|| आनंद मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘घराणेशाही नको’ म्हणून अनेक कंपन्यांनी व्यावसायिक ‘सीईओ’ नेमले; त्यांपैकी काही जणांना अपयशामुळे पायउतार व्हावे लागले. अशा १५ उदाहरणांचा अभ्यास काय सांगतो?

  • ‘क्रॅश : लेसन्स फ्रॉम द एन्ट्री अ‍ॅण्ड एग्झिट ऑफ सीईओज्’
  • लेखक : आर. गोपालक्रिष्णन
  • प्रकाशक : पेंग्विन पोर्टफोलिओ
  • पृष्ठे: २८०, किंमत : ४९९ रुपये

प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय उद्योगक्षेत्रात सर्वोच्चपदी व्यावसायिकतेपेक्षा रक्ताच्या नात्यांना- परिणामी घराणेशाहीला प्रथम पसंती दिली जाते, असा अनेक भारतीयांचा आक्षेप असतो. त्यामुळे भारतीय कंपन्यांत शिक्षण वा अनुभवाच्या जोरावर तुम्ही व्यवस्थापकाच्या (मॅनेजर) पदापर्यंत पोहोचू शकता; परंतु सर्वोच्च कार्यकारी अधिकारी (चीफ एग्झिक्युटिव्ह ऑफिसर : सीईओ) म्हणून अधिकार मिळणे इथे दुरापास्त असते, हा त्या आक्षेपाचा पुढचा भाग असतो. अर्थात, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारतीय उद्योगक्षेत्र पाश्चिमात्य देशांपेक्षा अद्याप बाल्यावस्थेत आहे. समभाग वापरून भांडवल गोळा करणे ही संकल्पना जरी भारतीय समाजात आता शे-सव्वाशे वष्रे जुनी झालेली असली, तरी रोखे बाजारात सहभाग घेणाऱ्या भारतीयांचे संख्याबळ अजूनही अत्यल्प आहे.

समभागधारकांनी भांडवलासाठी पैसे देऊन ईस्ट इंडिया कंपनीसारखी बहुराष्ट्रीय कंपनी इंग्लंडमध्ये इ. स. १६०० साली सुरू झाली. त्यावेळी भारतीय उद्योगक्षेत्राने भांडवल उभारणीसाठी पूर्वजांची मालमत्ता आणि नातेसंबंध याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही मार्गाचा विचार केलेला नव्हता. त्यामुळे भांडवलाचा पुरवठा आणि उद्योगाची जोखीम या दोन्हींची जबाबदारी एकाच घरावर पडणे स्वाभाविक होते. परिणामी समभागधारकांचे हित किंवा व्यावसायिकतेचे महत्त्व या संकल्पना भारतीय उद्योगक्षेत्रात रुजण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालू आहे.

आर्थिक उदारीकरणानंतर- १९९२ पासून सेबीने भांडवल बाजारात अधिक महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९९९- २०००- २०१३ असे टप्पे घेत भारतात कंपनी सुरू करणाऱ्या घराण्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तीने कंपनीच्या संचालक मंडळात असणे (बाह्य़ आणि स्वतंत्र संचालक : इंडिपेण्डन्ट डायरेक्टर्स) ही संकल्पना भारतात रूढ झाली. संचालकांच्या बाबतीत कायदा करणे आवश्यक असले, तरी ‘सीईओ’च्या बाबतीत मात्र कायदा करणे म्हणजे कंपनीच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करणे होईल. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात सीईओ नेमणे ही कंपनीची अंतर्गत बाब मानली जाते. अनेक भारतीय कंपन्यांत अद्यापही मूळ प्रवर्तकाच्या घरातील व्यक्ती कंपनीच्या शीर्षस्थानी काम करताना दिसून येतात.

भारतीय कंपन्यांत व्यावसायिक कार्यकारी अधिकारी दिसणे तुरळक असले, तरी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांत भारतीय वंशाच्या व्यक्ती केंद्रस्थानी दिसतात. ‘पेप्सी’मध्ये इंद्रा नूयी, ‘गूगल’मध्ये सुंदर पिचई, ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये सत्या नादेला, ‘अडोब’मध्ये शंतनू नारायण यांसारखे अनेक भारतीय शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार यशस्वीपणे हाताळताना दिसत आहेत. मात्र, सर्वोच्च पदावर व्यावसायिक अधिकारी नेमले म्हणजे ते कंपनीला कायम यशाची नवनवी क्षितिजे दाखवण्यात यशस्वी होतीलच याची खात्री नसते. २००८ च्या आर्थिक संकटानंतर ‘सिटी ग्रुप’ने निवडलेले विक्रम पंडित, ‘डॉइश बँके’ने निवडलेले अंशुमन जैन यांचा कार्यकाळ किंवा ‘वोल्टाज’मधील रमेश सरीन आणि ‘इन्फोसिस’मधील विशाल सिक्का यांचा कार्यकाळ आणि त्यानंतर त्यांना सोडावा लागलेला पदभार हीदेखील लक्षणीय उदाहरणे आहेत. याचा अर्थ व्यावसायिक सीईओ हा कंपनीसाठी आणि त्या पदावरील व्यक्तीसाठी एक महत्त्वाचा निर्णय असतो. तो यशस्वी होईलच याची खात्री नसते. पण येत्या काळात उद्योगांची गुंतागुंत इतकी वाढत जाईल की, व्यावसायिक सीईओ ही कंपन्यांची अत्यावश्यक बाब होणार आहे. त्यामुळे सीईओ नेमताना कंपनी आणि सीईओने कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, याचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. आर. गोपालक्रिष्णन यांचे ‘क्रॅश : लेसन्स फ्रॉम द एन्ट्री अ‍ॅण्ड एग्झिट ऑफ सीईओज्’ हे पुस्तक याच मुद्दय़ांचा ऊहापोह करते.

लेखक आर. गोपालक्रिष्णन हे ‘द माइंडवर्क्‍स’ या ब्रॅण्डद्वारे कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कोलकाता विद्यापीठातून भौतिकशास्त्र, नंतर आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी आणि शेवटी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचा अभ्यास पूर्ण करून लेखक अनेक भारतीय आणि अभारतीय कंपन्यांत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ‘टाटा सन्स’मध्ये कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला. सध्या ते ‘कॅस्ट्रोल इंडिया’ आणि ‘हेमास होल्डिंग’ या कंपन्यांचे बाह्य़ संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि कंपन्यांना व संचालकांना मार्गदर्शन करतात.

‘क्रॅश’ या पुस्तकात गोपालक्रिष्णन यांनी पंधरा उदाहरणे (केस स्टडीज्) वापरून कंपन्यांना आणि सीईओंना मार्गदर्शन केले आहे. सर्व पंधरा केस स्टडीज् या व्यावसायिक सीईओंच्या निवडीनंतर आलेल्या अपयशाच्या आहेत. हे अपयश का आले असावे आणि असे अपयश आपल्या पदरी पडू नये म्हणून कंपनी व सीईओने काय काळजी घेतली पाहिजे, या मुद्दय़ांचा ऊहापोह या पुस्तकात आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात गोपालक्रिष्णन यांची निरीक्षणे आणि प्रतिपादन, तर दुसऱ्या भागात पंधरा केस स्टडीज् मांडून आपल्या प्रतिपादनाचे उदाहरणासहित समर्थन; अशी या पुस्तकाची मांडणी आहे.

पहिल्या भागात गोपालक्रिष्णन यांनी जोसेफ जॉन कॅम्पबेल या अमेरिकी पुराण अभ्यासकाच्या १९४९ मधील ‘द हीरो विथ अ थाऊजंड फेसेस’ (हजार चेहऱ्यांचा नायक) या ग्रंथाचा आधार घेतला आहे. कॅम्पबेल यांच्या मते, जगभरातील कुठल्याही पुराणकथेतील नायकाच्या आयुष्यात काही टप्पे कायम दिसून येतात. ‘साधे जग > साहसाची हाक > द्विधा मन: स्थिती > सल्लागाराचा प्रवेश > उंबरठा ओलांडणे > परीक्षांचा काळ > खडतर आव्हानांची सुरुवात > सत्त्वपरीक्षा > विजय > बक्षीस > पुनस्र्थापना > नायकत्व’ याच टप्प्यांतून जगातील सर्व पौराणिक कथा फिरतात. मग ती रामायणातील रामाची कथा असो वा महाभारतातील कृष्णार्जुनाची कथा असो किंवा अन्य समाजांतील कोणत्याही पौराणिक नायकाची कथा असो.

जोसेफ कॅम्पबेल यांच्या प्रतिपादनाच्या धर्तीवर गोपालक्रिष्णन यांनी कंपनीने निवडलेल्या सीईओंच्या कारकीर्दीचे सहा टप्पे मांडले आहेत.  ते असे : ‘साधे जग > साहसाची हाक > द्विधा मन:स्थिती आणि निर्णय > खडतर आव्हानांचा काळ > सत्त्वपरीक्षा > पुनर्विचार आणि बहिर्गमन.’

गोपालक्रिष्णन यांनी पुस्तकात केवळ लौकिकदृष्टय़ा अयशस्वी वा वादळी कारकीर्दीचा आढावा घेतलेला असल्यामुळे त्यांनी मांडलेले टप्पे सीईओने अपयशानंतर पदभार सोडण्यावर संपतात. जे सीईओ यशस्वी झालेले आहेत, त्यांच्या यशस्वी होण्यामागील कार्यकारणभावाचा यात ऊहापोह केलेला नाही. सर्व अयशस्वी कारकीर्दीचे मूल्यमापन करताना गोपालक्रिष्णन यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे मांडली आहेत.

‘पॉवर टेन्ड्स टु करप्ट अ‍ॅण्ड अ‍ॅब्सोल्यूट पॉवर करप्ट्स अ‍ॅब्सोल्यूटली’ हे लॉर्ड अ‍ॅक्टन यांचे विधान नकारात्मक आहे. सीईओची नेमणूक करायची तर त्याला सर्वाधिकार देणे आवश्यक असते. मग त्याला मार्गदर्शक ठरेल अशी तत्त्वे कोणती? याबद्दल बोलताना गोपालक्रिष्णन यांनी प्रथम सत्य स्वीकारण्याचा मार्ग वापरला आहे. ‘अधिकारांमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीची अगम्य भविष्याचा वेध घेण्याची क्षमता कमी होऊन अति-आत्मविश्वास वाढतो; परिणामी चहूबाजूंनी येणारे संकेत ओळखण्यास तो कमी पडतो,’ हे सार्वकालिक सत्य मान्य करून गोपालक्रिष्णन यावर मात कशी करायची या मुद्दय़ाकडे वळतात. अपयशाचे धनी बनू नये म्हणून सीईओंनी कुठल्या गोष्टींपासून सावध राहायला हवे आणि त्यासाठी कुठली काळजी घ्यायला हवी, यासाठी पुस्तकात वेगवेगळी प्रकरणे आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की, सीईओ अपयशी होतो तेव्हा त्याची जबाबदारी केवळ त्याच्या एकटय़ावरच असते. कंपनी, मावळता सीईओ आणि संचालक मंडळ यांचीही तितकीच जबाबदारी असते, असे गोपालक्रिष्णन अधोरेखित करतात.

सामान्यत: जेव्हा प्रवर्तक किंवा त्याच्या घरातील कुणी पदावर असताना व्यवसाय पिछाडीवर पडू लागला, की मग व्यावसायिक सीईओची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यावेळी आर्थिक क्षमता आणि नफा पूर्वपदावर आणणे यास सीईओ प्राधान्य देतो. त्यासाठी तो जुनी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला संचालक मंडळ त्याला साथ देत असते; परंतु नंतर मात्र केवळ आर्थिक प्रगती हे ध्येय नसून उद्योगाची काम करण्याची आणि नातेसंबंधांकडे बघण्याची पद्धत हीदेखील महत्त्वाची आहे, हे संचालक आणि सीईओ या दोघांना ध्यानात येते. आणि मग कार्यक्षम सीईओच्या अपयशाची सुरुवात होते. त्यामुळे नेमणूक होताना ‘बदलाचे वारे आणण्यासाठीच तुम्हाला नेमले आहे’ असे जरी संचालक मंडळाने सांगितले, तरी कंपनीच्या मूळ आत्म्याला धक्का लागेल असे निर्णय घेताना सीईओला कायम सहानुभूतीपूर्वक नेतृत्व करायचे असते याकडे लेखक वाचकांचे लक्ष वेधून घेतो.

आरशाचे काम करणाऱ्या साहाय्यकांचे महत्त्व सांगताना लेखकाने सर विन्स्टन चर्चिल यांच्या पत्नीचे उदाहरण दिले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत चर्चिल जेव्हा शत्रुपक्षाच्या हृदयात धडकी भरवताना आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयातही भीती उत्पन्न करू लागले, तेव्हा चर्चिल यांच्या पत्नीने त्यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर उद्धृत करून लेखकाने त्याची तुलना हनुमानाशी कसे वागावे याचा सल्ला रावणाला देणाऱ्या बिभीषणाशी केली आहे. आपल्यातील दोष आपल्याला हळुवारपणे सांगून त्यापासून आपल्याला दूर ठेवणारे सहकारी हा यशस्वी सीईओचा मोठा गुण असतो.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात, ‘एचपी कंपनी’तील कार्ली फिओरीना, ‘सिटी बँके’तील जॅमी डिमॉन, ‘सिटी ग्रुप’मधील विक्रम पंडित, ‘एटी अ‍ॅण्ड टी’मधील जॉन वॉल्टर, ‘फोर्ड’मधील ली आयकोका आणि मार्क फील्ड्स, ‘वॉल्ट डिस्ने’मधील मायकेल ओविट्झ, ‘झेरॉक्स’मधील जी रिचर्ड थॉमन, ‘स्टारबक्स’मधील जिम डोनाल्ड, ‘उबर’मधील ट्रेव्हिस कलानिक, ‘सनोफी’मधील क्रिस विबाकर, ‘वोल्टाज’मधील रमेश सरीन, ‘अर्कोनीक’मधील क्लॉस क्लेनफिल्ड, ‘डॉइश बँके’तील अंशुमन जैन आणि ‘इन्फोसिस’मधील विशाल सिक्का यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत लेखकाने आपले पहिल्या भागातील प्रतिपादन सिद्ध करून दाखवले आहे. या पुस्तकात वापरलेल्या सर्व केस स्टडीज् या सन २००० नंतरच्या कालखंडातील असल्याने वाचकांना त्यातील मुद्दे समजणे सोपे जाते. लेखक स्वत: टाटा समूहाशी संबंधित असल्याने त्याने याच समूहातील सायरस मिस्त्रींचे उदाहरण वगळले असावे, असा माझा कयास आहे. त्याबद्दलही वाचायला वाचकांना आवडले असते. पण त्या केसच्या अनुपस्थितीमुळे पुस्तकाच्या उपयुक्ततेत काही उणेपणा येत नाही.

पुस्तकाचा शेवट करताना लेखकाने थॉमस मिड्लहॉफ या यशस्वी जर्मन सीईओचे उदाहरण दिले आहे. आयुष्यभर यशस्वीच असलेले थॉमस कारकीर्दीच्या अखेरीस आर्थिक गरव्यवहारात सापडले. शेवटी त्यांना तीन वर्षांची कैद भोगावी लागली. त्याबद्दल थॉमस म्हणतात, ‘मला नियम लागू होतच नाहीत असा माझा समज झाला होता. इतरांप्रति तुच्छता माझ्या स्वभावात आली होती. तिच्यामुळे माझा ऱ्हास झाला.’ थॉमस मिड्लहॉफ यांचे उदाहरण देऊन जणू लेखक सध्याच्या लोकप्रिय स्पायडरमॅन मालिकेतही आलेले ‘मोठय़ा अधिकारांबरोबर मोठय़ा जबाबदाऱ्या येतात’ हे वाक्य सर्व सीईओंना समजावून सांगतो!

पुस्तकाचा वाचक हा व्यवस्थापनशास्त्राचा विद्यार्थी किंवा सीईओ पदावर काम करणारी व्यक्ती आहे हे गृहीत धरून पुस्तकाची मांडणी केली असली, तरी सामान्य वाचकालाही यात रोजच्या जीवनात आपण कोणत्या चुका करतो हे चटकन दिसेल आणि त्यावर मात करण्याचा मार्गही दिसेल याची काळजी लेखकाने घेतली आहे.

लेखक वित्तविषयक घडामोडींचे अभ्यासक असून ब्लॉगही लिहितात. त्यांचा ईमेल : anandmore@outlook.com