शाश्वत समाधान लाभावे यासाठी भगवंताचा आधार आवश्यक आहे. भगवंताची प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी परमार्थ मार्ग आवश्यक आहे! आता प्रश्न असा की, भगवंताची प्राप्ती करून देणारा परमार्थाचा मार्ग नेमका आहे तरी कसा, हे मला कसं समजावं? माझ्या ज्ञानाच्या जोरावर ही गोष्ट मला समजेल का? काय केलं म्हणजे भगवंताची ओळख होईल? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही’’ (चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. ३७). आता आली का पंचाईत! आतापर्यंत जो अज्ञात होता त्या भगवंतापुरतेच चाचपडत होतो आता त्याच्या जोडीला ‘सत्य’ या तितक्याच अवाढव्य संकल्पनेची भर पडली! हे सत्य म्हणजे काय हो? सत्य गोष्ट अशी असते जिच्यात कधीच घट, बदल होत नाही. जी सदोदित असते, कधीच नष्ट होत नाही. सत्य हे सर्वोच्च असते. शास्त्रे सांगतात की, परमात्मा हाच शाश्वत आहे, सर्वोच्च आहे. अर्थातच परमात्मा हाच सत्यस्वरूप आहे. आता ‘सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही’, या वाक्याचा असाही अर्थ आहे की ज्याला जगण्यातलं सत्यदेखील उमगत नाही त्याला पूर्णसत्य असा भगवंत कसा उमगणार? आपलं जगणं, आपला प्रपंच कसा आहे? संत सांगतात की, तो मिथ्या आहे! आता आजच्या आपल्या स्वाभाविक जडणघडणीला ते पटत नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘स्वभाव मनुष्य बरोबर घेऊन आलेला असतो. त्यात प्रत्येक जन्मातील परिस्थितीने व क्रिया कर्मानी संस्कार होतात. परंतु याने आपल्याला पाहिजे असलेले शाश्वत सुख मिळत नाही. तो स्वभाव शाश्वत सुखाचे ज्ञान करून देऊ शकत नाही. त्याविषयी (शाश्वत सुखाविषयी) त्याला अज्ञान आहे. ते ज्ञान त्याच अज्ञानाच्या भूमिकेवरून करून घेणार म्हणजे होणारे ज्ञान अज्ञानातच जमा होते. ज्या ज्ञानाची आपल्याला जरूर आहे ते ज्ञान आपला स्वभाव आपल्याला होऊ देत नाही. बुद्धीही ते ज्ञान देऊ शकत नाही. कारण बुद्धीला पुन्हा स्वभावाची अडचण आहेच. म्हणून त्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञान व अज्ञान या दोहोंपेक्षा तिसऱ्या कोणत्या तरी वस्तूची गरज लागते..’’ (बोधवचन क्र. ९२८चा पूर्वार्ध). आता ही ‘तिसरी वस्तू’ कोणती, हे आपण पाहाणारच आहोत. तेव्हा अनेक जन्मांतल्या भल्याबुऱ्या संस्कारांनी घडलेला आपला जो स्वभाव आहे तो शाश्वत सुख कसे मिळवता येईल, याचे ज्ञान करून देऊ शकत नाही. अर्थातच तो शाश्वत सुख देऊ शकत नाही. आपली बुद्धी आणि स्वभाव अज्ञानानेच पूर्ण माखला असल्याने त्या अज्ञानाच्याच जोरावर आपण जे काही ‘ज्ञान’ म्हणून मिळवतो ते अज्ञानच असते! या अज्ञानामुळेच आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे आणि या अज्ञानातूनच आपला ‘मी’पणा घट्ट होत आहे. या ‘मी’ आणि ‘माझे’पणाने आपला प्रपंच बरबटला आहे. या अशा प्रपंचात स्वबळावर भगवंताचं ज्ञान होणं अशक्यच आहे.
१३५. ज्ञान-अज्ञान
शाश्वत समाधान लाभावे यासाठी भगवंताचा आधार आवश्यक आहे. भगवंताची प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी परमार्थ मार्ग आवश्यक आहे! आता प्रश्न असा की, भगवंताची प्राप्ती करून देणारा परमार्थाचा मार्ग नेमका आहे तरी कसा, हे मला कसं समजावं? माझ्या ज्ञानाच्या जोरावर ही गोष्ट मला समजेल का? काय केलं म्हणजे भगवंताची ओळख होईल? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात,
आणखी वाचा
First published on: 10-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan knowledge darkness