डेबोरा लेव्ही यांच्या ‘हॉट मिल्क’ कादंबरीला आर्थिक ठळक पाश्र्वभूमी आहे. २००९ पासून ‘युरोपिअन क्रायसिस’ नामे सुरू झालेल्या आर्थिक संकटकाळात घडणारे हे कथानक मात्र मंदीमुळे होरपळणाऱ्या व्यक्तींची फरपट वगैरे दाखविण्याच्या फंदात पडत नाही. येथील प्रत्येक पात्रावर मंदीची सावली असली, तरी मंदीच्या लाटेत बुडून जाण्याइतपत त्यांची मर्यादा नाही. इथली प्रत्येक व्यक्ती त्या लाटेवर तरंगताना दिसते. पण म्हणून जनातली आणि मनातली मंदी थोपविणारी सकारात्मक गोष्ट अशीही रूपरेषा कादंबरीला नाही. ती भलतीच गूढतरल बनून समोर येते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिकन आणि युरोपीय साहित्यामध्ये दीड-दोन दशकांत बदल झाला, त्याला दोनच मोठय़ा घटना जबाबदार ठरल्या. पहिली ‘अ-विस्मरणीय’ दहशतवादी हल्ल्याची आणि दुसरी सर्वच जगाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका देणाऱ्या आर्थिक मंदीची. पैकी अमेरिकी साहित्याचा दोन हजार एकोत्तर आणि पूवरेत्तर असा विभाग गमतीदार गांभीर्याने पाडला जातो, इतके ९/११च्या अतिरेकी हल्ल्याने समाजाला ढवळून काढले. त्यातून सावरताना मंदीचे नवे भूत समोर ठाकले. २००९ सालापासून युरोपात ग्रीस, पोर्तुगाल, आर्यलड आणि स्पेन यांतील कर्जबाजारीपण जागतिक बातम्यांचे विषय ठरले. तर या काळात मंदीत, स्थलांतरात होरपळणाऱ्या माणसांच्या गोष्टी साहित्य, चित्रपटांचे विषय बनणे स्वाभाविक झाले. मंदीला संधी मानून केले गेलेले कथात्म अन् अकथनात्मक साहित्य बेस्ट सेलर याद्यांमध्ये दिसू शकेल, इतकी त्यांची संख्या मोठी आहे. ब्रिटिश लेखिका डेबोरा लेव्ही यांच्या कादंबरीतही युरोपातील आर्थिक संकटकाळ मोठय़ा स्वरूपात आलेला आहे. पण इथे त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीचा ऊरबडवेपणा नावालाही नाही. त्याची झळ उणे अवस्थेतही पात्रांवर नाही. त्यांचे आपले उफराटेच जगणे सुरू आहे.
इथली नायिका आहे सोफिया पापास्टरजायडिस नावाची २५ वर्षांची विदुषी. ही कथानिवेदिका, मानववंशशास्त्राची पदवी घेतल्यानंतरही पीएच.डी. अर्धवट टाकून आपल्या आईच्या आजार निराकरणासाठी स्पेनमधील एका वैराण समुद्रकिनाऱ्यावर येऊन ठाकली आहे. या प्रदेशात समुद्रातील जेलीफिशचे डंख विखारी आहेत आणि सर्वदूर वाळवंट पसरलेले आहे. रोझ या एकेरी नावाने आईला सोफिया हाक मारते. तिला रोगमुक्त करण्यासाठी ब्रिटनमधील घर गहाण ठेवून पैसे उभारण्याच्या प्रक्रियेत सोफिया सक्रियरीत्या सहभागी झालेली आहे. रोझला आपण चालूच शकत नाही, आपल्या पावलांमध्ये त्राणच नाही अशा जाणिवेचा असलेला गूढ आजार आहे. तो दूर करण्यासाठी या समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या घुमटाकार गूढ रुग्णालयातील डॉक्टर गोमेझ नावाच्या अतिगूढ व्यक्तीकडे सोफिया घेऊन येते. रोझवर उपचार सुरू असतानाच्या काळात सोफियाच्या जगणे पकडणाऱ्या नोंदी म्हणजे या कादंबरीच्या कथानकाचा डोलारा.
डेबोरा लेव्ही मूळच्या नाटककार. ‘रॉयल शेक्सपिअर कंपनी’ या ब्रिटनमधील नाटककारांसाठी परमोच्च असलेल्या संस्थेद्वारे त्यांच्या नाटकांचे प्रयोग केले गेले आहेत. पण यासोबत १९८६ सालापासून त्यांच्या कथा-कादंबऱ्याही हारीने प्रसिद्ध झालेल्या आहेत. २०१२ साली त्यांना पहिल्यांदा बुकरच्या लघुयादीत नामांकन मिळाले अन् यंदा त्यांनाच बुकर मिळेल यावर सर्वाधिक सट्टा लागलेला आहे. कादंबरीची वर्गवारी कोणत्याही विषयवर्गात करता येणार नाही अशी विषयविरहित अशी तिची चलाख रचना आहे. जगण्यातील सामान्य क्षणांना साहित्यिक उंची देणारा लेखन वकूब डेबोरा लेव्ही यांच्याकडे आहे. परिणामी लेखन कारागिरीचा धारदार नमुना येथे पाहायला मिळू शकतो.
इथली निवेदिका सोफिया आईच्या आजाराच्या चिंतेमध्ये आहे, मात्र तरीही तिचे जगणे तोशीसरहित किंवा उत्तमरीत्या सुरू आहे. समुद्रकिनारी माशांच्या डंखापासून लोकांना औषध देण्याची नोकरी करणाऱ्या जुआन नावाच्या माणसाची तिची प्रथम ओळख होते. तत्त्वज्ञानाचा पदवीधर विद्यार्थी असून मंदीत आपल्याला कुठली का होईना नोकरी मिळाली आहे, अशा सुखआदर्शात मश्गूल झालेला हा माणूस पुढे सोफियाच्या बऱ्यापैकी जवळ येतो. मात्र त्यांच्यात प्रेमाचा अल्पांशच राहतो. कारण ती खरी प्रेमात पडते इन्ग्रिड नावाच्या आधीच प्रियकर असलेल्या तरुणीच्या. अर्थात त्यात उत्कटता, अधिरता अथवा आक्रमकता नसल्याने ते प्रेमही अपारंपरिक पातळीवरच रेंगाळणारे ठरते. येथे डॉ. गोमेझ नावाचा मांजरप्रिय डॉक्टर रोझच्या गूढ आजाराला संपविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवितो. त्यातील कोणतेही औषध न घ्यायला सांगण्याची आणि तिला चारचाकी गाडी चालवायला देण्याची क्लृप्ती ती आजमावूनही पाहते. या गोमेझची ज्युलिएट नावाची देखणी मुलगी मानसोपचारतज्ज्ञ आहे. ती रोझच्या पूर्वायुष्याच्या अनेक गोष्टी तिच्याशी बोलून काढून घेते. याचा उपचारांवर कोणताही परिणाम होणार नसला, तरी सोफीला तिच्या निवेदनाला आणखी टोक काढण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे. सोफीला अगदी लहान वयात सोडून गेलेल्या वडिलांची तिला माहिती आहे. त्यांनी तिच्या पिढीच्या मुलीशी लग्न केले असून त्यांचे लहानगे मूल म्हणजे आपली सावत्र बहीण असल्याची जाणीव तिला आहे.
कादंबरीला ‘अ’ बिंदूपासून ‘ब’ बिंदूपर्यंत जाणारे एकसलग किंवा आरंभ-मध्य-अंताचा नियम पाळणारे कथानक नाही. यात छोटी छोटी प्रकरणे आहेत. ज्यात व्यक्ती अथवा सोफीची तत्क्षणी असणारी परिस्थिती यांचे आकर्षक शीर्षक आहे. उदाहरणार्थ सोफीला आपली पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी पैशांची नितांत गरज आहे. पण सारे पैसे तिच्या आईच्या रोगनिवारणावर पणाला लागलेले आहेत. रोममध्ये नवी पत्नी आणि छोटुकल्या मुलीसह राहणाऱ्या वडिलांच्या कुटुंबाला ती हेतुपुरस्सर भेट देते. मात्र तेथे कोणत्याही प्रकारची मागणी न करता नुसते काही दिवस वास्तव्य करून परतते. यात प्रत्यक्ष आर्थिक गरज भागविण्याची मागणी न करता सोफियाची पैशांची दिसणारी निकड प्रसंगावर किंवा नात्यांवर किंचितही राग-द्वेषाचा ओरखडा उमटू देत नाही. या एकूणच तणावयुक्त प्रसंगाच्या प्रकरणाला तिने ‘प्लॉट’ हे नाव दिले आहे.
रुपकांची आतषबाजी लेव्ही यांनी येथे करून पाहिली आहे. ‘ब्रिंगिग द सी टू रोझ’, ‘ए केस हिस्टरी’, ‘हंटिंग अॅण्ड गॅदरिंग’, ‘ऑस्टेरिटी अॅण्ड अबडन्स’, ‘नथिंग टु डिक्लेअर’ आदी शीर्षकांची प्रकरणे खूपच सामान्य प्रसंगांना अतिकाव्यात्मक रूप देऊन सादर करतात.
कादंबरीभर जाणवते ते सोफियाचे धीटपण. माणसांना, प्रसंगांना आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना मानववंशशास्त्राचा अभ्यास, त्यातील कूटप्रश्नांचा शोध ती इथे सापडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये घेऊ पाहते. ती आपल्या घराला कडी न लावताच झोपते. समुद्रावर अष्टौप्रहर बेधडक एकटे राहण्यातली हातोटी, इन्ग्रिडसोबतचे पातळी न ठरविलेले मैत्रीयुक्त प्रेम, तिच्या दुखऱ्या इतिहासाशी जोडलेला तिच्यासोबतचा वर्तमान. ‘ईबे’ संकेतस्थळावरून भारतातून शिलाई मशीन घेऊन कलाकुसरीचे शिवणकाम करणाऱ्या इन्ग्रिडसोबत घालविलेले आनंदक्षण हे सोफियाचे इथले संचित आहे. इन्ग्रिडचा वाइनशौकीन प्रियकर मॅट आणि त्याच्यासोबतच्या इन्ग्रिडच्या वैशिष्टय़पूर्ण संभाषणाचाही तरल शब्दप्रयोग कादंबरीमध्ये आणण्यात आलेला आहे. एकापेक्षा एक अचाट उपचार प्रयोग करणाऱ्या डॉ. गोमेझ यांची खासगीतील डॉक्टरकी येथे पाहायला मिळते. रोझवर या उपचार पद्धतीचा परिणाम होतो की नाही, याचे कोडे कायम राहते. मात्र ती उपचार पद्धतीविरोधात दावाच ठोकते आणि त्याची वेगळीच गमतीदार चौकशी समिती गोमेझची उलटतपासणी करण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळते.
कादंबरीचे वैशिष्टय़ हे की फेऱ्यात अडकलेली यातली सगळीच मंडळी दु:खाचे कसलेच अवडंबर न माजवता किंवा त्याचा लवलेशही नसल्यासारखी जगत राहतात. त्यांना दु:ख आहे. पण त्यावर मात करण्याची त्यांची क्षमता आहे की नाही, याला इथे महत्त्व नाही. असलेल्या कोणत्याही दु:खात बुडून जाण्याची शक्यता कोणत्याही व्यक्तीत नाही. अगदी सोफीची रोगग्रस्त आई रोझदेखील याला अपवाद नाही.
या परिपूर्ण कथाहीन कादंबरीला कोणताही संदेश द्यायचा नाही अथवा काही निश्चित संकल्पनांचा प्रसार-प्रचार करायचा नाही. आपल्या भवतालाला अधिकाधिक लखलखीतपणे कलाकृतीतून सादर करण्याची कला डेबोरा लेव्ही यांनी ‘हॉट मिल्क’मधून साधली आहे. जगण्यातल्या प्रत्येक घटकामध्ये आज भयानक वेगाचा झालेला अंतर्भाव. मनाचे आजार, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नात्यांचे बदललेले संदर्भ, त्याच जगामध्ये असलेली नात्यांची अपरिहार्यता. त्यांच्यात झालेले जटिलोत्तम बदल, या साऱ्यांचा सूक्ष्मदर्शी अभ्यास मानववंशशास्त्राच्या निवेदिकेच्या मुखातून आलेला आहे. समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, वाळवंट, मंदीचा एकूणच अप्रत्यक्ष परिणाम, तिथल्या व्यवसायांमध्ये झालेले बदल, डॉ. गोमेझ यांच्या गूढ दवाखान्याची रचना, तिची सुंदर आणि तितकीच व्यवहारी मुलगी ज्युलिएट, माणसांच्या नावांच्या उच्चारांमधील विचित्र प्रकार आणि कादंबरीच्या नावाभोवती असलेले गूढ रुपक यांचा शोध संपणारा अजिबात नाही. दीर्घ कथन साहित्य वाचनाची गोडी असल्यास हा सारा शोध वाचनसुकर ठरणारा आणि शब्दांच्या अरण्यात तरंगत ठेवणारा आहे.
आजच्या कादंबरीच्या रूपबंधाची एक झलक हा आणखी एक या कादंबरीचा अभ्यासविषय ठरू शकेल.
बुकरसाठीच्या सट्टेबाजारात सर्वाधिक बोली लागलेल्या कादंबरीला पारितोषिक मिळण्याचा इतिहास नाही. डेबोरा लेव्ही यांची कादंबरी तो बदलेल का, हे या महिन्यात उमजेल.
- ‘हॉट मिल्क’, लेखिका : डेबोरा लेव्ही,
- प्रकाशक : पेंग्विन रँडम हाउस,
- पृष्ठे : २१८, किंमत : ६९९ रु.
– पंकज भोसले
pankaj.bhosale@expressindia.com