महाकाय यंत्रवाहन बनवणाऱ्या ‘जेसीबी’ कंपनीने ‘जेसीबी लिटरेचर फाऊंडेशन’ स्थापून यंदापासून वार्षिक ग्रंथपुरस्काराची सुरुवात केली असून मल्याळम् लेखक बेन्यामिन हे त्याचे पहिले मानकरी ठरले आहेत. त्यासाठी बेन्यामिन यांच्या ‘जस्मिन डेज्’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

भारतीय नागरिक असलेल्याच लेखकांच्या मूळ इंग्रजी (अथवा भारतीय भाषांतून इंग्रजीत अनुवादित) ललित साहित्यकृतींसाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी पहिल्या संभाव्य दहा पुस्तकांच्या दीर्घयादीनंतर ३ ऑक्टोबरला पाच पुस्तकांची लघुयादी जाहीर झाली होती. त्यात बेन्यामिन यांच्या कादंबरीसह अमिताभ बागची (‘हाफ द नाइट इज गॉन’), अनुराधा रॉय (‘ऑल द लाइव्ह्ज वी नेव्हर लिव्हड्’), शुभांगी स्वरूप (‘लॅटिटय़ूड्स ऑफ लाँगिंग’) आणि तमिळ लेखक पेरुमल मुरुगन (‘पूनाचि’) यांच्या कादंबऱ्यांचाही समावेश होता. मात्र, शहनाझ हबीब यांनी मल्याळम्मधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या बेन्यामिन यांच्या ‘जस्मिन डेज्’ या कादंबरीची निवड या पहिल्यावहिल्या ‘जेसीबी भारतीय साहित्य पारितोषिका’साठी करण्यात आली आहे. मूळ लेखकाला २५ लाख आणि अनुवादकाला पाच लाख रुपये इतकी घसघशीत रक्कम मिळवून देणाऱ्या या पुरस्काराच्या निवड समितीत यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका दीपा मेहता, उद्योजक रोहन मूर्ती, लेखिका प्रियंवदा नटराजन  आणि कादंबरीकार विवेक शानभाग यांचा समावेश होता.

Sachin Tendulkar CK Naydu Lifetime Achievement Award by BCCI in Naman Awards 2023 24
BCCI Naman Awards: सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार! BCCI ने केला खास सन्मान; पाहा ऐतिहासिक क्षणाचा VIDEO
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
BCCI Awards 2024 Jasprit Bumrah Won Polly Umrigar Award for being the Best International Cricketer
BCCI Awards: जसप्रीत बुमराह ठरला BCCI च्या सर्वाेत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी, जाणून घ्या बक्षिसाची रक्कम
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
Sachin Tendulkar likely to get BCCI CK Nayudu Lifetime Achievement Award
Sachin Tendulkar : BCCI ने घेतला मोठा निर्णय! सचिन तेंडुलकरला आयुष्यात पहिल्यांदाच मिळणार ‘हा’ खास पुरस्कार
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…
Success Story Of Satvat Jagwani In Marathi
Success Story : दोन वर्षात सोडली आयआयटी, उघडलं स्वतःच युट्युब चॅनेल; वाचा टॉपर सत्वत जगवानीची गोष्ट

केरळमध्ये जन्मलेले बेन्यामिन २०१३ पासून कायमचे केरळवासी झाले असले, तरी त्याआधीची दोन दशके ते मध्यपूर्वेतल्या बहरीनमध्ये वास्तव्यास होते. मध्यपूर्वेतील नव्वदनंतरची राजकीय-सामाजिक घुसळण आणि २०११ ची ‘अरब स्प्रिंग’ची धामधूम त्यांनी अनुभवली. या वास्तव्याचा प्रभाव बेन्यामिन यांच्या लेखनावर आहे. दशकभरापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची ‘गोट डेज्’ ही कादंबरी सौदीतील भारतीय कामगाराचे अनुभवविश्व मांडते. तर ‘जस्मिन डेज्’ या कादंबरीतही मध्यपूर्वेतल्या २०११ च्या क्रांतिज्वरात समरसून गेलेल्या समीरा परवीन या मूळ पाकिस्तानी असलेल्या मुलीची कथा सांगितली आहे.

Story img Loader