरीराचे हव्या त्या रूपात बदल करू शकणारी समवयीन मुलगी त्याची परिचित होते. वाट पाहत राहिलेल्या आईची काळजी करता करता त्या कारागृहात कर गोळा करणाऱ्या माणसाची रोजनिशी वाचता वाचता तो ऑटोमन साम्राज्यातच जाऊन पोहोचतो आणि नंतर मेंढामाणूस, रूपबदली मुलगी यांच्या सोबतबळावर बाहेर पडण्याची योजना आखतो.
एनिड ब्लायटन, लुईस कॅरल, फ्रँकलिन डिक्सन आदींच्या खूपविक्या सुखांतिक बालसाहित्य परंपरेप्रमाणे चालणारी ही गोष्ट आपले कोणतेच आडाखे बरोबर येऊ देत नाही. इथला यक्षगुंफेचा प्रवास हा अनेकार्थाने वाचनालयांत पुस्तकांच्या जगात बुडालेल्या जिवाविषयीचे मोठे रूपक सादर करतो. मुराकामीची ठेवणीतील भिन्न शैली, तो जगभरात लोकप्रिय का आहे, अन् त्याचे कुठलेही लेखन हे अनपेक्षित धक्के का देते, याची खातरजमा करण्यासाठीही हे पुस्तक अजब मामला आहे.
वाचणाऱ्यांच्या जगात प्रत्येक जण वाचनालयांतील पुस्तकांमुळे अशक्य अशा जगात शिरत असतो. पुस्तके माणसांना घडवितात. तितकीच बिघडवितातही. प्रत्येक वाचकाचे विचारविश्व हे वाचनाच्या बळावर विस्तारलेले अथवा संकोचलेले असते. भली किंवा बुरी, तऱ्हेवाईक किंवा सामान्य, अरभाट किंवा चिल्लर अशी विचारसरणी असलेल्या वाचकांचे थर भोवती सतत अस्तित्वात असतात. मुराकामीच्या कादंबरीतील यक्षगुंफेचे पर्यटन भरपूर फॅण्टसीयुक्त असले, तरी त्यातील तुरुंग-तळघर ‘वाचनाने दिलेल्या विचारांत प्रत्येक व्यक्तीचे अडकलेपण’ दर्शवितो. कोणत्याही अट्टल वाचकाला आपल्या वाचनाबाबत दुरभिमान असतो. आपण वाचलेले, आकलन झालेले जग हे सर्वसमावेशक असले तर ठीक, नाही तर आयुष्यभर एकांगी विचारांचा प्रवास त्या त्या वाचक थराला अटळच असतो. हे पुस्तक लहान मुलांसाठीच्या पुस्तकांसारखेच दिसत असले, तरी त्याचा अपेक्षित वाचकवर्ग मात्र प्रगल्भ आकलनशक्ती असलेला, सर्वच विचारांचे मुक्त स्वागत करणारा प्रौढ वर्गच आहे.
वाचण्याविषयी आणि वाचणाऱ्यांच्या पुस्तकवेडाविषयी ‘बुक्स ऑन बुक्स’ वाचण्याची खुमखुमी ही वाचनाच्या टप्प्यातील खूप पुढली अवस्था असते. आपल्या वाचनवेडाशी जगाला पडताळून पाहण्याची, त्यात आपले वाचनप्रेम कुरवाळण्याची संधीही वाचक साधत असतात. पण प्रत्येक वाचणाऱ्याचा सुरुवातीचा नवथरटप्पा हा वाचनालयांशी निगडित असतो. घराजवळ सहज उपलब्ध असलेल्या स्थानिक छोटुक लायब्रऱ्यांपासून ते शहराच्या मुख्य भागात लांबवर जाव्या लागणाऱ्या वाचनालयांपर्यंत प्रत्येक वाचक हा परधार्जिणा सुखात्मा असतो. निदान या दशकाआधीपर्यंत तरी वाचन व्यवहाराची ही स्थिती शेकडो वर्षे कायम होती. मात्र ई-बुक्सचा वाढता जगड्व्याळ पसारा आणि एकुणातच इतर माध्यमांनी जगण्यावर केलेल्या आक्रमणातून आलेली वाचन मर्यादा यांचा परिणाम वाचनावर झाला.
वाचण्याचा प्रकार बदलला. वाचणारा प्रत्येक जण मोबाइल, टॅबवर आपली खासगी लायब्ररी बनवून किंवा किंडल, ईबुक रीडरसारख्या आयुधांनी आपली स्वतंत्र पुस्तकगंगा हाताच्या तळव्यावर बाळगू लागला. या दरम्यानच्या काळात जगात सगळीकडेच पुस्तकालये किंवा वाचनमंदिरांना ओहोटी लागत गेली. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार अॅली स्मिथ यांचा ‘पब्लिक लायब्ररी’ हा कथासंग्रह म्हणजे या बदलाचे लंडन शहरापुरते दस्ताऐवजीकरण आहे. अर्थात लंडनचेच हे प्रारूप आपल्या अवतीभोवतीही बऱ्याच प्रमाणात सारखे असल्याचे जगभरातील वाचकांना वाटेल, अशी परिस्थिती आहे.
स्मिथ यांनी आपल्या कथांच्या या पुस्तकनिर्मितीच्या काळात समकालीन लेखक, मित्र-मैत्रिणी आणि अनोळखी व्यक्तींशीदेखील सार्वजनिक वाचनालयांबाबत चर्चा केल्या. सार्वजनिक वाचनालयांच्या धूळभरल्या पुस्तकवासाचा हळवेपणा अंगी बाळगणाऱ्यांपासून ते त्यातील कष्टदायक कार्डप्रकारांनी पुस्तके मिळवून विचारसमृद्ध होण्याच्या अनेक दाखल्यांना त्यांनी आपल्या प्रत्येक कथेनंतर जोडले आहे. अनुक्रमणिकेत या दाखल्यांना नाव असले, तरी त्यानंतर येणाऱ्या- दुपानी अथवा तिपानी रूपांत हजर असलेल्या ‘वाचनालयाच्या प्रेमकथा’ निनावी आहेत.
स्मिथ यांची कथारचना आयुष्यातील अत्यंत साध्या घटनांना साहित्यव्यवहाराशी जोडणारी आहे. कथन साहित्यावरील आस्था, काव्याच्या शब्दखेळातील आनंद शतकापार चाललेला अभिजात पुस्तके दिलेल्या साहित्यिकांत प्रवाह, व्यवहारातील छोटय़ा घटनांना साहित्यमूल्यांत बंदिस्त करणाऱ्या या छोटेखानी कथा आहेत. त्यातल्या अनेकांचा वाचनालयाशी थेट संबंधही नाही. पण वाचन-लेखन- पुस्तकप्रेम- दिग्गज साहित्यिक यांचे संदर्भ मात्र कथांमध्ये खोऱ्यांनी उतरलेले दिसतात.
‘लास्ट’ नावाच्या पहिल्याच कथेत रिकाम्या ट्रेनमध्ये अडकलेल्या व्हीलचेअरवरील अत्यंत गलेलठ्ठ महिलेला निवेदिकेची ट्रेनबाहेरून सोबत आहे. संवादाची शक्यता नाही, कारण ट्रेन पूर्ण काचबंद. संवादाचे आदान-प्रदान केवळ हातवाऱ्यांपुरते. पण या दरम्यान नायिका जाडपणापासून ते तेथील परिस्थितीपर्यंत वापरावयाच्या शब्दांच्या अनेक शक्यतांवर विचार करते. म्हणजे त्या महिलेची चिंता आहेच. पण त्याचसोबत त्या क्षणाला येणारे सारे विचार साहित्यगामी आहेत. कथेला अवघड वळणे नाहीत. दोन आणखी पात्रे या निवेदिकेसोबत हजर होतात आणि कथा सहजपणे संपताना निवेदिका निरोपाचीही नवी व्याख्या तयार करते. ही कथा अकथनात्मक साहित्यिक व्यवहारच दर्शविते. पण पुढे एका कथेमध्ये गेल्या शतकातील कादंबरीकार डी. एच. लॉरेन्स या साहित्यिकाचे चरित्र वाचून त्याच्या घराजवळील परिसराला शब्दरूप करते. एका कथेत गतकालीन कॅथरिन मॅन्सफिल्ड या लेखिकेच्या घरात तिच्या प्रेषिताशी संपर्कात येते. या सगळ्या कथा ओ. हेन्री कृत धक्कातंत्राच्या नियमांना बगल देऊन एका सरळ रेषेमध्ये चालतात. त्यात गोष्टीऐवजी शब्दांवरील प्रीतीची अनंत उदाहरणे अन् संदर्भाचा खजिना गोळा करणे हेच वाचकाचे काम उरते. परंतु या कथांनंतर येणारे ग्रंथालयांशी जोडले गेलेले अनुबंध मात्र प्रत्येकाला आपापल्या वाचनालयाच्या स्मृतिपटलांपर्यंत नेऊन सोडते. लेखिका सारा वूड लहानपणी मैत्रिणीसोबत शालेय सुटीत पुस्तकालयाकडे नेणारी सायकल रपेट आणि वाचलेल्या पुस्तकांबाबत सांगताना आता त्या वाचनालयाच्या अद्ययावत रूपाबाबत बोलतात. या पुस्तक भिंतींनी आयुष्याचा उत्सव कसा साजरा केला, त्याच्याबद्दल भरभरून सांगतात. मार्क ट्वेनच्या हस्ते १९०० साली उद्घाटन झालेले वाचनालय बंद करून, ती जागा ‘पुनर्विकास’ म्हणून बिल्डरमंडळींना दिली जाण्याच्या प्रकाराबद्दल चार वर्षे नागरिकांच्या लढय़ाची माहिती एका दुपानी दाखल्यात येते. पाकिस्तानी लेखिका कमीला शम्सी कराचीमधील ब्रिटिश कौन्सिल वाचनालयाचे ऋण मान्य करताना अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्यानंतर ते बंद झाल्याची खंत व्यक्त करताना दिसतात. आज घडीला कार्यरत असलेल्या अनेक लेखकांच्या वाचनालयाशी निगडित भावुक गाथांची येथे गर्दी झालेली आहे.
हारुकी मुराकामीची ‘द स्ट्रेन्ज लायब्ररी’ असो किंवा अॅली स्मिथ यांची ‘पब्लिक लायब्ररी’, दोन्हींचे विषय आणि आशय भिन्न असले, तरी ते वाचकाच्या ग्रंथालयधार्जिण्या अवस्थेतील साहित्यगोडीच्या विविध पातळ्या प्रगट करतात. अॅली स्मिथ यांच्या या पुस्तक लेखनाच्या काळात एकटय़ा लंडनमध्ये काही हजार वाचनालये बंद पडली. पुस्तक प्रकाशनानंतर आजपर्यंत त्यात शेकडोंची भर झाली असेल. जगभरातील आकडेवारी आणखी भीषण असू शकते. तरीही वाचनाचा अनन्वित आनंद देत यक्षगुंफेच्या पर्यटनावर नेणाऱ्या अशा पुस्तकांचे असणे निदान या पिढीसाठी खूपच महत्त्वाचे आहे.
पंकज भोसले
pankaj.bhosale@expressindia.com
‘पब्लिक लायब्ररी’
लेखिका : अॅली स्मिथ,
प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस, यूके
पृष्ठे : २१८, किंमत : ५९९ रु.