स्लावोय झिझेक या तत्त्वचिंतकाबद्दल आजच लिहिण्याची कारणं तीन आहेत. त्यापैकी दोन प्रमुख- तर एक अगदीच साधं. करोनाबद्दल झिझेक जे बोलतो/ लिहितो आहे, ते महत्त्वाचं आहे- कारण तो प्रामुख्यानं युरोपबद्दल बोलत असला तरी त्याचं म्हणणं जगभरच्या अनेकांना आपापल्या संदर्भात विचार करण्याची दिशा देणारं आहे (तशी दिशा देणं हे तत्त्वचिंतकाचं कामच असलं पाहिजे, ते झिझेक करतोय). पण झिझेकनं करोना-निमित्तानं केलेलं चिंतन काय, हे पाहण्याआधी ‘कोण झिझेक?’ या प्रश्नाचं उत्तर ज्यातून सापडू शकेल असं पहिलं प्रमुख कारण म्हणजे, झिझेकनं इंग्रजीत लिहिलेलं ४६वं पुस्तक येत्या २० एप्रिल रोजी येतं आहे. हेगेल, मार्क्स, लाकां (लाकान) या तत्त्वज्ञांचा आधार घेऊन आणि कित्येक समकालीन तत्त्वचिंतकांचे संदर्भ देत झिझेक आजच्या काळाबद्दल चिंतन करतो; पण ते अशा प्रकारे की, तुम्हाला जरी हेगेलच माहीत नसला तरी काही बिघडणार नाही! झिझेक जे म्हणतोय त्यातलं आज वैचारिकदृष्टय़ा उपयुक्त काय, हे समजेल! म्हणून इंग्रजीत लिहिलेली ४५ पुस्तकं, शिवाय २६ पुस्तकांमध्ये लेखकीय सहभाग किंवा संपादन, तर मूळचा स्लोव्हेनियन असल्यामुळे त्या मातृभाषेत लिहिलेली आणखी २७ पुस्तकं, अशी झिझेकची ग्रंथसंपदा आहे. नव्या पुस्तकाचं नाव आहे – ‘अ लेफ्ट दॅट डेअर्स टु स्पीक इट्स नेम’. ३४ प्रासंगिक लेखांचा हा संग्रह असला, तरी भ्रष्टाचाराच्याही गंभीर आरोपांनासुद्धा गुंडाळून ठेवणारे ‘सत्त्योत्तरी’ काळातले लोकशाही मुखवटय़ाचे हुकूमशहा (ट्रम्प त्यापैकी एक) हे न्यायालयीन खटला वा महाभियोग अशा जुन्या उपायांना धूपच घालणार नाहीत, त्याऐवजी या उजव्यांना डावं उत्तरच दिलं पाहिजे, अशी मांडणी त्या पुस्तकात आहे. म्हणजे झिझेक हे बर्नी सॅण्डर्सचे समर्थक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा