भाजपने सरदार पटेलांवर हक्क सांगितला, नरसिंह रावांना आपले म्हटले, प्रणव मुखर्जींचे तर संघाच्या मुख्यालयात स्वागत केले गेले. मनमोहन सिंग यांनाही आपल्यात ओढून घेण्याची संधी भाजपने गमावली हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. काँग्रेसने नेहरूंना महत्त्व दिले, सरदार पटेलांना बाजूला केले, नरसिंह राव यांचे पार्थिवही काँग्रेस मुख्यालयात आणू दिले नाही, प्रणव मुखर्जींचाही सन्मान केला नाही, असे आरोप भाजपने सातत्याने केले आहेत. त्यांच्या आरोपांत तथ्य नाही असे नव्हे. पंतप्रधान मोदींच्या डॉ. सिंग यांच्यावरील स्तुतिसुमनांमुळे भाजपला डॉ. सिंग यांनाही आपल्यात ओढायचे होते असे दिसले. पण ही संधी काँग्रेसने कदाचित हिरावून घेतली असावी. त्यानंतर भाजपचा आणि केंद्र सरकारचा सूर आणि नूर दोन्ही बदलले असे दिसते.

हेही वाचा : अन्यथा : ‘जीन’थेरपी!

pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Ganesh Naik announcement create unease in Shiv Sena
ठाण्यात फक्त कमळ ! गणेश नाईकांच्या घोषणेने शिवसेनेत अस्वस्थता
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Mushtaq Ahmed digging grave of Yasmeen Akhtar, last daughter of Mohammad Aslam dying of mystery illness
एक लग्न अन् १७ अंत्यसंस्कार, जम्मूतील गावात रहस्यमय आजार; ३ कुटुंबे उद्ध्वस्त, मृत्यूच्या कारणांंमुळे तज्ज्ञही हैराण
Shiv Sena-BJP reach agreement over Kolhapurs guardian minister post
कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये तह, हसन मुश्रीफ यांना धक्का
BJP retains all important districts of Vidarbha in Guardian Minister post
विदर्भातील पालकमंत्री निवडीत भाजपचाच वरचष्मा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राजकीय पंतप्रधान नव्हते. त्यांनी पंतप्रधान पदाचे राजकारण केले नाही किंवा काँग्रेसच्या राजकारणाचे ते भागही नव्हते. त्या अर्थाने ते पक्षातीत होते. सगळ्या पक्षांच्या नेत्यांसाठी डॉ. सिंग यांचे दरवाजे उघडे असत असे भाजपचे नेते म्हणतात. म्हणजे भाजपच्या नेत्यांनाही त्यांना कधी अव्हेरले असेल असे म्हणता येत नाही. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी तब्बल साडेपाच मिनिटांची ध्वनिचित्रफीत प्रसारित केली. ती ऐकली तर समजेल की, मोदींनी डॉ. सिंग यांचा यथायोग्य आदर केला. फाळणीनंतर डॉ. सिंग भारतात आले, अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करून डॉ. सिंग यांनी प्रचंड यश मिळवले याचा आवर्जून उल्लेख मोदींनी केला. डॉ. सिंग यांच्या घरी केवळ मोदीच नव्हे तर भाजपचे महासचिव स्तरावरील नेतेही गेले. हे पाहिले तर भाजपने डॉ. सिंग यांच्याबद्दल आदर दाखवला. त्यामुळेच प्रश्न पडतो की भाजपने वा केंद्र सरकारने डॉ. सिंग यांच्या अंत्यविधीसाठी जागा न देऊन यथोचित सन्मान का केला नाही? भाजपचा गांधी कुटुंबाला असलेला विरोध समजण्याजोगा आहे. पण डॉ. सिंग केवळ गांधी कुटुंबाचे वा काँग्रेसचे नव्हते, हा विचार भाजपला का करता आला नाही? भाजपचे प्रामुख्याने मोदीपर्वातील राजकारण विरोधकांबद्दलच्या द्वेष वा सुडाने भरलेले असल्याचा आरोप नेहमी केला जातो. भाजपकडे सहिष्णू राजकारण करण्याची परंपरा नाही ही टीका खोडून काढण्याची मोठी संधी भाजपकडे चालून आली होती. पण ती घेण्यासाठीदेखील मन मोठे करावे लागते, तेही भाजपला करता आले नाही असे दिसले.

अन्याय त्यांनी केला, म्हणून…

भाजपने डॉ. सिंग यांच्यावर अन्याय केला हे मान्य करावे लागेल. ही घोडचूक लपवण्यासाठी भाजपचे नेते विनाकारण आक्रमक झालेले दिसले. आक्रमकपणा हा उत्तम बचाव असतो असे म्हणतात, या डावपेचाचा भाजपने उपयोग केला; पण त्यातून त्यांची कूपमण्डूक वृत्ती लपली नाही! भाजपने आपली चूक लपवण्यासाठी काँग्रेसने आपल्याच नेत्यांवर कसा अन्याय केला याची उदाहरणे दिली. सीताराम केसरी, नरसिंह राव, प्रणव मुखर्जी अशा अनेक काँग्रेस नेत्यांना काँग्रेसने चांगली वागणूक दिली नसेल. अगदी मनमोहन सिंग यांचाही काँग्रेसने अपमान केला असेल. हा भाजपचा सगळा युक्तिवाद मान्य केला तरी भाजपने डॉ. सिंग यांच्या निधनाच्या पश्चात त्यांना दिलेली वागणूक योग्य होती असे कसे म्हणता येईल? काँग्रेसने चुका केल्या म्हणून भाजपनेही काँग्रेसप्रमाणेच उद्दामपणे वागले पाहिजे असे कोणीही म्हणणार नाही. काँग्रेसने स्वत:हून डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी जागा मागितली म्हणून ती नाकारली गेली असे चित्र निर्माण झाले. इतका अहंभाव भाजपने व केंद्र सरकारने का दाखवला असा प्रश्न संवेदनशील आणि सुज्ञ व्यक्तीला पडू शकतो.

हेही वाचा : भूगोलाचा इतिहास : देणे भूगोलाचे!

भाजपचेही काँग्रेसीकरण?

डॉ. सिंग हे कोणी ऐरेगैरे व्यक्ती नव्हते. ते कोणी सामान्य काँग्रेसीही नव्हते. ते गांधी कुटुंबाचा सदस्यही नव्हते. ते सत्तापिपासू राजकारणीही नव्हते. डॉ. सिंग यांचे अर्थतज्ज्ञ म्हणून वा पंतप्रधान म्हणून योगदान भाजपनेही नाकारलेले नाही. हे पाहिले तर डॉ. सिंग यांचा मान राखला असता तर राजकारणापलीकडेही बघण्याच्या भाजपच्या मनोवृत्तीचे दर्शन घडले असते. डॉ. सिंग यांना गांधी कुटुंबाशी जोडून भाजपने त्यांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला खूपच मर्यादित केले असे म्हणता येऊ शकेल. काँग्रेसच्या मागणीचा विचार केला नाही हेही समजण्याजोगे आहे. पण डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांचा विचार करून तरी भाजप व केंद्र सरकारने त्यांच्या अंत्यविधीसाठी वेगळी व्यवस्था करून आदर करता आला असता असे म्हटले तर चुकीचे ठरत नाही. इतर पंतप्रधानांचा मान राखला गेला तर डॉ. सिंग यांचा का नाही, असा प्रश्न निर्माण होतो. भाजपने स्वत:हून डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी व स्मारकासाठी जागा दिली असती तर मोदींचे औदार्य लोकांना भावले असते हे नक्की! काँग्रेसच्या आरोप-प्रत्यारोपांना भाजपने कोणतीही किंमत दिली नाही तर काहीच बिघडत नाही. पण, मोदींनीच स्तुती केलेल्या दिवंगत पंतप्रधानावरही निगमबोध घाटावरच अंत्यसंस्कार करायला भाग पाडणे ही वृत्ती काय दाखवून देते? निगमबोध घाट ही दिल्लीतील प्रमुख स्मशानभूमी आहे, तिथे सर्वसामान्यांवर अंत्यविधी केले जातात. तिथे डॉ. सिंग यांचा अंत्यसंस्कार करायला लावणे यातून भाजपने डॉ. सिंग यांना अतिसामान्य करून टाकले. एखाद्या पंतप्रधानाचा सन्मान न करणे हा भाजपच्या काँग्रेसविरोधी राजकारणाचा भाग कसा असू शकतो? भाजप इतका असंवेदनशील आणि असुरक्षित कधीपासून झाला? भाजपचे असेही काँग्रेसीकरण होईल असे कदाचित भाजपलाही कधी वाटले नसावे!

अखेर गृह मंत्रालय हलले…

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्र सरकाकडून अंत्यविधी निगमबोध घाटावरच होतील असे स्पष्ट करण्यात आले होते. डॉ. सिंग यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने कदाचित सिंग यांच्या कुटुंबीयांना वा काँग्रेसला पर्याय उरला नसेल. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली होती. इंदिरा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या ‘शक्ति स्थळा’च्या आवारात डॉ. सिंग यांच्या अत्यंविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आणि तिथेच त्यांचे स्मारक उभे करण्याचा विचारही काँग्रेसने केला होता. केंद्र सरकार डॉ. सिंग यांच्यासाठी जागा देत नसेल तर आपणच जागा उपलब्ध करून देऊ अशीही चर्चा काँग्रेसच्या बैठकीमध्ये झाली. काँग्रेसचा हा विचार बहुधा केंद्र सरकारपर्यंत पोहोचला असावा; कारण त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निवेदन प्रसिद्ध केले गेले व स्मारकाला जागा दिली जाईल असे घोषित केले गेले. मध्यरात्रीच्या सुमारास सरकारी पत्रक प्रसिद्ध करण्याइतका प्रशासनाचा कारभार गतिमान कधीपासून झाला?

हेही वाचा : बुकमार्क : वाचनविश्वातील मुशाफिरी…

‘राष्ट्रीय स्थळ’ वाजपेयींविनाच

डॉ. सिंग यांच्या काळात २०१३ मध्ये ‘राष्ट्रीय स्थळ’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला होता. नेत्यांची स्वतंत्र स्मारके उभारण्यापेक्षा एकाच जागेवर त्यांचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला गेल्याचा युक्तिवाद भाजपकडून होत आहे. मग माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसाठीही हा नियम लागू करता आला असता. वाजपेयी हे भाजपसाठीच नव्हे अवघ्या भारतासाठी माननीय होते, त्यांचा मान राखणे केंद्र सरकारचे कर्तव्यच होते. वाजपेयी गेले तेव्हा मोदीच पंतप्रधान होते. वाजपेयींचा मोदींनी यथोचित सन्मान केला हे योग्यच होते. मग, डॉ. सिंग यांचा का केला नाही एवढाच प्रश्न आहे. मोदी-शहा आणि भाजपने डॉ. सिंग यांना दिलेली वागणूक पाहता ‘स्टेट्समनशिप’ देशाबाहेरच नव्हे, देशातही दाखवायची असते याचा कदाचित विसर पडला असावा असे दिसते.

mahesh.sarlashkar@expressindia.com

Story img Loader