ज्याला हाव अधिक तो गरीब आणि ज्याला आहे त्यात समाधान तो श्रीमंत! हे शुद्ध तत्त्वज्ञान आहे. गरिबी आणि श्रीमंतीची आपली व्याख्या ही पैसा नसण्यावर आणि असण्यावर अवलंबून असते. श्रीमहाराजांसह सर्वच संतांची व्याख्या ही हाव असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आपण गरीब मानतो तर श्रीमहाराज हाव असलेल्याला गरीब मानतात. पैसा असलेल्याला आपण श्रीमंत मानतो तर श्रीमहाराज, ज्याला आहे त्यात समाधान वाटते त्याला श्रीमंत मानतात. ‘आहे त्यात समाधान’ मानण्याच्या वृत्तीपायीच भारताच्या माथी पूर्वापार आर्थिक करंटेपण आणि निष्क्रियता आल्याचा आरोपवजा तर्क काहीजण मांडतात. जणू पिढय़ान्पिढय़ा आपले लाखो लोक ‘आहे त्यात समाधान’ मानण्याचा सल्ला तंतोतंत पाळतच आहेत! वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की आपला जन्मच वासनेत, अर्थात हवेपणात आहे. आपल्या जन्माबरोबरच हवेपणाही आपल्या अंतरंगात जन्मला आहे आणि जसजसे दिवस जात आहेत तसतसा आपला हा हवेपणा, आपली हाव कमी न होता वाढतच आहे. आपल्याला जे हवं आहे ते पैशानंच मिळतं, ही जाणीव जसजशी पक्की झाली तसतसे पैशाचं प्रेम आपल्यात रुजत गेलं आहे. त्यामुळे पैसा मिळवण्याचा प्रयत्न करणे कसे योग्य आहे, हे कोणी कोणाला सांगावे वा शिकवावे लागत नाही. पैशाची ओढ कुणात प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागत नाही. ती उपजतच आहे. तेव्हा आहे त्यात समाधान मानायची शिकवण या देशातच जन्मली असली तरी आणखी हवेच, या वृत्तीचा सार्वत्रिक उपशम झालेला नाही. मग पैशावर श्रीमहाराज किंवा कोणीही सत्पुरुष कठोर टीका करतात त्याचा हेतू काय? ज्याची झोप सावध असते तो नुसत्या हाकेनंही जागा होऊ शकतो, पण जो अगदी गाढ झोपला आहे त्याला जागं करण्यासाठी नुसत्या हाका पुरेशा होत नाहीत. त्याला गदगदा हलवावं लागतं, प्रसंगी तोंडावर पाण्याचा शिडकावासुद्धा मारावा लागतो. तेव्हा ज्यात आमची सर्वाधिक आसक्ती आहे त्यापलीकडेही जीवनाचा काही हेतू आहे, याची जाग आम्हाला आणण्यासाठी श्रीमहाराजांनी त्या आसक्तीचं जे मूळ आहे त्या पैशावरच वार करावा लागतो. त्या वारांनी आम्ही लगेच गाठीचा पैसा सोडून देत नाही पण निदान पैशाच्या हव्यासाबद्दल थोडा विचार तरी करू लागतो! मुख्य म्हणजे ‘आहे त्यात समाधान’ मानण्याचा सल्ला हा निष्क्रियतेची शिकवण देत नाही की निष्क्रियतेचे उदात्तीकरणही बिंबवू इच्छित नाही. उलट तो माझी मानसिक क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू करतो. मला कितीही मिळत राहिलं पण माझी वृत्ती जे मिळालं त्यात समाधान मानण्याची नसेल तर त्या अतृप्तीचा कधीही अंत होणे शक्य नाही. ‘आहे त्यात समाधान’ म्हणजे मिळविण्याच्या प्रक्रियेला किंवा प्रयत्नांना पूर्णविराम नव्हे. आणखी मिळवण्याचे प्रयत्न होतच राहतील, पण त्या ‘आणखी’मागे अतृप्तीचा वखवख किंवा जोर नसेल. उलट आत्मतृप्तीमुळे  होत असलेले प्रयत्नही अधिक निश्चिंत मनाने, स्थिर वृत्तीने म्हणूनच अचूक व विचारपूर्वक होत राहातील.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान