महिलांच्या सर्वागीण विकासासाठी देशातील पहिली महिला बँक सुरू करण्याबरोबरच निर्भया निधी, असंघटित महिलांना विम्याच्या संरक्षणासह अल्पसंख्याक, अनुसूचित जातीजमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, एआयआयएमएससारख्या उच्च वैद्यकीय शिक्षणसंस्था उभारणी, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा, नवीन राष्ट्रीय आरोग्य योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना, सर्व शिक्षा अभियान आदी शैक्षणिक, आरोग्य तसेच महिला वर्गासाठी सन २ ०१३-१४ च्या अर्थसंकल्पात सवलतींचा वर्षांव करण्यात आला आहे.
* भारतातील पहिली महिला बॅंक
* महिलांसाठी निर्भया निधी
* महिला सक्षमीकरणासाठी ९७ हजार १३४ कोटी
* बचतगट, मोलकरणींसाठी समूह विमा योजना
* आरोग्य-कुटुंब कल्याणासाठी ३७,३३० कोटी
* नवीन राष्ट्रीय आरोग्य योजनेसाठी २१,२३९ कोटी
* ज्येष्ठ नागरिक आरोग्य सेवेसाठी १५० कोटी
* सर्व शिक्षा अभियानासाठी २७ हजार २५८ कोटी
* मध्यान्ह भोजन योजनेसाठी १३ हजार २१५ कोटी
* एससी, एसटी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी ५ हजार २८४ कोटी
* विकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठी ११० कोटी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा