प्राचीन काळी द्रोण वापरून पावसाचे मोजमाप करत आणि त्यावरून शेतसारा किती घ्यायचा ते निश्चित केले जात असे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेघालयातील खासी टेकड्यांच्या कुशीतील ‘सोहरा’ ही पूर्वीच्या खासी राज्याची राजधानी होती. सोहरा म्हणजे संत्री. पुढे ब्रिटिशांनी सोहराचे ‘चेरा’ केले व त्याचेच पुढे चेरापुंजी (संत्र्याची भूमी) झाले. भारतातील भयंकर उन्हाळ्यापासून दूर राहण्यासाठी १८३१ मध्ये इंग्रजांनी त्याला हिल स्टेशन बनवले आणि लवकरच ते ईशान्य भारताची राजधानीही बनले.
१८०२ ते १८३१ मध्ये डेव्हिड स्कॉट हे ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरचे आसाम व ईशान्य भारतातील एजंट होते. अतिशय दुर्गम अशा गारो, खासी, जैतीया इ. डोंगरातून बांगलादेश व आसाम यांना जोडणारी डोंगरवाट शोधण्याचे दुर्घट कार्य त्यांनी केले. वयाच्या केवळ ४५ व्या वर्षी चेरापुंजी येथे त्यांचा मृत्यू झाला. चेरापुंजी येथेच त्यांचे स्मारक आहे. त्या डेव्हिड स्कॉट यांच्याच नावे चेरापुंजीच्या अफाट पावसाची सर्वात पहिली लिखित नोंद आहे. १८२७ मधील एका पत्रात त्यांनी ‘येथील पाऊस मेघालयातल्याच नोंगख्लोच्या दहापट आहे’ असे म्हटले आहे. पुढे जून ते सप्टेंबर १८३२ मध्ये डॉ. क्रॅक्रोफ्ट यांनी तेथे ५७७ सें.मी. पाऊस मोजला व चेरापुंजी हे जगातील एक अतिजास्त पावसाचे ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले. या प्रचंड पावसास तेथील विशिष्ट भूरचना कारणीभूत आहे. बांगलादेशच्या मैदानातून येणारे मान्सून वारे मेघालयात येताच शेवटी तीन बाजूंनी वेढणाऱ्या चेरापुंजी येथील दरीत अर्धवर्तुळाकार उत्तुंग पर्वताला अडल्यामुळे उंच चढत जाऊन थंड होतात. त्यांच्यातील सर्व पाऊस दरीच्या आतल्या म्हणजे चेरापुंजीच्या बाजूस पडतो. १९०८ च्या सरकारी गॅझेटियरमध्ये चेरापुंजी येथील सरासरी पाऊस ११६३ सेंमी. असल्याचे नोंदवले आहे. सध्या मात्र जगातील सर्वात जास्त पाऊस असण्याचा मान चेरापुंजीऐवजी त्याच्या जवळच्या मौसीनराम या गावास मिळाला आहे. जगातील विक्रमी पाऊस मौसीनराम येथे १९८५ मध्ये २६,४७१ मि.मी. (१०४२ इंच) नोंदवण्यात आला. पुढे चालून पावसाळ्यातील प्रचंड पाऊस, असह्य आर्द्रता, डास इ. मुळे चेरापुंजी येथील राजधानी शिलाँगला नेण्यात आली. डेव्हिड स्कॉट यांनी चेरापुंजीच्या पावसाचा लावलेला शोध ही त्यावेळी फार मोठी घटना ठरली. कारण भूतकाळात असे पावसाचे मोजमापच झाले नव्हते.
तसे पावसाचे मोजमाप घेण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून जगभर चालू होते. त्याचा उद्देश शेतसारा निश्चित करणे हा होता. इ. स. पूर्व पाचव्या शतकात ग्रीक लोक पावसाच्या नोंदी ठेवत असल्याचे उल्लेख आहेत. भारतात मौर्य काळात (इ. स. पूर्व तिसरे शतक) पावसाच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जात, असे कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथावरून दिसते. प्रत्येक प्रांतात एक धान्याचे कोठार व तिथेच एक पर्जन्यमापक असे. त्या वर्षीच्या पावसाच्या मोजणीवरून तिथे कोणते पीक लावायचे ते राजे व अधिकारी ठरवत आणि कर निश्चित करत. अश्मक इ. प्रांतात किती ‘द्रोण’ पाऊस पडतो, याची काही उदाहरणेही कौटिल्याने दिली होती. ज्यूंच्या मिसनाह या प्राचीन ग्रंथात (इ.स. पूर्व दुसरे ते इ. स. चे दुसरे शतक ) पॅलेस्टाईनच्या वार्षिक पावसाची नोंद आहे. पण पर्जन्य मोजण्याची ही पद्धत पुढे हजार वर्षे लुप्त झाली. तेराव्या शतकात चीनमधील सोंग राजवटीत क्वीन जोउशाओ याने पाऊस व हिमवृष्टीमापक शोधून काढला. पंधराव्या शतकात कोरियातील सेजोंग राजाच्या काळातील ‘चुगुगी’ हा जगातील पहिला प्रमाणित पर्जन्यमापक मानण्यात येतो. इंग्लंडमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ ख्रिास्तोफर रेन यांनी १६६२ मध्ये रॉबर्ट हूक यांच्यासोबत पहिला ‘टिपिंग बकेट रेन गॉज’ शोधून काढला. पर्जन्यमापक विकसित झाल्यावर मग पावसाचे मोजमाप घेण्यात येऊ लागले. पुढे रॉबर्ट हूक यांनी जो नरसाळ्याचा पर्जन्यमापक तयार केला, त्यातून १६९५ मध्ये वर्षभर पाऊस मोजला गेला. इंग्लंडच्या रिचर्ड टोनेली यांनी १६७७ ते १६९४ मध्ये सलग १५ वर्षे इंग्लंडमधील पाऊस मोजून आपल्या नोंदी रॉयल सोसायटीच्या जर्नलमधून प्रकाशित केल्या. अशा दीर्घकालीन नोंदींच्या आधारे एखाद्या ठिकाणचे सरासरी पर्जन्य ठरवण्यात येऊ लागले. गिल्बर्ट व्हाइट या इंग्लंडच्या निसर्गतज्ज्ञाने हॅम्पशायर परगण्यात १७७९ ते १७८६ अशा आठ वर्षांच्या नोंदी घेऊन पर्जन्यमान निश्चित केले. त्याच काळात थॉमस बार्कर यांनी तर तब्बल ५९ वर्षे पर्जन्यासोबत तापमान, वारा, वायूभार यांच्याही नोंदी घेतल्या. रॉयल सोसायटीच्या दप्तरातील त्यांच्या नोंदी हे एक मौल्यवान संचित मानले जाते. अशा प्रकारे पर्जन्यमापकाच्या शोधानंतर विविध ठिकाणांचे सरासरी पर्जन्यमान निश्चित होऊ लागले.
भारतात ईस्ट इंडिया कंपनीने १७८५ मध्ये कलकत्ता येथे, १७९६ मध्ये मद्रास येथे आणि १८२६ मध्ये मुंबईला कुलाबा येथे वेधशाळा स्थापन केल्या होत्या. पुढे विविध प्रांत व राज्ये यांनीही वेधशाळा स्थापन केल्या. १८७५ रोजी भारतीय हवामान खात्याची स्थापना करण्यात आली. भारतात १८७८ पासून सर्व केंद्रांवरील माहिती स्वीकारून त्याआधारे दैनंदिन हवामान अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यांच्या संकलनातून संपूर्ण भारताच्या हवामानाचे एक समग्र चित्र उभे राहू लागले. त्यावरून भारताचे हवामान व पर्जन्याची काही वैशिष्टये लक्षात येतात. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण जसे भारतात आहे, तसेच जगात अतिशय कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशांपैकी कच्छचे रण व थरचे वाळवंटही आहे. एवढेच नव्हे तर या दोन टोकांमधील कमी पावसाचे, मध्यम पावसाचे, जास्त पावसाचे, अतिजास्त पावसाचे असे सर्व पर्जन्यप्रदेश आपल्या भारतात आहेत. पर्वताला वारे अडल्यामुळे प्रचंड प्रतिरोध पर्जन्य मिळणारे कोकण, चेरापुंजीसारखे भाग आहेत. तर त्याच पर्वतांच्या दुसऱ्या बाजूस सतत दुष्काळाच्या सावटाखाली असणारे पर्जन्यछायेचे प्रदेशही आहेत. उदा. चेरापुंजीच्या जवळच असणाऱ्या शिलाँग येथे वार्षिक पर्जन्य केवळ ५४१ मि. मी. (पुण्यापेक्षाही कमी) आहे. एवढेच नव्हे तर खुद्द चेरापुंजी येथे पावसाळा संपताच लोकांना पाण्यासाठी दूर दूर भटकावे लागते. कारण प्रचंड पाऊस व पर्वतीय परिसर यामुळे येथील जमिनीचे वरचे थर वाहून गेल्याने तिची साठवणक्षमता समाप्त झाली आहे. एकंदरच भारतात एकाच वेळी कुठे प्रचंड पूर तर कुठे भीषण दुष्काळ असतो.
तात्पर्य, पराकोटीची विभिन्नता व मधले सर्व टप्पे हेच आपले वैशिष्ट्य आहे. इथे जगात अतिउच्च तापमान असणारे राजस्थान, दिल्ली, हरियाणा आहेत, तसे अतिशीत असे हिमालयातील भागही आहेत. पाऊस व हवामानातील ही विविधताच भारताच्या सर्वांगीण विविधतेचे व समस्यांचेही एक मूळ कारण आहे. आपल्याकडे दोन गावांहून आलेली माणसे एकमेकांस भेटली की पहिला प्रश्न असतो, ‘काय म्हणते हवापाणी?’ जिथे वर्षभर तुफान पाऊस पडतो ते कांगोचे खोरे किंवा जिथे पाऊसच पडत नाही ते सहारा वाळवंट किंवा सदैव बर्फाच्छादित टुंड्रा प्रदेश – तिथे कोण कुणाला असे विचारील ? फक्त आपल्या देशातच असे घडते. याचे कारण अर्थात भारतातील हवामान व पर्जन्यातील ही तीव्र विविधता आहे. आपल्या समस्याच नव्हे तर समृद्धीचा मार्गही या सर्वव्यापी विविधतेतूनच जातो. यामुळे तिचा सखोल अभ्यास ही एक देशसेवाच आहे. मेघालयातील खासी टेकड्यांच्या कुशीतील ‘सोहरा’ ही पूर्वीच्या खासी राज्याची राजधानी होती. सोहरा म्हणजे संत्री. पुढे ब्रिटिशांनी सोहराचे ‘चेरा’ केले व त्याचेच पुढे चेरापुंजी (संत्र्याची भूमी) झाले. भारतातील भयंकर उन्हाळ्यापासून दूर राहण्यासाठी १८३१ मध्ये इंग्रजांनी त्याला हिल स्टेशन बनवले आणि लवकरच ते ईशान्य भारताची राजधानीही बनले.

तात्पर्य, पराकोटीची विभिन्नता व मधले सर्व टप्पे हेच आपले वैशिष्ट्य आहे. इथे जगात अतिउच्च तापमान असणारे राजस्थान, दिल्ली, हरियाणा आहेत, तसे अतिशीत असे हिमालयातील भागही आहेत. पाऊस व हवामानातील ही विविधताच भारताच्या सर्वांगीण विविधतेचे व समस्यांचेही एक मूळ कारण आहे. आपल्याकडे दोन गावांहून आलेली माणसे एकमेकांस भेटली की पहिला प्रश्न असतो, ‘काय म्हणते हवापाणी?’ जिथे वर्षभर तुफान पाऊस पडतो ते कांगोचे खोरे किंवा जिथे पाऊसच पडत नाही ते सहारा वाळवंट किंवा सदैव बर्फाच्छादित टुंड्रा प्रदेश – तिथे कोण कुणाला असे विचारील ? फक्त आपल्या देशातच असे घडते. याचे कारण अर्थात भारतातील हवामान व पर्जन्यातील ही तीव्र विविधता आहे. आपल्या समस्याच नव्हे तर समृद्धीचा मार्गही या सर्वव्यापी विविधतेतूनच जातो. यामुळे तिचा सखोल अभ्यास ही एक देशसेवाच आहे. चेरापुंजी परिसर ( इंटरनेटवरून साभार)