अरुण जाखडे आणि सुनील मेहता या मराठी प्रकाशकांच्या निधनवार्ता जानेवारीत एकापाठोपाठ आल्या तेव्हा त्यांची प्रकाशनगृहं (अनुक्रमे ‘पद्मगंधा प्रकाशन’ आणि ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’) सुरूच राहावीत, अशी प्रामाणिक सदिच्छा साऱ्याच ग्रंथप्रेमींच्या मनांत तरळून गेली असेल. साहजिकच ते.. माणसं येतात आणि जातात, पण संस्थेनं टिकावं. प्रकाशनगृहानं तर नुसतं टिकू नये, बहरत राहावं. रॅण्डम हाऊस आणि पेंग्विन या दोन प्रकाशनगृहांचं एकत्रीकरण झालं २०१३ मध्ये. त्यापैकी बडी संस्था अर्थातच पेंग्विन. पण आजतागायत ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’ असंच या प्रकाशनसंस्थेचं नाव लावलं जातं. रॅण्डम हाऊस नावापुरतं का होईना, आहे. हे असंच २०१६ मध्ये झालं होतं. वेस्टलँड हे भारतीय प्रकाशनगृह ‘अ‍ॅमेझॉन’नं विकत घेतलं. पण त्यानंतरही, आजतागायत ‘वेस्टलँड बुक्स’ याच नावाखाली या संस्थेची पुस्तकं प्रकाशित होत राहिली. वेस्टलँडच्या शाखा (इम्प्रिंट्स) बऱ्याच होत्या. त्यापैकी ‘एका’ ही हल्लीच नावारूपाला आलेली आणि भारतीय भाषांमधलं लक्षणीय लिखाण इंग्रजीत आणणारी.   ‘ट्रांकेबार’ ही तरुणांचं लेखन छापणारी, तर ‘कॉन्टेक्स्ट’ ही काहीशी धाडसीच. त्यासुद्धा अ‍ॅमेझॉनच्या मालकीखाली, आपापल्याच नावांनिशी वाढत राहिल्या होत्या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

..होत्या! आता नाही वाढणार त्या.

बंद झालं वेस्टलँड. अ‍ॅमेझॉननं बंद केलं.

ही बातमी १ फेब्रुवारीच्या मंगळवारची. वेस्टलँडचे सीईओ गौतम पद्मनाभन यांच्याकडून सारे ग्रंथसंपादक आणि अन्य कर्मचारी, अधिकारी यांना एक अंतर्गत संदेश पाठवण्यात आला, त्यातून हे स्पष्ट झालं की ‘वेस्टलँड’ आता बंद होणार आहे. तशी बातमी, ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या नामांकित वृत्तसंस्थेनं दिलेलीच आहे आणि मंगळवारपासून आतापर्यंत कोणीही त्याचा इन्कार केलेला नाही. उलट, यानिमित्तानं प्रतिक्रियांचे सूर अनेक उमटत आहे. बेंगळूरुच्या एका दैनिकानं तर, त्या शहरातल्या ग्रंथविक्री दुकानांना ‘वेस्टलँड’’बद्दल बोलतं केलं. त्यातून हळहळ तर व्यक्त होणारच होती, पण त्याखेरीज एक बातमी मिळाली ती अशी की, बहुतेक सारी दुकानं ‘वेस्टलँड’, ‘ट्रांकेबार’ आणि ‘कॉन्टेक्स्ट’च्या पुस्तकांची मागणी नोंदवताहेत. कारण काय तर, ही पूर्वप्रकाशित पुस्तकं कुठं जाणार, याबद्दल कुणालाच काहीही माहीत नाही. मग त्यातली लोकप्रिय पुस्तकं ‘आऊट ऑफ पिंट्र’ झाली, कुठल्या तरी गोदामात पडून राहिली, तर?

तसं होणार नाही, याचं कारण अखेर हे अ‍ॅमेझॉनच्या मालकीचं प्रकाशनगृह आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत त्यांचे व्यवहार अगदी नित्याप्रमाणेच सुरू राहतील. मग १ मार्चपर्यंत ते टप्प्याटप्प्यानं गुंडाळले जातील. कदाचित याच १५ दिवसांच्या काळात कधी तरी, आम पुस्तकप्रेमी वगैरेंना अ‍ॅमेझॉनकडून अधिकृतपणे- जाहीर निवेदनाद्वारे सांगितलं जाईल की ‘वेस्टलँड’च्या पुस्तकांचं नेमकं काय होणार आहे.

पण आत्ता जी काही चर्चा आहे ती, असा तडकाफडकी निर्णय का झाला असावा, अ‍ॅमेझॉननं ‘वेस्टलँड’ विकून टाकली नाहिये, सरळ बंदच केलीय. असंच पाऊल का उचललं गेलं असावं?

काही जण म्हणतात, करोनाकाळानं साऱ्यांचंच कंबरडं मोडलं वगैरे. ग्रंथविक्रीचा व्यापार पार मंदावला, तो दुकानांचा. पण अ‍ॅमेझॉन? खरं वाटेल का कुणाला?

त्यातूनच सुरू झाली ती दुसरी, दबक्या आवाजातली चर्चा. ती अगदी प्रस्तुत बुकबातमीदारानंही, मुंबईतल्या एका मोठय़ा ग्रंथदुकानातल्या एका सरळमार्गी विक्रेत्याकडून ऐकलेली आहे. या चर्चेचं स्वरूप राजकीय कटकथासदृश असणार, हे ‘दबक्या आवाजा’च्या उल्लेखानंतर निराळं सांगायला नको. यातही, वेस्टलँडच्या प्रचंड खपाच्या यादीत असलेले अमीश किंवा अश्विन संघी या लेखकांवर कुणाचाच रोख नाही. ‘कॉन्टेक्स्ट’ या उपशाखेतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी मात्र जवळपास ७० टक्के पुस्तकं ही, ज्यांना ‘फुरेगामी, सिक्युलर’ म्हणून हिणवलं जातं अशांची आहेत. आकार पटेल यांचं अलीकडे गाजणारं पुस्तक याच कॉन्टेक्स्टचं. शिवाय हल्ली ‘जरा जास्तच’ बोलू लागलेले जनप्रिय लेखक चेतन भगत हेही २०१७ पासून वेस्टलँडचेच लेखक. आता यातल्या नेमक्या कशानं ‘शीर्षस्थ नेत्यां’चं डोकं तापलं असेल, हे चर्चा करणाऱ्यांनाच अधिक ठावे. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवू की, १५ फेब्रुवारीनंतर एक बऱ्यापैकी चाललेली, अनेक वाचनीय पुस्तकं काढणारी भारतीय इंग्रजी प्रकाशनसंस्था बंद पडते आहे.

या ‘वेस्टलँड’नं अनेकांना लिहितं केलं होतं हो.. अमृता त्रिपाठी या त्यापैकी एक. इंग्रजी चित्रवाणीवर अँकर होत्या २००० च्या दशकात. त्यांना नोकरीतल्याच वाईट अनुभवामुळे मानसिक आजार झाला, त्यातून त्या बऱ्या झाल्या. त्यांचं ‘ब्रोकन न्यूज’ वेस्टलँडनंच ‘ट्रांकेबार’या उपशाखेतर्फे छापलं होतं. पुढे त्रिपाठी यांनी मानसिक आजारांचा अनुभव असलेल्या इतरांनाही बोलतं केलं, त्याचं संकलन केलं आणि त्यातून तीन विविध पुस्तकांची मालिकाच अन्य प्रकाशनगृहानं (सायमन अ‍ॅण्ड शूस्टर) काढली वगैरे. पण मूळच्या त्या वेस्टलँडच्या.

तर कुणी सांगावं? आता ‘वेस्टलँड’बद्दलच कुणी तरी इथं संपादनकार्य करणारं पुस्तकही लिहील. पण मग, ते पुस्तक ‘अ‍ॅमेझॉन’वरून मिळेल का?