फिक्शन
१) मिराजेस ऑफ द माइंड : मुश्ताक अहमद युसुफी,
पाने : ५६०४९९ रुपये.
प्रसिद्ध उर्दू उपहास-उपरोधकार युसुफी यांची ही कादंबरी फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात आलेल्या आणि पुन्हा आपल्या मूळ घरी परतू न शकलेल्या एका मुस्लीम कुटुंबाची कहाणी आहे. कल्पनारंजन हा प्रधानविशेष असला तरी या कादंबरीतून २१व्या शतकातल्या मुस्लीम जीवनाचंही दर्शन घडतं.
२) द ट्रूथ अबाऊट द हॅरी क्युबर्ट अफेअर : जोएल डिककेर, पाने : ६८८५९९ रुपये.
या रहस्यमय कादंबरीचा नायक एक लेखक आहे- जो आपल्या मित्राला खुनाच्या आरोपातून मुक्त करतो. अशा प्रकारच्या रहस्यकथा युरोप-अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर वाचल्या जातात. आणि ही कादंबरी वाचनीयतेच्या सदरात मोडणारी नक्कीच आहे.
३) व्हेन हरी मीट हीज साली : हर्ष वर्धन,
पाने : ३०४२९९ रुपये.
‘रोमँटिक कॉमेडी विथ सस्पेन्स’ असलेली ही कादंबरी बॉलिवुड छाप प्रेम त्रिकोण आहे. फक्त यात पती, पत्नी और वो ऐवजी प्रेयसी, तिची बहीण, आणि तो एवढाच काय तो फरक. नायक नायिकेला सोडून तिच्या बहिणीच्या प्रेमात पडतो, ते नायिकेला सहन होत नाही वगैरे वगैरे..

नॉन-फिक्शन
१) द पास्ट अॅज प्रझेंट- फॉर्जिग कन्टेम्पररी आयडेंटीटीज थ्रू हिस्ट्री : रोमिला थापर,
पाने : ३४४५९५ रुपये.
प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या वेगवेगळ्या निबंधांचे हे पुस्तक. यात त्यांनी भारताच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेत काही महत्त्वाची निरीक्षणे मांडली आहेत. भारताचा प्रवास त्यातून अधोरेखित होतो.
२) हार्ड चॉइसेस : हिलरी क्लिंटन, 
पाने : ६८८९९९ रुपये.
बराक ओबामा यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव राहिलेल्या हिलरी क्लिंटन यांचं त्या अनुभवाविषयीचं हे पुस्तक. त्या काळातल्या उपलब्ध संधी, तणाव, संघर्ष आणि आव्हान यांचा मागोवा घेत त्यांनी भविष्याविषयी आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.. अर्थात अध्यक्ष होण्याची मनीषा.
३) व्हॉट वुड अॅपल डू? : डिर्क बॅकमन,
पाने : २०८/२९९ रुपये.
या पुस्तकाचे उपशीर्षक आहे- ‘हाऊ यू कॅन लर्न फ्रॉम अॅपल अँड मेक मनी’. अॅपलच्या यशाचं रहस्य उलगडून सांगत लेखकाने त्या वाटेने गेलात तर तुम्हीही यशस्वी होऊ शकता, हे सांगण्यासाठी या पुस्तकाचा खटाटोप केला आहे. आणि तो मननीय तर नक्कीच आहे.