‘दिल्ली राजधानी क्षेत्र’ म्हणवणाऱ्या प्रदेशाच्या ईशान्येकडचे अनेक भाग २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२० या चार दिवसांत जळत, धुमसत होते. एकंदर ५४ जणांनी या चार दिवसांमध्ये प्राण गमावले. जाळपोळीत अनेक घरांचं, व्यावसायिक गाळय़ांचं नुकसान झालं. ‘आमच्या कारकीर्दीत दंगली झाल्या नाहीत’ असा दावा सर्वच राज्यकर्त्यांना करायचा असतो, पण दिल्लीच्या दंगलीनं ती संधी नाकारली. ज्या सहा भागांमध्ये ही दंगल अधिक पेटली, ते सारेच गरीब वा निम्न मध्यमवर्गीयांचे होते. तिथल्या रहिवाशांचं सरासरी नुकसान असेल प्रत्येकी दोन-तीन लाख रुपयांचं. हा आकडा कदाचित मोठा वाटणार नाही, पण त्या गरीब कुटुंबांमध्ये सर्वस्व गमावल्याची हताशा अवघ्या दोन वर्षांपूर्वी, फेब्रुवारीच्या अखेरीस होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in