अगदी दहाच वर्षांपूर्वीची गोष्ट… लातूरमधल्या काही गावांमध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या चावडीसमोरून जाताना महिलांना चपला न घालता, मान खाली घालून आणि डोक्यावर पदर घेऊन जावे लागत असे. पण आज याच गावात महिला सरपंचांना सन्मानाने खुर्चीवर बसवले जाते आणि त्यांच्या हस्ते झेंडावंदनदेखिल व्हायला लागले आहे.
—–
बोरी नावाच्या छोट्याशा गावात समीना पठाण सारखी मुस्लिम महिला गावातली दारुची दुकाने बंद करण्यात पुढाकार घेते, महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणारे भाषण व्यासपिठावरून करते आणि बचतगटाच्या माध्यमातून तिने केलेल्या कामाबद्दल ‘अफार्म’ संस्थेकडून तिचा गौरव झालेला आहे.
—–
दहा-बारा वर्षांपूर्वी महिलांच्या बचतगटांना खेडेगावांतून खूप विरोध होत असे – त्यांना लपून-छपून गुपचूप बैठकींना यावे लागत असे! पण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून जेव्हा हळूहळू स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली तेव्हा मात्र घरातली पुरुषमंडळी त्यांना बचतगटाच्या बैठकांना जायला प्रोत्साहन देऊ लागली आहेत. बोरी गावात तर मुस्लिम महिलांचा स्वत:चा ’हाजी मक्काई महिला बचतगट’ आहे! – अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या निवासी प्रशिक्षण शिबिरांनाही महिला येऊ लागल्या आहेत !
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा