इंग्रजीसाक्षर झालेल्या, होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या भारतीय नववाचकवर्गाला मध्यवर्ती ठेवून आपल्या कादंबऱ्या बेतणाऱ्या चेतन भगत यांची ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही नवी कादंबरी पुढील आठवडय़ात बाजारात येईल. दोन महिन्यांपूर्वी चेतन भगत यांनी तिची घोषणा केली तेव्हा भारतीय इंग्रजी प्रसारमाध्यमांनी त्याच्या मोठमोठय़ा बातम्या केल्या. प्रसिद्धीचं गमक जाणून असणाऱ्या चेतननी लगोलग त्याचा व्हिडीओ यूटय़ुबवर प्रकाशित केला. तर या कादंबरीचे प्रकाशक असलेल्या रुपा पब्लिकेशननं प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी फ्लीपकार्ट या ऑनलाईन स्टोअरबरोबर करार करून त्यांच्याकडेच ती विकत मिळेल, याची तजवीज केली. आधीच अॅमेझॉनच्या तगडय़ा स्पर्धेनं धास्तावलेल्या फ्लीपकार्टनं ही सुवर्णसंधी मानत ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ यांसारख्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर त्याच्या दिमाखदार जाहिराती केल्या. इतकं सगळं झाल्यावर खरं तर कादंबरी प्रकाशित होईपर्यंत चेतनच्या भक्तगणांनी धीर धरायला हवा होता, पण त्यांनी तिचं कथानक जाणून घेण्यासाठी चेतनच्या अधिकृत वेबसाईटवर तोबा गर्दी केली. परिणामी ती ‘हॅक’ झाली. गेली पाच-सहा महिने फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी यांच्या ‘कॅपिटल इन द ट्वेन्टी-फर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकाची जगभर तडाखेबंद विक्री सुरू आहे, तितकीच जोरदार चर्चाही त्यावर होत आहे. पण भारतात मात्र गेली दोन महिने केवळ ‘चेतन माहात्म्य’ सुरू आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ची आगाऊ नोंदणी करण्यासाठी अहमहमिका लागली आहे. या कादंबरीचं कथानक चेतनच्या पूर्वापारच्या फॉम्र्युल्याप्रमाणे प्रेमकथेचं असलं तरी त्याच्याच म्हणण्याप्रमाणे ते वेगळं आहे. शेवटी चेतन म्हणजे काही राम गोपाल वर्मा नव्हे. एकच फॉम्र्युला वापरून वापरून तो सूक्ष्मात गेला, पण चेतन मात्र विस्तारतच चालला आहे! आयटीतला तरुण, ऐटीतली कथानकं आणि आपल्या ‘वर्गा’तल्या वाचकांच्या आवडीचं सर्वोत्तम भान, हा चेतन भगत यांच्या भाग्योदयाचा फॉम्र्युला. तो या नव्या कादंबरीनं अजून प्रशस्त राजरस्त्यावरून धावू लागला आहे. ‘रोखता वारू थांबेना’ अशी अवस्था कालपर्यंत चेतनची होती, लवकरच ‘हाफ गर्लफ्रेंड’च्या वाचकांचीही होईल.
book news Half Girlfriend by Chetan Bhagat
book news, Half Girlfriend by Chetan Bhagat, Half Girlfriend, Chetan Bhagat, loksatta news, loksatta, marathi news, marathi
बुकबातमी
रोखता वारू थांबेना