समजा एखादी व्यक्ती कितीही अतिरूक्ष, अतिनीरस आणि आयुष्याला विटलेली असली, तरी तिन्ही त्रिकाळ चौसष्टपैकी आजूबाजूला घडत असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या कलेसोबत तिला जगणे भाग असते. जागृत वा अर्धजागृत अशा कोणत्याही अवस्थेत हे अटळच असते. तुम्ही कधीच कलाहीन जगू शकत नाही. आवड-सवड नसली तरी जगताना प्रत्येकाच्या आजूबाजूला गाणे, सिनेमा, संगीत आणि साहित्याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाश्र्वभूमी सुरू असतेच. प्रत्येक जण त्याकडे कोणत्या वकुबाने पाहतो, हे त्याच्या कलाआस्वादनाचे रूप ठरवते. पण कला जगण्यासाठी वा कळण्यासाठी असामान्य व्यक्ती असण्याची किंवा विशिष्ट शिक्षणाचीही गरज नसते. रस्त्यावरील जत्रेत प्राणघातक अदाकारी साकारणारे डोंबारीही कलाच जगतात आणि अखंड मेहनत करून टीव्हीवरील नृत्यस्पर्धाच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या मतजोगव्यावर जिंकणारे-हरणारे कलाकारही कलेमध्ये रममाण असतात. आपण जे ऐकतो, पाहतो आणि अनुभवतो, आपल्या इतिहासाला जेवढे डोक्यातून लादतो आणि वर्तमानात जे उपभोगतो त्या सर्वावर कुठल्या ना कुठल्या कलेचे अस्तर असते.. अॅली स्मिथ यांची ‘ऑटम’ वाचल्यानंतर जाणवणारा विचारचाव्यांचा हा जुडगा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा