फिक्शन
१) आवरण : एस. एल. भैरप्पा, इंग्रजी अनुवाद-संदीप बालकृष्ण,
पाने : ४००३९५ रुपये.
‘आवरण’ ही एस. एल. भैरप्पा यांची २००७ साली प्रकाशित झालेली आणि कन्नडमध्ये वादग्रस्त ठरलेली कादंबरी. पुढील दोन वर्षांत या कादंबरीच्या २२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. तिचे समर्थन करणारी सहा तर तिच्यावर टीका करणारी चार पुस्तके प्रकाशित झाली. यू. आर. अनंतमूर्ती, चंद्रशेखर कंबार, गिरीश कार्नाड या ज्ञानपीठ विजेत्या कन्नड साहित्यिकांनी या कादंबरीवर सडकून टीका केली तर कन्नड वाचकांनी तिचे मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले.
२) द चाइल्डहुड ऑफ जेसुस : जे. एम. कोएत्झी,
पाने : ३३६३९९ रुपये.
कोएत्झीची ही नवी कादंबरी. तुम्ही कोएत्झीचे चाहते असाल तर तुम्हाला ही कादंबरी आवडेलच, आणि समजा नसाल तर वेगळा असा अनुभव घ्यायचा असेल तर या कादंबरीच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही.
३) कोन्जो : द फायटिंग स्पिरीट- संदीप गोयल, पाने : २६०२९९ रुपये.
इच्छाशक्ती, गुणवत्ता आणि कठोर मेहनत या सद्गुणांचा पुतळा असलेल्या कादंबरीनायकाचा हा एका जपानी कंपनीबरोबरचा प्रवास. ‘कोन्जो’ म्हणजे लढण्याची इच्छाशक्ती. यातून कार्य -कुशलतेचं आणि कौशल्याचं दर्शन होतं
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा