डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतीय संविधानच्या मसुदा समितीचे अध्यक्ष’ या एकेकाळच्या पदनामावरून ओळखलं जाण्याऐवजी त्यांना ‘घटनाकार’ म्हणणं हे आर्ष अभ्यासकी दृष्टिकोनातूनही कसं उचित आहे, हे अलीकडेच ‘आंबेडकर्स प्रिअॅम्बल’ या पुस्तकानं सप्रमाण दाखवून दिलं. आपल्या राज्यघटनेतील प्रत्येक मूल्याची चर्चा डॉ. आंबेडकरांमुळे कशी पूर्णत्वाला गेली आणि या मूल्यांचा उद्घोष अखेर घटनेच्या सरनाम्यात किंवा प्रास्ताविकेत (प्रिअॅम्बलमध्ये) कसा झाला, याचा ऐतिहासिक आणि तत्त्वचर्चात्मक धांडोळा घेणारं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक आकाशसिंग राठोड हे खरोखरच बहुपेडी व्यक्तिमत्त्व. त्यांची याआधीची पुस्तकं प्लेटो, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्याहीबद्दल आहेत आणि त्यांच्या नावावर असलेल्या सुमारे दहा पुस्तकांपैकी चार ही ‘न्याय’ या संकल्पनेचा अभ्यास करणारी आहेत. मानवी हक्क हाही याच न्यायकल्पनेचा भाग. न्याय ही संकल्पना केवळ कोर्टकचेऱ्या आणि कायदे यांपुरती अर्थातच नाही. खासगी जीवनात ‘नीतिमत्ते’चं जे स्थान ते सार्वजनिक जीवनात न्यायविचाराचं. हा विचार डॉ. आंबेडकर यांनी कसकसा केला होता, कशा प्रकारे मांडला होता याची चिकित्सा करणाऱ्या (म्हणजे गोडवे गाणाऱ्या नव्हे, संदर्भासह उणिवाही दाखवून देणाऱ्या) पाच खंडांच्या संपादनाची जबाबदारी या राठोड यांनी स्वीकारली आहे. ‘बी. आर. आंबेडकर : द क्वेस्ट फॉर जस्टिस’ अशा नावाच्या या पाच खंडांचे प्रकाशक आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस! या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची भारतीय शाखा ही एरवीदेखील भारतविषयक पुस्तकं प्रकाशित करत असतेच.. पण हे पाच खंड भारतीय शाखेतर्फे नव्हे; तर ‘ओयूपी ग्लोबल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य शाखेकडून प्रकाशित होणार आहेत. पाचही खंडांची मिळून पृष्ठसंख्या आहे १४६५!
बुकबातमी : ‘घटनाकारां’चे न्यायअष्टक
अनेक देशांमधील अनेक विद्यापीठांत ‘दलित स्टडीज’ वा आंबेडकरी अभ्यासाची केंद्रे अथवा अध्यासने आहेत
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-04-2020 at 00:04 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkars preamble a secret history of the constitution of india book review abn