बाजारपेठेने आपले जीवन कसे व्यापले आहे हे दाखवण्याचे सॅन्डल यांचे उद्दिष्ट आहेच, पण मार्केट ज्यामुळे चालते त्या ‘मार्केट रीजिनग’ने रोजच्या जीवनात कसा प्रवेश केला आहे हे दाखवणे आणि त्यामागील प्रश्नांची चर्चा करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पशाने विकत न घेता येण्याजोग्या गोष्टींबद्दल सांगताना ते पशाने आजकाल काय काय विकत घेता येते याची यादीच देतात. सॅन्डल जी उदाहरणे देतात आणि ज्या तपशिलात जातात ते सारे थक्क करणारे आहे. हे सांगतानाच सॅन्डल आपल्या सार्वजनिक चर्चाच्या पोकळपणाचे मूळ बाजारू विचारसरणी सर्वव्यापी होण्यात आहे, असाही निष्कर्ष नोंदवतात.
जयपूर फेस्टिवलमध्ये सातशे-आठशे जणांच्या समोर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपला विचार मांडणाऱ्या पब्लिक फिलॉसॉफरचे नाव होते – मायकेल सॅन्डल आणि विषय होता – पशाने विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी अर्थात बाजारपेठेच्या नतिक मर्यादा. एक तासाच्या या मांडणीत अगदी कॉलेज विद्यार्थ्यांपासून कवी, लेखकांपर्यंत इतक्या मोठय़ा गर्दीला त्यांनी सामावून घेतले. (एका मित्राच्या शब्दांत सांगायचे तर ‘गाडगेबाबा शैली’त.) सॅन्डल हे हार्वर्ड विद्यापीठात नीतिशास्त्र, अर्थशास्त्र आणि कायदा हे विषय शिकवतात.
अर्थात बाजारपेठेने आपले जीवन कसे व्यापले आहे हे दाखवण्याचे सॅन्डल यांचे उद्दिष्ट आहेच, पण बाजारपेठ ज्यामुळे चालते त्या ‘मार्केट रीजिनग’ने रोजच्या जीवनात कसा प्रवेश केला आहे हे दाखवणे आणि त्यामागील प्रश्नांची चर्चा करणे हे त्यांच्या ‘व्हॉट मनी कान्ट बाय – द मॉरल लिमिट्स ऑफ मार्केट्स’ या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पशाने विकत न घेता येण्याजोग्या गोष्टींबद्दल सांगताना ते पशाने आजकाल काय काय विकत घेता येते याची यादीच देतात-
* अडीचशे डॉलर महिना ते दिवसाला हजार डॉलर या मानधनात अफगाणिस्तान, सोमालियात भाडोत्री सनिक म्हणून लढता येते.
* ८२ डॉलर रोज रात्री दिल्यास अमेरिकेत इतर कैद्यांपासून दूर अशा स्वस्थ ठिकाणी तुरुंगात राहता येते. ६२५० हजार डॉलरमध्ये भारतीय स्त्रीचे गर्भाशय बाळंतपणासाठी भाडय़ाने मिळते. (अमेरिकेत यापेक्षा तिप्पट पसे द्यावे लागतात.)
* १३ युरोमध्ये एक मेट्रिक टन कार्बन वातावरणात सोडण्याची परवानगी मिळते.
*ज्या औषधाचे परिणाम माहीत नाहीत अशा औषधांचा प्रयोग करून घेण्यासाठी औषध कंपन्या मानवी गिनिपिगला साडेसात हजार डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त पसे देतात.
विमान कंपन्या थोडे अधिक पसे दिल्यावर रांग तोडू देतात, इथपासून ते स्टेडियममध्ये विशिष्ट बॉक्सेस तयार करून त्याची विक्री (उदाहरणार्थ, १६ जणांच्या तिकिटासाठी ८५,००० डॉलर देणं.), यांसारख्या गोष्टींमुळे एक विषमता तयार होते. ज्यांच्याकडे पसे आहेत ती मंडळी अधिक सोयीच्या गोष्टी विकत घेऊ शकतात.
अनेकपदरी अमेरिकन रस्त्यांवर फास्ट लेनमध्ये गाडीत दोन-तीन माणसे असल्यावरच जाता येते. आता ठरावीक रक्कम दिल्यावर जाता येते. या प्रकारे जवळजवळ सर्वच ठिकाणी नेहमीचे नियम डावलून पसे असणारी माणसे काही तरी अधिक मिळवतात. काही वेळा यातील स्वार्थ व्यक्तिगत नसतो, पण त्यामागची नतिकता विचार करण्याजोगी असते. व्यसनाधीन स्त्रियांनी मूल होऊ न दिल्यास त्यांना ३०० डॉलर द्यायचे असे नॉर्थ कॅरोलीनामधील प्रोजेक्ट प्रिव्हेन्शन या संस्थेच्या बार्बरा हॅरिस यांनी ठरवले तेव्हा त्यावर बरीच चर्चा झाली. गरीब स्त्रियाच याचे लक्ष्य होत्या. शिवाय त्या पुन्हा मिळणारा पसा व्यसनासाठी वापरतील अशी शक्यता होती. त्यामुळे व्यसनी मुले जन्माला येणे टळणार होते. हॅरिस यांनी स्वत: अशी चार मुले दत्तक घेतली होती. सरकार अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये ‘मार्केट रीजनिंग’चे कारण पुढे करत हस्तक्षेप करत नाही. हॅरिस यांच्या या निर्णयात स्वार्थापेक्षा कळकळ होती. जबरदस्ती नव्हती. मग टीका कशाला? टीकाकार सांगतात, व्यसनाधीन स्त्री पशाच्या विवंचनेत असते. ती अशा परिस्थितीत विवेकीपणाने निर्णय घेऊ शकत नाही.
सॅन्डल लिहितात, यात दोन्ही पक्षांना फायदाच आहे आणि सामाजिकदृष्टय़ा हे लाभाचे आहे. त्यामुळे ही देवाणघेवाण अर्थशास्त्रीयदृष्टय़ा परिणामकारक आहे. तरीही हे उदाहरण ‘मार्केट रीजनिंग’च्या मर्यादा स्पष्ट करते. काहींना ही लाच वाटू शकते, पण नतिक प्रश्न असा की, त्या बाईवर कोणी हे जबरदस्तीने करत नसले तरी पशाची लालूच तिला दाखवली जाते. ती टाळणे अशक्य आहे. त्यामुळेही ऑफर स्वीकारण्यात तिच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. अशा अनेक प्रकारच्या व्यवहारांत आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होतो.
हे पुस्तक अशा अनेक उदाहरणांनी भरलेले आहे. सॅन्डल एक विचार पुन्हा पुन्हा प्रबळपणे मांडतात. एक म्हणजे समानता आणि दुसरा भ्रष्टाचार. एखाद्या व्यवहारात दोन्ही पक्षांना किती समान संधी आहे आणि एक पक्ष दुसऱ्या पक्षाला भ्रष्ट तर करू पाहत नाही ना या दोन गोष्टींचा विचार. स्वित्र्झलडमध्ये १९९३ मध्ये सरकारने वोल्फेनशिसेन या २१०० लोकवस्तीच्या गावात आण्विक कचरा टाकायचे ठरवले. तेव्हा त्यांनी तिथल्या रहिवाशांचे मतदान घेतले. ५१ टक्के लोकांनी कचरा तिथे टाकण्याच्या बाजूने मत दिले. नंतर त्यांना प्रत्येक रहिवाशामागे वर्षांला साडेसात हजार डॉलर दिले तर, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ५१ पकी २५ टक्के लोकांनी होकार दिला. खरं तर जगभर जिथे जिथे आधी पशाची लालूच दाखवली जाते, तिथे तिथे अधिक लोकांचे मन वळते असा अनुभव आहे. इथे मात्र सरकार पसे देते म्हटल्यावर कमी जणांनी होकार दिला. असे का? कदाचित पसे देत आहेत म्हणजे धोका जास्त असावा, असे त्यांना वाटले असेल का? पण त्यातील धोका त्यांना अगोदरच सांगण्यात आला होता. मग टक्केवारी घसरण्याचे कारण काय, तर नागरिकांना लाच नको होती! आधी ते तयार झाले ते नागरिक म्हणून घ्यायच्या जबाबदारीतून.
या पुस्तकातील प्रतिपादनाचा आकार तसा सीमित असला तरी सॅन्डल जी उदाहरणे देतात आणि ज्या तपशिलात जातात ते सारे थक्क करणारे आहे. काही वेळा तर अॅब्सर्ड वाटेल असे. दक्षिण आफ्रिकेतील गेंडय़ांची संख्या पंचवीस हजारावरून अडीचशेवर आली, तेव्हा तेथील सरकारने ठरवले की, जे दीड लाख डॉलर देतील त्यांना गेंडा मारायची परवानगी द्यायची. यामुळे मोठी कुरणं बाळगणारे गेंडय़ांच्या सुरक्षिततेसाठी मदत करू लागले आणि त्यामुळे गेंडय़ांची संख्या वाढली. शाळांमध्ये मुलांना पुस्तक वाचनासाठी आणि चांगल्या मार्कासाठी पसे द्यायच्या प्रयोगामुळे गरीब वस्तीतील मुलांची एकूण कामगिरी सुधारली, यात आपल्याला काही आश्चर्य वाटत नाही, पण एकेकाळी इंग्लंडमध्ये माणसे कधी मरतील यावर बेटिंग व्हायचे. त्यामुळे जगण्या-मरण्याचा बाजारपेठेशी असणारा संबंध उलगडताना सॅन्डल विमा क्षेत्राचा इतिहासच उलगडतात. एड्ससारखा जीवघेणा आजार झालेल्या आणि अल्पकालाचे सोबती असलेल्या पेशंटसाठी व्हीअॅटिकल विम्याचा मोठा उद्योगच अस्तित्वात आला. त्यासंबंधीची माहिती इतरांच्या मृत्यूवर माणसे कशी जगू शकतात हे सांगते. इतकेच नव्हे, तर १९९५च्या सुमारास जेव्हा लाखो पेशंटचे जीव वाचतील अशी औषधे शोधण्यात आली तेव्हा या कंपन्या अक्षरश: बुडायला लागल्या. कारण त्या ज्यांच्या मरणाची निश्चिती झाली आहे अशांचा विमा विकत घेऊन त्यांना मरेपर्यंत चांगले पसे देत. एवढेच नव्हे तर अनेक कंपन्या आपल्या कामगारांचा त्यांना न सांगता विमा काढत. त्या कामगाराने नोकरी सोडली तरी त्याच्या मृत्यूनंतर कंपनीला पसे मिळत.
बेटिंग करणाऱ्यांकडे चांगली माहिती गोळा होते म्हणून अमेरिकेच्या संरक्षण खात्याने अतिरेकी कोणाला मारतील? नॉर्थ कोरिया बॉम्ब बनवेल का? अशा प्रश्नांवरच्या बेटिंगला उत्तेजन द्यायचे ठरवले, पण टीकेनंतर माघार घेतली. अशा ‘काफ्काएस्क’ (काफ्काच्या विचारावरून वापरात आणलेल्या) गोष्टी या पुस्तकात आहेतच.
पण सरतेशेवटी मत्री, प्रेम यांसारख्या चांगल्या गोष्टी विकत घेत येत नाहीत. काही गोष्टींना ठरावीक मूल्य विशिष्ट काळ आणि परिस्थितीमुळे प्राप्त होते. बाजारू विचारसरणी कितीही पसरली तरी ती त्याला आडकाठी करू शकत नाही, हे सांगतानाच सेन्डल आपल्या सार्वजनिक चर्चाच्या पोकळपणाचे मूळ बाजारू विचारसरणी सर्वव्यापी होण्यात आहे, असाही निष्कर्ष नोंदवतात.
हे पुस्तक अगदी शेवटच्या आभारप्रदर्शक नोंदीपर्यंत वाचनीय आहे. ज्यात ते म्हणतात, यातील अनेक मुद्दे मी हार्वर्डच्या कोस्रेसमध्ये चíचले आणि माझ्या काही विलक्षण बुद्धिमान विद्यार्थ्यांनी मला त्याबाबत अधिक सज्ञान केले.
‘स्टार फिलॉसॉफर’, ‘जगातील सर्वाधिक महत्त्वाचा तत्त्वज्ञ’, ‘इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट संवादक’ ही विशेषणे मायकेल सॅन्डल यांना महत्त्वाच्या पाश्चात्त्य इंग्रजी वृत्तपत्रांनी का लावली आहेत हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
व्हॉट मनी कान्ट बाय – द मॉरल लिमिट्स ऑफ मार्केट्स : मायकेल सॅन्डल,
पेंग्विन, नवी दिल्ली,
पाने : ३५२, किंमत : ४२९ रुपये.