शेक्सपिअरचा ४५०वा वाढदिवस २३ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जाईलच, पण त्याचा सोहळा प्रत्यक्ष पाहायचा असेल तर तो लंडनमध्येच पाहायला हवा. हा वाढदिवस २३ ते २६ एप्रिलदरम्यान पुढील सहा पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
१) १५६४ मध्ये शेक्सपिअरचा जन्म स्ट्रॅटफर्ड अॅव्हान येथील घरी झाला. त्या घराला भेट देऊन त्या घराचा संपूर्ण इतिहास तुम्हाला गाईडकडून जाणून घेता येईल.
२) या जन्मठिकाणी गेस्टबुकमध्ये स्वाक्षरी करता येईल, जे वर्षांतून केवळ एकदाच उघडले जाते. या पुस्तकाचे वैशिष्टय़ असे की, १८४७मध्ये त्यात प्रसिद्ध लेखक थॉमस हार्डी आणि चार्ल्स डिकन्स यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात तुमचाही समावेश करता येईल.
३) जन्मठिकाणाहून निघाल्यावर तुम्हाला शेक्सपिअर सर्वाधिक काळ ज्या ठिकाणी राहिला, जिथे बसून त्याने लेखन केलं त्या पूर्व लंडनची सैर करता येईल. २२ आणि २३ एप्रिलला सकाळी अकरा वाजता ही शेक्सपिअर वॉकिंग टूर सुरू होईल.
४) त्यानंतरचे ठिकाण असेल ग्लोब थिएटर दर्शन. १५९९ साली बांधलेल्या आणि शेक्सपिअरच्या अनेक नाटकांचे प्रयोग झालेल्या या थिएटरला भेट देणं हा संस्मरणीय अनुभव असेल. तिथे तुम्हाला हॅम्लेट हे नाटक नव्या प्रयोगात पाहता येईल.
५) ग्लोब थिएटरमध्ये असतानाच १५८७मध्ये बांधले गेलेले आणि लंडनमधील सर्वासाठी खुले असलेले हे एकमेव एलिझाबेथन प्लेहाऊस आहे. या प्लेहाऊसच्या इतिहासाचा १५ मिनिटांचा व्हिडीओही पाहण्याची सोय आहे.
६) शेक्सपिअर ज्या ‘गॅरिक इन’ नावाच्या पबमध्ये बसून मद्यपानाची आस्वादयात्रा करत असे, त्या पबमध्ये बसून तुम्हालाही एक पेग मारता येईल.
वाढदिवसाचे ६ नावीन्यपूर्ण फंडे!
शेक्सपिअरचा ४५०वा वाढदिवस २३ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जाईलच, पण त्याचा सोहळा प्रत्यक्ष पाहायचा असेल तर तो लंडनमध्येच पाहायला हवा.
First published on: 19-04-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book news