मीना वैशंपायन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेदरलॅण्ड्समधील ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कादंबरी, तिची नायिका यास हिचे भावविश्व उत्कटतेने, तर कधी कडवट विनोदातून मांडते..
‘‘प्रश्न विचारण्याची नाही तुम्हाला परवानगी,
पण वेळोवेळी खूप उत्तरं शोधता येतील,’’ असं म्हणत असे आई; पण त्या वेळी आम्ही असू जेमतेम तीन फुटी!
तिनं शिकवलं होतं, ‘मृत्यूला असतो प्रतिध्वनी, जो तुमच्या कानात खोलवर गुंजत असतो.’
माझे थंडगार हात कोटाच्या खिशात घालायचेच मी विसरले तेव्हा, मुठी वळून नव्हे, सरळच. दोन स्टारफिश असावेत तसे माझे घामट पंजे मी माझ्या भावाच्या शवपेटीच्या काचेवर ठेवले आणि आमच्या डोक्यावरून जणू काही समुद्रच वाहू लागला जणू कुणी तरी पायांखालची जमीन सरकवूनच दिली, ती परत जागेवर आलीच नाही आजोबांनी माझ्या भीतीची छोटी कबुतरं केली..
मी त्या छोटय़ा कबुतरांना कसं सांभाळू?
त्यांना कुरवाळू? की आठवडय़ातून एकदा त्यांना शेतावर सोडू?
पण रात्री ती आपल्या चोची खिडकीवर आपटतात, मग आजोबा घाबरतात,
आपल्या नातवंडांनी सतत गाळलेल्या अश्रूंचा सागर पाहून,
नळ फुटला असं समजून आजोबा प्लंबरला बोलावतात..’
(मरिक रिज्नेवेल्दच्या कवितेचे मुक्त रूपांतर)
लहानपणी वाटय़ाला आलेल्या दु:खाच्या अनुभवांचा अर्थ लावू पाहणारी, दु:ख म्हणजे काय हे समजून घेणं म्हणजेच जग समजून घेणं असं मानणारी, त्यासाठी शब्दांचं माध्यम निवडणारी डच लेखिका मरिक ल्युकास रिज्नेवेल्द (किंवा ‘राइन्वेल्द’)! या लेखिकेला ‘इंटरनॅशनल बुकर’ पुरस्कार (२०२०) मिळाल्याच्या बातमीने अनेकांमध्ये अनेक कारणांनी उत्सुकता वाढली. एक तर हा पुरस्कार मिळालेली ती पहिली डच लेखक आहे. दुसरे म्हणजे, आजवरच्या सर्व पुरस्कारविजेत्यांमध्ये ती सर्वात लहान, केवळ २९ वर्षांची आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ‘द डिसकम्फर्ट ऑफ इव्हिनिंग’ ही पुरस्कारप्राप्त कादंबरी तिची पहिलीच कादंबरी आहे. याआधी नेदरलॅण्ड्समध्ये ती उदयोन्मुख व लक्षवेधी कवयित्री म्हणून चर्चेत होती. तिच्या दोन प्रकाशित कवितासंग्रहांना पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे साहजिकच तिच्याबद्दल वाढते कुतूहल होते. या पुरस्काराने तिला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली.
एक योगायोग सहजच लक्षात येतो. ‘शगी बेन’ हे डग्लस स्टुअर्ट यांचे २०२० चे ‘बुकर’ पारितोषिकप्राप्त पुस्तक आणि ‘इंटरनॅशनल बुकर’ पुरस्कारप्राप्त ‘द डिसकम्फर्ट ऑफ इव्हिनिंग’ – दोन्ही पुस्तके लेखकांच्या बालपणीच्या अनुभवांवर आधारित आहेत. मरिकच्या बालपणीच्या मनोविश्वावर खोलवर परिणाम करणाऱ्या अनुभवावर आधारित ही कादंबरी आहे. तिनेही आत्मचरित्राऐवजी कादंबरीचा रूपबंध निवडला आहे. पण हे साम्य इथेच संपते.
युरोपमधील नेदरलॅण्ड्स हा चिमुकला देश. फळे, फुले आणि चीज वगैरेसारखे पदार्थ यासाठी प्रसिद्ध. या देशातील ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कादंबरी एका १०-१२ वर्षांच्या लहान मुलीच्या- यास (खं२) च्या- दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. काळ २००० सालच्या आसपासचा. म्हणजे समकालीनच. कादंबरीची नायिका व लेखिका स्वत: या दोन्ही व्यक्तित्वांचे मिश्रण, सत्य व कल्पित यांची सरमिसळ वाचताना प्रत्ययास येते. लेखिका स्वत:ला विसरून लिहू शकत नाही. आपल्यालाही तिचे व्यक्तित्व विसरता येत नाही. मरिक म्हणते, ‘‘मी लिहायला लागले की, माझी ‘तीच’ गोष्ट माझ्यासमोर येते. त्यातून माझी सुटका नाही. त्याविषयी लिहून झाल्याशिवाय मला इतर काही लिहिणं शक्यच नाही.’’ तिच्या कवितांप्रमाणे कादंबरीची नाळही, अगदी आतून आल्यासारख्या अनुभवांशी संलग्न आहे.
मरिक ही आगळीवेगळीच आहे. स्वत:ला शारीरिकदृष्टय़ाही ती वेगळी मानते. कधी मुलासारखी, तर कधी मुलीसारखी वागते; तसेच कपडे, वागणे असते. स्वत:बद्दल बोलताना ‘ते’, ‘त्यांना’ अशी तृतीयपुरुषी अनेकवचनी सर्वनामे वापरते. आपल्यामधील पुरुष व स्त्री या दोघांना अवकाश मिळावा असा तिचा प्रयत्न असतो. लेखन करताना ती आपल्यातील वेगळेपण सांभाळते. तिचे मधले नाव ल्युकास हे तिने आपल्यातील मुलासाठी घेतलेले नाव आहे. ‘हॅरी पॉटर’ मालिकेतील पुस्तकांनी प्रभावित होऊन लेखनाला आरंभ करणारी ही लेखिका.
कादंबरीची नायिका यास ही डेअरीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलगी. घरात मोठय़ा संख्येने असणारे गोधन आणि दूध विकणे, चीज वगैरे तयार करण्याचा उद्योग. चार भावंडे आणि आईवडील. धर्मपरायण-रिफॉर्मिस्ट कुटुंब. शिवाय गावातले कट्टर धार्मिक वातावरण. कष्टपूर्ण पण साधे, सरळ आयुष्य. घरात धार्मिक वातावरणामुळे सतत बायबलमधील गोष्टी सांगितल्या जातात. गावातले धर्मोपदेशक व त्यांचा उपदेश यानुसार घरातील मुलांची वर्तणूक व्हावी अशी अपेक्षा. वडिलांची चर्चची फेरी कधीच चुकत नाही. एकीकडे आधुनिक जगाचे सारे संदर्भ येतात आणि त्याच वेळी सगळे गावच या धर्मशिस्तीत अडकलेले असते, नकळत सारखे भ्यायलेले असते.
यास दहाएक वर्षांची असताना तिचा मोठा भाऊ- मथीयस- ख्रिसमसच्या आदल्या दिवशी बर्फावरील स्केटिंगच्या स्पर्धेत भाग घेतो. तिथे त्याचा अपघात होऊन तो मृत्यू पावतो. हाडे गोठवणारी थंडी आणि ख्रिसमसचा सण. त्याच्या अपघाती मृत्यूचा फार मोठा आघात पचवणे त्या कुटुंबाला कठीण होते. तिच्यासकट तिचा आणखी एक भाऊ, बहीण आणि तिचे आईवडील हे सारेच आपापल्या पद्धतीने या आघातास सामोरे जातात. एकीकडे हे संकट आणि त्या मुलांची वाढती वये, त्या वयांतले विविध प्रश्न. अशा स्थितीत तिच्या मनात विचित्र, भासात्मक वाटाव्यात अशा किती तरी गोष्टी घडत असतात. त्यातच त्यांच्या गावात गाईंना ‘लाळ्या-खरकत’ रोगाचा संसर्ग होतो (तोंड व पाय यांना संसर्ग झाल्याने होणारा रोग). मोठय़ा दु:खाने आईवडिलांना आपले गोधन सोडावे लागते.
सामान्य ग्रामीण लोकांमध्ये असणारी देवाबद्दलची, मृत्यूबद्दलची भीती, आयुष्याच्या शेवटच्या दिवशी होणारा पापपुण्याचा निवाडा व त्यासाठी करावयाची कर्मकांडे यांचा पगडा येथे कायम जाणवतो. देव दयाळू आहे का, हा तिचा नेहमीचा प्रश्न. ती म्हणते, ‘देव कसला दयाळू? कायम भीती घालणारा, क्रूर देव! तो जसं देऊ शकतो, तसं घेऊही शकतोच. त्याने अचानक माझ्या भावाला नाही का हिरावून घेतलं? आमच्या गाई का गेल्या? मी देवाचा क्रूरपणा बरोबर घेऊनच मोठी झाले की!’
एवढय़ाशा वयात चमत्कारिक प्रश्न तिच्या मनाचा ताबा घेतात. तिची आई खाण्याचे पदार्थ तळघरात नेताना पाहून तिला कुतूहल वाटते, पण तिथे जाण्याची मनाई. मग शाळेत ऐकलेली अॅन फ्रॅन्क आठवते. आपल्या आईने तळघरात ज्यूंना लपवलेय ही समजूत शेवटपर्यंत राहते.
वयानुसार लैंगिकतेबद्दलचे कुतूहल, ते शमवण्यासाठी केलेल्या कृती यात वर्णिल्या आहेत. कधी तरी तर अगदी ओंगळवाण्या कृतींचेदेखील वर्णन येते. आपल्या डेअरीत सांभाळलेल्या, वावरणाऱ्या प्राण्यांचे ती आणि तिचा भाऊ बळी देतात. त्यासाठी त्यांची निर्घृणपणे हत्या करतात. तेही आवश्यक आहे असे यासला वाटते. यातूनच तरुणांना जीवनाबद्दलचे आकलन होते, असा तिचा विश्वास आहे. वाचकाला मात्र, हे कादंबरीसाठी आवश्यक आहे का, असे वाटू शकते.
यासला व काही प्रमाणात तिच्या भावंडांनाही अनेकदा समाजात निषिद्ध असणाऱ्या गोष्टी करायची इच्छा असते. तिला शाळा किंवा अभ्यास यांत रुची नाही. गणितातील साधी उदाहरणे तिला सोडवता येत नाहीत. ती उदाहरणे खाण्याच्या पदार्थासंबंधीच का असतात (म्हणजे इतकी सफरचंदे किंवा चीजचे तुकडे, मटणाचे तुकडे वगैरे), असे प्रश्न तिला पडतात. घडय़ाळ समजून घ्यायला तिला एक महिना लागला, कारण घडय़ाळाचे काटे पाहून तिला सतत जमिनीवर फिरणारी गांडुळे आठवत. आई म्हणत असे त्या गाण्यातली मुलगी आठवडाभर शाळेत जाताना आजारी पडे, फक्त रविवारी ती फिरायला येई. मग खेळाचा तास आला की, तिचेही आपल्यासारखे पोट दुखते का? तिच्यावरही कुणी तरी जबरदस्ती केली असेल, जशी आपल्यावर झाली? तीही भिते का? किंवा दरवर्षी देवाचा मृत्यू कसा होतो? पुन्हा तो दरवर्षी कसा जन्माला येतो? मग आपला मथीयस परत येईल? असेही प्रश्न तिला पडत असतात. त्यातून जाणवणारे तिचे निरागस मन चटका लावते.
दुसरीकडे, तिचे मन सारखे ज्या वेगवेगळ्या कल्पना करण्यात गुंतलेले असते, त्या चमत्कृतिपूर्ण, विक्षिप्त, विचित्र असतात. त्यांचा संबंध परिचित अशा आनंदाशी क्वचितच असतो. त्यांचा मळा, तेथील प्राणी, गाई, कीटक, कुत्री, ससे, बेडकासारखे असणारे टोड प्राणी, वासरे आणि संबंधित दैनंदिन क्रिया यांची खूप मोठय़ा प्रमाणावर वर्णने येतात. तिच्या बहुतेक प्रतिमा त्यामुळे नावीन्यपूर्ण वाटतात. आजवर वाचकांना काहीसे अपरिचित असे नेदरलॅण्ड्सच्या ग्रामीण व धार्मिक जीवनाचे एक दुर्मीळ चित्र ती उभे करते हे लक्षणीय.
एखाद्या घरातला कुणी मृत्यू पावला तर त्याची उणीव भरून काढण्यासाठी इतर माणसे एकमेकांच्या अधिक जवळ येतात, तर कधी साऱ्या कुटुंबाची फाटाफूट होते, सगळे एकमेकांपासून विखुरले जातात. यासचे कुटुंब असे विखुरले जाते. आपल्या भावाचा मृत्यू होण्यास आपण कारणीभूत आहोत असेही मधेच तिला वाटते, कारण तो जायला निघाल्यावर ती त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरते, तो नेत नाही म्हणून रागावून त्याच्याविषयी वाईट विचार करते. त्यामुळेच तो आपल्याला कायमचा सोडून गेला असा एक अपराधगंडही तिच्यात डोकावत असतो. मात्र, कादंबरीचा शेवट अगदीच अनपेक्षित होतो.
कवितांमधून कधी अतिशय उत्कटतेने व्यक्त होणारी कोमल, हळुवार मरिक कधी एकदम कडवट विनोदाचा आश्रय घेते- विशेषत: धर्माबाबत बोलताना! या कादंबरीत अतिवास्तववादाचे काहीसे रूप जाणवते, तसेच जादूई वास्तववादाचीही उदाहरणे दिसतात. पण या साऱ्यात अधिक लक्षात येते ती तिची शैली, अगदी नेमकी वर्णने. मथीयसची आठवण घरात कशी उरलीय?- तर तुकडय़ातुकडय़ांत. जेवायच्या टेबलावरील त्याची रिकामी जागा, त्याची खुर्ची! त्याच्या गादीवर त्याच्या वजनाने झालेला खोलगट भाग किंवा त्याला बर्फातून काढल्यावर डॉक्टरने आणून दिलेले रक्ताचे वाळलेले थेंब असणारे त्याचे तीन दात. मरिकने उपमा फारच अचूक दिल्या आहेत. तिची एखादा चलत् चित्रपट पाहावा तशी चित्रमय शैली.. सगळे साक्षात समोर उभे करणारी! वडील धूम्रपान करीत असताना ती त्यांच्याजवळ उभी राहून तो धूर छातीत भरून घेते, कारण यामुळे आपण वडिलांच्या दु:खाचा भार घेतोय असे तिला वाटते.. अशी अनेक उदाहरणे सर्वत्र सापडतात.
काही वर्णने वाचताना नकोशी, ओंगळवाणी वाटली तरीही ही कादंबरी आपल्यातील निरागस मुलगी आणि तिचे भावविश्व यांबाबत सच्ची वाटते. तिची प्रतिमासृष्टी आणि शैली विलक्षण आकर्षक, नवीन आहे. वाचकाला बरोबर घेऊन जाणारी यास मनात रेंगाळते. छोटय़ाशा यासला अस्वस्थ करणारी कातरवेळ आपल्याही मनाला हुरहुर लावते.
meenaulhas@gmail.com